वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
जैतापूर येथील घटना; वन्यप्राण्यांकडून शेतपिकांचे मोठे नुकसान
राजुरा: शेतातून काम करून घराकडे येत असताना जैतापूर येथील विवेक गुलाब निब्रड (वय २१) यांच्यावर सकाळी ११ वाजता रस्त्याने येत असताना अचानक जंगली डुकराने हल्ला केला असून यात ते गंभीर जखमी झाले आहे. यावेळी शेतशिवारातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमीला ग्रामीण रुग्णालय गडचांदूर येथे उपचाराकरिता दाखल केले आहे.
विवेक नेहमीप्रमाणे सकाळ पाळीत शेतकामाकरिता शेतात गेला होता, शेतीचे काम करून घरी येत असताना झुडपात रस्त्याच्या कडेला झुडपात असलेल्या जंगली डुकराने विवेक निब्रड यांच्यावर हल्ला केला यात त्यांच्या दोन्ही पायाला व कंबरेला जबर मार लागला आहे. ऐन शेतीचा हंगाम सुरू झाला असून शेतात प्रत्येकाला जावे लागतात मात्र वन्यप्राण्यांच्या होत असलेल्या हल्यामुळे शेतकरी व मजूर वर्गात सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
जैतापूर, मारडा, कुर्ली, पेल्लोरा, नांदगाव परिसरात झुडपी जंगल असल्याने हरीण, चित्तर, डुक्कर, रोही, ससा यासह अन्य वन्यप्राण्यांचे वास्तव्य मोठ्या प्रमाणात आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे शेती आहे, अनेकदा वन्यप्राणी शेतात येऊन शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करीत आहे. वन्यप्राण्यांकडून होत असलेली शेतपिकांची नासाडी हि शेतकऱ्यांसाठी मोठी डोकेदुखी ठरली आहे. पिकाच्या लागवडी पासून तर पीक हातात येईपर्यंत शेतपिकांचे रक्षण करावे लागत आहे, रात्री-बेरात्री पिकांच्या सुरक्षेसाठी शेतकऱ्यांना जागरण करावे लागते, वन्यप्राण्यांकडून हजारो रुपये किंमतीच्या मालाची नुकसान होत असताना वनविभाग तुटपुंजी मदत करून वेळ काढून नेत असते. वनविभागाकडून यावर कोणतीही उपाय योजना केली जात नसून याकडे दुर्लक्ष केल्या जात आहे, वन्यप्राण्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांना तात्काळ आर्थिक मदत करन्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...