सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी.
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
Reg No. MH-36-0010493
यवतमाळ (वणी) : मागील काही दिवसांमध्ये नागरीकाच्या बँक खात्यातील पैसे आपोआप इतर जिल्हयातुन तसेच पर राज्यातुन विड्रॉल
होत असल्याच्या तक्रारी शहरातील पोलीस स्टेशन व सायबर सेल येथे प्राप्त झाल्या. यानुसार पोलीस स्टेशन अवधुतवाडी
येथे अप.क्र. ९५४/२०२१ कलम ४२० भादवि प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला. या घटनाची गांभिर्याने दखल घेत सदर
प्रकरण हे तांत्रीक बाबींशी संबंधीत असल्याने मा. पोलीस अधीक्षक, यवतमाळ यांनी सदर प्रकरणाचा समांतर तपास
करण्याचा आदेश सायबर सेल यांना दिला.
सदर गुन्हयाचा समांतर तपास करीत असतांना सायबर सेल पथकास असे निर्दशनास आले की, दि. १५/०९/२०२१
रोजी यवतमाळ शहरातील साई सत्यजोत मंगल कार्यालय येथिल एसबिआय बँक एटीएम मध्ये, व दि. १६/०९/२०२१ रोजी
व अँग्लो हिंन्दी हाई स्कुल जवळील एसबिआय एटिएम मध्ये अज्ञात आरोपीतांनी इंटरनल क्लोनर बसवुन त्याव्दारे एटिएम
कार्ड क्लोन केले व त्याव्दारे डुप्लिकेट एटिएम कार्ड तयार करुन नागरिकाच्या बँक खात्यातुन पैसे लंपास केले. सदरचा
दुवा हाती लागताच सायबर पथकाने आपल्या तांत्रीक कौशल्याचा आधारावर तांत्रीक बाबीचे संकलन व पृथ्थकरण करुन
गुन्हयातील आरोपी निष्पण करीत थेट बिहार गाठले व गुन्हयातील मुख्य आरोपी नामे १) सुकेशकुमार अनिल सिंग रा. जि.
गया राज्य बिहार व २) सुधिर कुमार निर्मल पांडे रा. जि. गया बिहार यांना जिल्हा गया राज्य बिहार येथुन ताब्यात घेतले.
दोन्ही आरोपीतांच्या ताब्यातुन १ इंटरनल एटिएम स्कॅनर, १ हॅन्ड एटिएम स्कॅनर, १ बनावट एटिएम तयार करण्यासाठी
लागणारे स्किमर, १५ एटिएम, इतर साहीत्य व नगदी असा एकुण १,२८,४५०/- रु चा मुददेमाल जप्त करुन दोन्ही आरोपी
पुढिल तपासकामी पोलीस स्टेशन अवधुतवाडी यांचे ताब्यात देण्यात आले. सदर आरोपी यांनी महाराष्ट्र, उत्तरप्रदेश,
बिहार, पच्छिम बंगाल, झारखंड मध्ये अशा प्रकारचे अनेक गुन्हे केले आहे.
सदरची कार्यवाही डॉ. दिलीप पाटील-भुजबल पोलीस अधीक्षक, यवतमाळ, डॉ. के. ए. धरणे अपर पोलीस
अधिक्षक, यवतमाळ यांच्या आदेशाने प्रदिप परदेशी, पोलीस निरीक्षक स्थागुशा यवतमाळ व दिपमाला भेंडे पोलीस
निरीक्षक सायबर सेल, यवतमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अमोल पुरी, पोहवा गजानन डोंगरे, पोना विशाल भगत,
पोना कविश पाळेकर, पोना उल्हास कुरकुटे, पोकॉ अजय निंबोळकर, पंकज गिरी, सतिष सोनोने मपोकॉ रोशनि जोगळेकर,
प्रगती कांबळे सर्व नेमणुक सायबर सेल, यवतमाळ यांनी पारपाडली.
ATM हाताळतांना घ्यावयाची दक्षता
१) ATM मध्ये प्रवेश करतेवेळी एकावेळेस एकाच व्यक्तीने प्रवेश करावा आपल्या व्यतिरीक्त मध्ये कोणी असल्यात
त्यास टोकावे.
२) ATM मध्ये प्रवेश केल्यानंतर ATM मशीनमध्ये काही संशयास्पद आढळून आल्यास त्याची ATM गार्ड कडून
शहानिशा करावी.
३) ATM मशीन मध्ये ATM Code हा कोणालाही दिसनार नाही अशा पध्दतीने टाकावा.
४) ATM मशीन मध्ये ATM Code टाकता वेळेस अनोळखी व्यक्तीची मदत घेवू नये, तसेच आपला ATM
Code कोणालाही सांगू नये.
५) ATM card अनोळखी व्यक्तीच्या हातात देवू नये.
६) ATM card वर पासवर्ड लिहून ठेवू नये.अस्या सूचना पोलीस सायबर कडून देण्यात आल्या आहे.
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
वणी : वणीचे विकास पुरुष म्हणून ओळखले जाणारे महायुतीचे भाजपाचे उमेदवार आ.संजिवरेड्डी बोदकुरवार यांचे राजकीय व सामाजिक...
वणी:- विपुल खनिज संपत्तीने नटलेल्या वणी विभागाची सत्तेतील नेत्यांनी वाट लावली आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहे. तरुणाच्या...
:- वणी आज दिनांक ५ नोव्हेंबर रोजी सकाळी वणी वरोरा मार्गावरील रेल्वे गेटच्या बाजूला अनोळखी इसमाने गळफास घेतलेल्या...