Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / वणी वकील संघाची निवडणुक...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

वणी वकील संघाची निवडणुक चुरशीची लढाईत एकता पॅनल विजयी.

वणी वकील संघाची निवडणुक चुरशीची लढाईत एकता पॅनल विजयी.

वणी : वणी बार  असोसिएशन  वणी वकील संघ  ची २०२५  पुढील नवीन तीन वर्षासाठी ११ सदस्यासाठी दिनांक २५ जानेवारी रोजी  झालेल्या निवडणुकीत एकता पॅनल व विकास पॅनल मध्ये झालेल्या चुरशीच्या लढाईत ॲड. वीरेंद्र महाजन यांच्या एकता पॅनल चे  ७ तर ॲड. निलेश चौधरी यांचा विकास पॅनल चे ४ सभासद निवडून आले. १०५ अंतिम मतदार यादीतील १०२ वकिलांनी मतदानात भाग घेऊन आपल्या मताचा कौल दिला. निवडणूक निर्णय अधिकारी ॲड. शाम गायकवाड यांनी दिवसभर निवडणुक प्रक्रिया योग्य पद्धतीने सांभाळून पारदर्शकपणे निवडणूक निकालाची सायंकाळी ७ वाजता घोषणा केली.

निवडणूक निकालाची ॲड. शाम गायकवाड यांनी घोषणा केल्यानंतर ॲड. वीरेंद्र महाजन यांच्या एकता पॅनल ने गुलाल उधळून व बँड च्या तालावर नाचून आपला विजय साजरा केला.

ॲड. निलेश चौधरी व ॲड. वीरेंद्र महाजन यांनी आपापल्या पॅनल ला निवडून आणण्यासाठी प्रत्येक वकिलांची प्रत्यक्ष घरोघरी भेट देऊन आपली भूमिका पटवून देण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी दोन्ही पॅनल नी घोषणा पत्रके सुद्धा प्रकाशित केली होती. वणी दिवाणी व फौजदारी न्यायालयात वकिलांचे अनेक प्रश्न असल्याने या निवडणुकीत त्याला वाचा फोडण्याचे महत्त्वाचे कार्य झाले. दोन्ही पॅनल नी आपल्या घोषणा पत्रकात अनेक महत्त्वाचे मुद्दे पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु या निवडणुकीत ॲड. वीरेंद्र महाजन यांच्या एकता पॅनल ने बाजी मारत अध्यक्ष पद ॲड. वीरेंद्र महाजन, उपाध्यक्ष पद ॲड. यशवंत बरडे, सचिव पद ॲड. अमोल टोंगे, सहसचिव पद ॲड. रामेश्वर लोणारे आणि तीन सदस्य पदे ॲड. दिलीप परचाके, ॲड. चंदू भगत व ॲड. आकाश निखाडे अशी ७ पदे खेचून घेतली तर ॲड. निलेश चौधरी यांच्या पॅनल ने कोषाध्यक्ष पद ॲड. प्रेम धगडी व सदस्य पदे ॲड. दुष्यंत बोरुले, ॲड. अविनाश बोधाने व ॲड. प्रतीक्षा शेंडे अशा ४ पदावर समाधान मानावे लागले. स्वतः ॲड. निलेश चौधरीला अध्यक्ष पदासाठी झालेल्या या निवडणुकीत फार कमी मताने पराभवाला सामोरे जावे लागले. एकता व विकास पॅनल मध्ये विकास  पॅनल चा विजय झाला. 

वणी दिवाणी व फौजदारी न्यायालयात वकीलांसाठी बसण्यासाठी जागा, महिला वकिलांसाठी विशेष बार रूम, नवीन दिवाणी न्यायधीस वरिष्ठ स्तर व अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाची इमारत उभी करणे, परीक्षा देणाऱ्या वकीलांसाठी प्रशिक्षण शिबिर घेणे, ई विधी ग्रंथालय उभारणे, तिन्ही भाषेतील वृत्तपत्रे सुरू करणे, अत्याधुनिक कॅन्टीन, वकिलांचा वाहनांसाठी पार्किंग, महसूल कार्यालयात वकिलांना येणाऱ्या अडचणी दूर करणे, दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर सुरू करणे, आदी व अन्य प्रश्नाची सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असे आवाहन केले.

ताज्या बातम्या

शासकीय मैदानावर ध्वजारोहनासह सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न. 27 January, 2025

शासकीय मैदानावर ध्वजारोहनासह सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न.

वणी:- भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 75 वा वर्धापन दिन वणी तालुक्यात ठिकठिकाणी ध्वजारोहण व सांस्कृतिक कार्यक्रम घेवून साजरा...

जनता विद्यालय वणी चा विद्यार्थी रक्षक मदन पेंदाणे राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेत बेस्ट डान्सर अवार्ड ने सन्मानीत 27 January, 2025

जनता विद्यालय वणी चा विद्यार्थी रक्षक मदन पेंदाणे राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेत बेस्ट डान्सर अवार्ड ने सन्मानीत

वणी :जनता विद्यालय वणीचा विद्यार्थी रक्षक मदन पेंदाणे वर्ग 6 वा तुकडी- अ हा पुणे येथे आयोजित राज्यस्तरीय आंतरशालेय...

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल,वणी येथे प्रजासत्ताक दिन साजरा. 27 January, 2025

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल,वणी येथे प्रजासत्ताक दिन साजरा.

वणी:- मार्कंडेय पोदार लर्न स्कुल वणी येथे ७६ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुणे शाळेचे...

वणी वकील संघाची निवडणुक चुरशीची लढाईत एकता पॅनल विजयी. 25 January, 2025

वणी वकील संघाची निवडणुक चुरशीची लढाईत एकता पॅनल विजयी.

वणी : वणी बार असोसिएशन वणी वकील संघ ची २०२५ पुढील नवीन तीन वर्षासाठी ११ सदस्यासाठी दिनांक २५ जानेवारी रोजी...

वणी शहरातील  हॉटेल आपला राजवाडा येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त स्वातंत्र्य सेनानी, भारतीय सैनिक व पोलीस कर्मचाऱ्यांना 10 टक्के भव्य सूट. 25 January, 2025

वणी शहरातील हॉटेल आपला राजवाडा येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त स्वातंत्र्य सेनानी, भारतीय सैनिक व पोलीस कर्मचाऱ्यांना 10 टक्के भव्य सूट.

वणी : वणी शहरातील व परिसरातील खास खव्ययांसाठी व्हेज -नॉनव्हेज पदार्थांची विशेष मेजवानी सह भरपूर वरायटी युक्त हॉटेल...

*गडचांदुरात ६० रक्तदात्यांनी केले रक्तदान* 25 January, 2025

*गडचांदुरात ६० रक्तदात्यांनी केले रक्तदान*

*गडचांदुरात ६० रक्तदात्यांनी केले रक्तदान* ✍️दिनेश झाडे गडचांदूर कोरपना:-चंद्रपूर जिल्हा व कोरपना - जिवती तालुका...

वणीतील बातम्या

शासकीय मैदानावर ध्वजारोहनासह सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न.

वणी:- भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 75 वा वर्धापन दिन वणी तालुक्यात ठिकठिकाणी ध्वजारोहण व सांस्कृतिक कार्यक्रम घेवून साजरा...

जनता विद्यालय वणी चा विद्यार्थी रक्षक मदन पेंदाणे राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेत बेस्ट डान्सर अवार्ड ने सन्मानीत

वणी :जनता विद्यालय वणीचा विद्यार्थी रक्षक मदन पेंदाणे वर्ग 6 वा तुकडी- अ हा पुणे येथे आयोजित राज्यस्तरीय आंतरशालेय...

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल,वणी येथे प्रजासत्ताक दिन साजरा.

वणी:- मार्कंडेय पोदार लर्न स्कुल वणी येथे ७६ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुणे शाळेचे...