Home / चंद्रपूर - जिल्हा / युगात्मा शरद जोशी यांच्या...

चंद्रपूर - जिल्हा

युगात्मा शरद जोशी यांच्या जन्मदिनी रक्तदान शिबीर..!

युगात्मा शरद जोशी यांच्या जन्मदिनी रक्तदान शिबीर..!

शेतकर्‍यांच्या स्वातंत्र्यासाठी निर्धार करण्याचा दिवस - अँड. चटप 

सय्यद शब्बीर जागीरदार (ता.प्र.जिवती): शेतकरी संघटनेचे संस्थापक, माजी खासदार युगात्मा स्व. शरद जोशी यांच्या 86 व्या जयंतीनिमित्त राजुरा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन माजी आमदार अँड.वामनराव चटप यांनी केले. शरद जोशी यांनी ग्रामीण भागाचे अर्थशास्त्र समजून घेऊन शेतकर्‍यांच्या गरिबीचे मूळ कशात आहे, हे अभ्यासाअंती शोधून काढले आणि शेतकर्‍यांना सुखा, समाधानाचे दिवस यावे म्हणुन सतत संघर्ष केला. त्यामुळेच अनेकदा शेतमालाचे भाव वाढविणे सरकारला भाग पडले. मात्र हा शेतकरी व बारा बलुतेदारांचा संघर्ष अजून संपला नाही. तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्य, उत्पादन खर्चानुसार भाव यासारख्या अनेक महत्वाच्या समस्या कायम असून केंद्र व राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाच्या विरोधात पुन्हा एकदा शरद जोशी यांच्या जन्मदिनी संघर्ष करण्याचा निर्धार करणे आवश्यक असल्याचे मत माजी आमदार अँड. वामनराव चटप यांनी यावेळी बोलतांना व्यक्त केले.

  या रक्तदान शिबिर उद्घाटन कार्यक्रमात माजी आमदार अँड. वामनराव चटप, अँड. मुरलीधर देवाळकर, प्रभाकर ढवस, रमेश नळे, हरिदास बोरकुटे, कपिल इद्दे, शेषराव बोंडे, पि.यू. बोंडे, मधुकर चिंचोलकर, दिनकर डोहे, राजू गिरसावळे, दिलीप देठे, भाऊराव बोबडे, रमेश रणदिवे, बळीराम खुजे, बंडू देठे, विठ्ठल पाल, मतीन शेख, काळे, रणदिवे, पुंडलिक जीवतोडे यांच्यासह शेतकरी संघटनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या शिबिरात निखिल कावळे, देवराव पोटे, सुभाष सारडा, रमेश गौरकार, सुरज गव्हाणे, निखिल बोंडे, सुरज बोरकुटे, अभय अपराजित, चेतन राऊत, ऋणाल झाडे, उत्पल गोरे यांच्यासह पन्नास नागरिक व युवकांनी रक्तदान केले.

   राजुरा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक लहू कुळमेथे आणि चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रक्तपेढीचे समाजकार्य अधिक्षक पंकज पवार, प्रयोगशाळा तंत्रज्ञ रोशन भोयर, पल्लवी पवार, शुभांगी पुरटकर, आशिष कांबळे, साहिल भसारकर, अभिजित पोफळे इत्यादींचा रक्त संकलन कार्यात सहभाग होता.

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

चंद्रपूर - जिल्हातील बातम्या

लॉयड्स मेटल्सच्या विस्तारासाठी जनसुनवनी सुरळीतपणे पडली पार, प्रमुख स्थानिक नेते आणि समुदायाने दर्शविला पाठिंब.

घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...

पोस्टे बल्लारशा येथिल पेट्रोल बॉम्ब हल्यातील आरोपी अटकेत.

.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...