शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन व मॅराथॉन स्पर्धा.
वणी : हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जयंतीनिमित्त सकाळी ७ वाजता...
Reg No. MH-36-0010493
वणी : हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जयंतीनिमित्त सकाळी ७ वाजता शिवतिर्थावर भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन आमदार संजय देरकर यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांचे नेतृत्वात करण्यात आले होते.
या स्पर्धेत मुलामुलींचे ओपन गट मुले/मुली व 16 वर्षा खालील मुले-मुली असे चार गटात विभागणी करण्यात आली होती. मुलांच्या गटातून क्रिश सचिंद्र मिस्त्री याने पहिला क्रमांक पटकाविला, दुसरे ओम विश्वजीत गारघाटे तर तिसरे बक्षिस कुणाल विठ्ठल तोडासे व चौथे बक्षिस रोहित दादाजी ढेंगळे यांनी पटकाविले. मुलींच्या ओपन गटातून पहिले बक्षीस अंजली देवराव पचारे, दुसरे गायत्री मंगेश खोंडे, तिसरे बक्षीस अस्मिता मनोज वाळके व चौथे बक्षिस आचल संदीप झिले हिने पटकावले. तसेच 16 वर्षा आतील मुलांच्या गटातून निल शंकर नाने याने प्रथम बाक्षिस पटकाविले. दुसरे हसन सय्यद तर तिसरे शिवम भोलेनाथ ओझा, तर चौथे बक्षिस वीर गुलाब तांबेकर यांनी तसेच 16 वर्षा आतील मुलींच्या गटातून प्रथम बक्षिस वैष्णवी दिनेश मेश्राम, दुसरे श्रुती बापूराव मडावी, तर तिसरे बक्षिस शिल्पा लक्ष्मण आत्राम, चौथे बक्षिस प्रांजली विलास डोहे यांनी पटकावले आहेत.
यावेळी विजेत्यांना रोख रक्कम देऊन स्पर्धेमध्ये सर्वात लहान धावपटू मुले व नाझिया मिर्झा ऑल इंडिया चॅम्पियन औरंगाबाद यांना पारितोषिक व शिल्ड देऊन सन्मानित करण्यात आले. दरम्यान,वणी शहरातील स्केटिंग स्पर्धकांनी स्केटिंग चे प्रात्यक्षिक करून उपस्थितांची मने जिंकली. याप्रसंगी त्यांचे शिवसेना युवासेनेकडून सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
विदर्भ कन्या स्केटिंग मास्टर मनस्वी हिचा सत्कार करून
तरुण पिढीला संदेश व त्यांचा आत्मविश्वास वाढविण्याकरिता विदर्भ कन्या स्केटिंग मास्टर ही बोटोणी ते वणी हे 30 किमी अंतर स्केटिंग करत वणी शहरात साडे अकरा वाजता वं. बाळासाहेब ठाकरे स्मारक येथे दाखल झाली. तिचं युवासेने च्या वतीने शाल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
दरम्यान, हिंदुहृदयसम्राट वं. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला अभिवादन करून नंतर शिवसेना युवासेने तर्फे अगदी लहान वयात स्केटिंग मध्ये 104 पदक पटकावणारी मनस्वीच्या आईवडिलांचा देखील सन्मान केला.
यावेळी समाजसेविका किरणताई संजय देरकर, युवासेना उपजिल्हाप्रमुख अजिंक्य शेंडे, माजी शिवसेना शहर प्रमुख राजु तुरणकर, चिखलगाव सरपंच रुपालीताई कातकडे, सुरेखा ढेंगळे, माधुरी सुंकुरवार, मिनाक्षी मोहिते, प्रकाश कऱ्हाड, क्रीडाप्रशिक्षक महेश पहापले, संतोष बेलेकर, गणेश मोहितकर, जगदीश ठावरी, आनंद घोटेकर, सुरेश शेंडे, संजोग झाडे, तुळशीराम काकडे, प्रविण खानझोडे, मिलिंद बावणे, मंगल भोंगळे, मनीष बत्रा, गणेश जूनगरी, चेतन उलमले, विवेक ठाकरे, व सूरज चाटे आदी उपस्थित होते.
वणी : हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जयंतीनिमित्त सकाळी ७ वाजता...
*पोटेगांव सर्कलच्या समस्या खासदार किरसान यांनी जाणुन घेतल्या* ✍️गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-चिमूर लोकसभा...
वणी :शहराचं सुसज्ज आणि अत्याधुनिक व्यापार पेठ म्हणून यवतमाळ रोडवरील शेवाळकर व्यापारी संकुलाकडे पाहिले जाते. याच व्यापारी...
*सावंगी ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार रेती घाट मालकाने विनापरवानगी चक्क खांबावरचे दिवे बदलले* ✍️मुनिश्वर बोरकर ...
वणी:- वणी नगरपरिषद शताब्दी महोत्सवानिमित्त भव्य शहर स्तरीय भिंतीचित्र महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.स्वच्छ भारत...
*प्रशासनाची दिरंगाई कंपनीची मुजोरी* *आदिवासी कोलामाचे शोषन गुन्हे दाखल करावेत* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा...
वणी :शहराचं सुसज्ज आणि अत्याधुनिक व्यापार पेठ म्हणून यवतमाळ रोडवरील शेवाळकर व्यापारी संकुलाकडे पाहिले जाते. याच व्यापारी...
वणी:- वणी नगरपरिषद शताब्दी महोत्सवानिमित्त भव्य शहर स्तरीय भिंतीचित्र महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.स्वच्छ भारत...
वणी:- शिवसेनाप्रमुख हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेच्या वतीने वणी शहरात बाळासाहेबांच्या...