शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन व मॅराथॉन स्पर्धा.
वणी : हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जयंतीनिमित्त सकाळी ७ वाजता...
Reg No. MH-36-0010493
वणी :शहराचं सुसज्ज आणि अत्याधुनिक व्यापार पेठ म्हणून यवतमाळ रोडवरील शेवाळकर व्यापारी संकुलाकडे पाहिले जाते. याच व्यापारी संकुलनामध्ये रिलायन्स कंपनीचे मॉल असून या ठिकाणी अनेक खाद्यपदार्थ जीवन आवश्यक वस्तू कपडे व इतर साहित्य एका छताकडे मिळत असल्याने वेळेची बचत होईल म्हणून शहरातील व परिसरातील ग्राहकांचा कल या मॉल कडे आहे. परंतु गर्दीचा आणि ग्राहकांच्या घाई गडबडीचा फायदा घेत रिलायन्स मॉल मध्ये मुद्दत बाह्य खाद्यपदार्थ व वस्तूं ग्राहकांच्या माथी मारण्यात येत असल्याची बाब उघडकीस आली. यासंबंधी मनसेचे माजी तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांनी दिनांक (२१ जानेवारी ) रोजी स्टिंग ऑपरेशन करून हे वास्तव समोर आणले.
सदर मॉलमध्ये उपलब्ध असणारे खाद्यपदार्थ ज्यात बिस्किट,चॉकलेट, आटा, साबण, खाद्यतेल, तीळ, शेंगदाणे, पापडी, वेफर्स यासह अनेक खाद्यपदार्थ व जीवनावश्यक वस्तूंची विक्री मुदत संपलेली असताना सुद्धा ते या ठिकाणी विक्रीसाठी ठेवण्यात आलेले आहे. नुकताच असा काहीसा प्रकार अमरावती शहरातील एका मॉलमध्ये घडल्या गेला ज्यात बिस्किटामध्ये अळ्या निघाल्याची बाब उघडकीस आली होती. ही बाब समोर येतात अन्न व औषध प्रशासनाने सावध घेतला होता. व संबंधितांवर कारवाई केली. मात्र वणी शहरातील रिलायन्स मॉलमध्ये मुद्दत बाह्य खाद्यपदार्थांची वस्तूची सर्रास विक्री होत असताना अन्न व औषध प्रशासन याकडे पूर्णतः दुर्लक्ष करत असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला. मुद्दत बाह्य खाद्यपदार्थ व वस्तूंच्या विक्रीतून ग्राहकांची आर्थिक फसवणूक होत असून या पदार्थांच्या सेवनातून ग्राहकांच्या आरोग्यावरील मोठा परिणाम होत आहे. त्यामुळे या मॉल च्या सर्व साहित्य व खाद्यपदार्थांची चौकशी करून या मॉल वर खाद्यपदार्थ व जीवनावश्यक वस्तू विकण्यासाठी मज्जाव आणावा व ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या मॉल चालकांवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करावे अशी मागणी मनसेचे माजी तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांनी सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन, यवतमाळ यांच्याकडे दिलेल्या निवेदनातून केली आहे.
वणी : हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जयंतीनिमित्त सकाळी ७ वाजता...
*पोटेगांव सर्कलच्या समस्या खासदार किरसान यांनी जाणुन घेतल्या* ✍️गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-चिमूर लोकसभा...
वणी :शहराचं सुसज्ज आणि अत्याधुनिक व्यापार पेठ म्हणून यवतमाळ रोडवरील शेवाळकर व्यापारी संकुलाकडे पाहिले जाते. याच व्यापारी...
*सावंगी ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार रेती घाट मालकाने विनापरवानगी चक्क खांबावरचे दिवे बदलले* ✍️मुनिश्वर बोरकर ...
वणी:- वणी नगरपरिषद शताब्दी महोत्सवानिमित्त भव्य शहर स्तरीय भिंतीचित्र महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.स्वच्छ भारत...
*प्रशासनाची दिरंगाई कंपनीची मुजोरी* *आदिवासी कोलामाचे शोषन गुन्हे दाखल करावेत* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा...
वणी : हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जयंतीनिमित्त सकाळी ७ वाजता...
वणी:- वणी नगरपरिषद शताब्दी महोत्सवानिमित्त भव्य शहर स्तरीय भिंतीचित्र महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.स्वच्छ भारत...
वणी:- शिवसेनाप्रमुख हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेच्या वतीने वणी शहरात बाळासाहेबांच्या...