Home / चंद्रपूर - जिल्हा / झिरो टू हिरो आणि बोले...

चंद्रपूर - जिल्हा

झिरो टू हिरो आणि बोले तसा चाले असं व्यक्तिमत्व...?

झिरो  टू  हिरो  आणि बोले  तसा  चाले असं  व्यक्तिमत्व...?

गोंडपीपरी (चंद्रपूर) :- संभाजी ब्रिगेडचे विभागीय कार्याध्यक्ष तसेच चंद्रपूर डिस्ट्रिक्ट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन चे उपाध्यक्ष (ग्रामीण) आणि पवनसूत दवा बाजार रामनगर चंद्रपूर येथील ए टू झेड मेडिकल एजन्सी चे मालक, संचालक तसेच माझ्या अडचणीच्या काळात सावलीसारखे सोबत राहून सर तुम्ही घाबरू नका तुम्हाला काय मदत पाहिजे ते सांगा अशी वेळोवेळी माझी हिंमत वाढवून आतापर्यंत मला आर्थिक मदत करणारे, माझा शब्द कधीही खाली पडू न देणारे, "सर तुम्ही  महाराष्ट्रात कुठेही आर्थिक अडचणीत सापडले तर मला एक कॉल करा मी सांगतो त्या ठिकाणी जा तुमचे काम होऊन जाईल" असे म्हणणारे व हिंमत देणारे, त्यांच्या एका शब्दावर लोक ज्यांच्या गैरहजेरीत  विश्वासामुळे त्यांनी सांगितलेली कामे करतात एवढ्या मोठया प्रमाणात अनेक श्रीमंत व विश्वासू व्यावसायीक माणसासोबत संबंध ठेवणारे, गुंतागुंतीच्या अडीअडचणीत, संकटात सापडलेल्या माणसाला योग्य मार्ग दाखवणारे, संकट प्रसंगी अडलेल्यांना आर्थिक मदत करणारे, हरहुन्नरी, प्रेमळ, मनमिळावू, खेळीमेळीचा स्वभाव असणारे, प्रचंड संयमी, शांत पण कुणी जाणून-बुजून अंगावर आलेच तर आक्रमक होऊन नियमाने विरोध करून संकट परतवून लावणारे, जीवनात निराश, हतबल झालेल्यांना, व्यवसायात अपयश आलेल्यांना अशा अनेकांना आधार देणारे, खचलेल्या माणसात उत्साह, स्फूर्ती,बळ, सकारात्मक विचार निर्माण करून त्याचे मनोबल वाढवून त्याचे जगणे सोपे सुरळीत, आनंदी व समाधानी करण्याचे सूत्र देणारे माझे मित्र रविभाऊ आसूटकर यांचा आज वाढदिवस. रविभाऊंना वाढदिवसाच्या लाख लाख हार्दिक सदिच्छा...

रविभाऊ यांचा शिक्षण घेण्याचा, जीवन जगण्याचा प्रवास जेमतेम आर्थिक परिस्थितीमुळे प्रचंड संघर्षाचा होता तरी न डगमगता त्यातूनही मार्ग रविभाऊनी काढला. रविभाऊवर अगदी कमी वयात मेडिकल मध्ये नोकरी करण्याचा प्रसंग आला. त्या काळात त्यांनी अनेक माणसे तपासले, अभ्यासले,  समाजात कितीतरी लोक अडचणीचा सामना करत जीवन जगतात यांचे निरीक्षण रविभाऊनी केले व समाजातील अनेक लोकांचे दुःख बघितले तेव्हा आपणच नाही तर अनेक लोक दुःखी व अडचनीत, गरिबीत जीवन जगत आहे ही जाणीव  रविभाऊना झाली आणि यावर मात करायची असेल तर पहिले मला आर्थिक सक्षम व्हावे लागेल हे लवकरच रविभाऊनी हेरले.

 'दुसऱ्याची नोकरी करण्यापेक्षा आपणही मालक व्हावे' हे रविभाऊचे स्वप्न होते ते साकार करण्यासाठी, स्वप्न पूर्ण करण्यासाठी व मला यशस्वी व्हायचे आहे या एका ध्येयाने रवी भाऊंनी मेडिकल व्यवसाय सुरू करण्यासाठी गावाचा शोध घेतला. रविभाऊनी मेडिकल मध्ये काही वर्षे नोकरी केल्यामुळे मेडिकल क्षेत्रातील अनुभव, बारकावे बऱ्यापैकी त्यांच्याकडे असल्याने मोठ्या हिंमतीने एक छोटेसे मेडिकल  १९९५ मध्ये गोंडपिपरी तालुक्यातील वढोली या गावी सुरू केले. रविभाऊनी जवळून गरिबी बघितली,भोगली असल्याने त्यांना समाजातील अनेक अडचणीची जाण होती. लोकांसाठी, समाजासाठी आपण काम केले पाहिजे हा सामाजिक पिंड रविभाऊचा असल्याने ते १९९९ पासून संभाजी ब्रिगेड या संघटनेसोबत जुळले व संभाजी ब्रिगेड या संघटनेचा सर्व सामान्य कार्यकर्ता म्हणून रविभाऊंनी सामाजिक काम करणे सुरू केले. त्यांचा काम करण्याचा हातखंडा पाहून वरिष्ठ पदाधिकारी यांनी गोंडपिंपरी तालुका अध्यक्ष पदाची जबाबदारी  रविभाऊकडे दिली.

रविभाऊ पंधरा वर्षांपूर्वी गोंडपिपरी तालुक्याचे संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष होते. नंतर मराठा सेवा संघ प्रणित वधू-वर कक्षाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली. पुढे आरोग्य कक्षाचे अध्यक्ष म्हणून काही वर्षे काम केले. सध्या रविभाऊ आसूटकर यांचे संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष म्हणून सामाजिक कार्य सुरू आहे. सोबतच मेडिकल क्षेत्रातील मोठी संघटना  म्हणजेच चंद्रपूर डिस्ट्रिक्ट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे उपाध्यक्ष (ग्रामीण)  या पदावर सध्या रविभाऊ काम करत आहे. 

 रविभाऊ यांचा जीवनाचा प्रवास  झिरो पासून सुरु झाला असला तरी आज रविभाऊनि  व्यवसायात यशस्वी व्यावसायिक म्हणून स्वतःची  ओळख निर्माण केली असून खरोखरच त्यांनी व्यवसायात तसेच सामाजिक कार्यात मोठी उंची गाठून यशाच्या शिखराकडे त्यांची वाटचाल सतत सुरू आहे. म्हणजेच सोप्या भाषेत सांगायचे तर रविभाऊ यशस्वी व्यवसाय करणारे आणि व्यवसाय व सामाजिक कार्यात यशस्वी झालेले हिरो आहे. त्यांचे सामाजिक कार्य वाखाण्याजोगे आहे. मराठा सेवा संघाच्या कार्यालयाचे बांधकाम असो, वाचनालय, वसतीगृह, मराठा सेवा संघाकरिता जागा खरेदी इत्यादी कामासाठीसुद्धा रविभाऊनी भरपूर आर्थिक मदत केली आहे. लोकांना आरोग्याच्या सोयी व सेवा वेळीच उपलब्ध व्हाव्या म्हणून संभाजी ब्रिगेडच्या ॲम्बुलन्सची दुरुस्ती, ड्रायव्हर याचीसुद्धा देखरेख रविभाऊकडे आहे. 

 कुणी रविभाऊंना सांगितले की आम्हाला रक्तदान शिबिर घ्यायचे आहे, संस्कार शिबिर घ्यायचे आहे, कार्यकर्ता कॅडर कॅम घ्यायचा आहे तर वरीलप्रमाणे अनेक कार्यक्रम घेण्यासाठी  योग्य ती आर्थिक मदत रविभाऊ करतात. काही वैयक्तिक रुग्णालयाची कामे असो, अपघात असो अशा घटनांची माहिती रविभाऊंना होताच त्या ठिकाणी ते धावून जातात. रविभाऊ बोलतात, शब्द देतात व दिलेला शब्द पाळतात म्हणून रविभाऊचा स्वभाव व कृती "बोले तसा चाले त्याची वंदावी पाउले" असा आहे. यासाठी ते पात्र आहे अशी अनेक कार्यकर्त्याच्या तसेच समाजातील इतर लोकांच्या  तोंडून रविभाऊजी स्तुती व वाहवा सर्वत्र सुरू असते.  अनेक क्षेत्रातील कार्य रविभाऊकडून होत आहे व पुढेही त्यांच्याकडून सकारात्मक कार्य होत राहील यासाठी त्यांना पुढील कार्य करण्यासाठी निरोगी आरोग्य मिळावे, नेहमी सुदृढ व उत्साही प्रकृती रविभाऊंची असावी. त्यांना जीवनात वाहत्या पाण्यासारखा आनंद, उत्साह क्षणाक्षणाला मिळावा ही सदिच्छा आणि रविभाऊंना वाढदिवसाच्या लाख लाख हार्दिक शुभेच्छा..

 "आज ६ जून शिवराज्याभिषेक दिन" शिवराज्याभिषेक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा : शंकरराव लोनगाडगे (जिल्हाध्यक्ष  डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद (माध्यमिक विभाग) चंद्रपूर)

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

चंद्रपूर - जिल्हातील बातम्या

लॉयड्स मेटल्सच्या विस्तारासाठी जनसुनवनी सुरळीतपणे पडली पार, प्रमुख स्थानिक नेते आणि समुदायाने दर्शविला पाठिंब.

घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...

पोस्टे बल्लारशा येथिल पेट्रोल बॉम्ब हल्यातील आरोपी अटकेत.

.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...