विरकुंड येथे “आमदार चषक” कबड्डीच्या सामन्याचे आयोजन, “जय बजरंग क्रिडा मंडळ” विरकुंड तर्फे लाखोंच्या बक्षिसाची लय लुट .
वणी ः- तालुक्यातील अतिशय प्रसिध्द असलेल्या नवेगाव ( विरकुंड ) येथे “आमदार चषक” जय बजरंग क्रिडा मंडळाच्या वतीने भव्य-दिव्य...
Reg No. MH-36-0010493
वणी:- विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अध्ययन- अध्यापना बरोबरच,शालेय क्रीडा स्पर्धा, आनंद मेळावा, सांस्कृतिक कार्यक्रम अश्या विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी वणी शहरातील प्रसिद्ध मॅकरून स्टुडंट्स अकॅडमी सि.बी.एस.ई स्कूलमध्ये 'द रिदम् वे टू एक्स्प्रेस' वार्षिक स्नेहसंमेलन 31जानेवारी रोजी एस.बी.लॉन येथे मोठ्या उत्साहात पार पडले
या 'द रिदम् वे टू एक्स्प्रेस' वार्षिक स्नेह संमेलन कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी व उद्गाटक म्हणून शिक्षणमहर्षी पी.एस.आंबटकर तर सत्कारमूर्ती म्हणून वणी विधानसभेचे विद्यमान आमदार संजय देरकर व शाळेचे उपसंचालक पियूष आंबटकर तसेच प्रमूख पाहूणे म्हणुन वणी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी किशोर गज्जलवार, वाहतूक शाखा प्रमूख सिता वाघमारे, डायरेक्टर ऑफ एम.एस.पी.एम अंकिता आंबटकर, डायरेक्टर ऑफ पॅरमाऊंट प्रांजली रघताटे,डायरेक्टर ऑफ सोमय्या पायल आंबटकर, वणी शाळेचा मुख्यद्यापिका शोभना आणि एम.एस.पी.एम ग्रुपचे सर्व मुख्यध्यापक उपस्थित होते. या मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.यात सर्वात आधी मुख्यध्यापिका शोभना यांनी वर्षभराचा कार्यआलेखाचा पाढा वाचला तसेच पालकांनी फक्त अभ्यासावरच लक्ष केंद्रित करण्यापेक्षा कला , क्रीडा यासारख्या इतर क्षेत्रातही विद्यार्थ्यांना झेप घेण्यास प्रोत्साहित करावे,असे प्रतिपादन अध्यक्षीय भाषणात पि. एस आंबटकर यांनी केले.या वार्षिक समारंभात प्ले ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी मराठी व हिंदी एकांकिका, गायन, पारंपारिक नृत्य, कोळीगीते आणि देशभक्तीपर गीते ,झांसी की राणी चे ऐतिहासिक प्रसंग,आईचे प्रेम, सायबर क्राईम यासारख्या सामाजिक उद्बोधन दर्शविणाऱ्या तर दमलेल्या बाबाची कहाणी यासारख्या मनाला स्पर्श करणाऱ्या भावनिक तसेच हेरा फेरी सारख्या हास्याचे फवारे उडवणाऱ्या थीम मधून चिमुकल्यांनी आपल्या कलागुणांच्या सादरीकरणाने उपस्थितांचे मने जिंकून घेतले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका शोभना यांनी केलें .
तर अर्चना व रूपाली यांनी सूत्रसंचालन करून मान्यवर तथा पालकांच्या तोंडून वाहवा मिळवली. तर कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक कमिटी यांच्या मार्गदर्शनात पार पडले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.
वणी ः- तालुक्यातील अतिशय प्रसिध्द असलेल्या नवेगाव ( विरकुंड ) येथे “आमदार चषक” जय बजरंग क्रिडा मंडळाच्या वतीने भव्य-दिव्य...
*निःशुल्क बौद्ध धम्मीय मेळावा नागभिड येथे संपन्न* परिचय मेळाव्यातून वेळ आणि पैशाची बचत होवून लग्न जुळणे सोपे होते ✍️गडचिरोली...
वणी: पहाड वनमाळी समाज वणी शाखेच्या वतीने स्नेहमिलन सोहळा उत्साहात साजरा झाला. मकर संक्रांतिनिमित्त हा कार्यक्रम स्थानिक...
वणी -राज्यातील जनतेच्या घरी घरगुती विद्युत मिटर व्यवस्थित सुरु असतांना भांडवली कंपनीला खुश करण्यासाठी जुने मिटर...
*अर्थसंकल्पीय प्रतिक्रया आमदार.देवराव भोंगळे* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-सर्वप्रथम केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती...
वणी:- विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अध्ययन- अध्यापना बरोबरच,शालेय क्रीडा स्पर्धा, आनंद मेळावा, सांस्कृतिक...
वणी ः- तालुक्यातील अतिशय प्रसिध्द असलेल्या नवेगाव ( विरकुंड ) येथे “आमदार चषक” जय बजरंग क्रिडा मंडळाच्या वतीने भव्य-दिव्य...
वणी: पहाड वनमाळी समाज वणी शाखेच्या वतीने स्नेहमिलन सोहळा उत्साहात साजरा झाला. मकर संक्रांतिनिमित्त हा कार्यक्रम स्थानिक...
वणी -राज्यातील जनतेच्या घरी घरगुती विद्युत मिटर व्यवस्थित सुरु असतांना भांडवली कंपनीला खुश करण्यासाठी जुने मिटर...