Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / हिंदरत्न मनस्वीचे मनसेने...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

हिंदरत्न मनस्वीचे मनसेने वणीत केले जंगी स्वागत

हिंदरत्न मनस्वीचे मनसेने वणीत केले जंगी स्वागत

रोटरी क्लब ऑफ ब्लँक डायमंड सिटी वणी यांचाही सहभाग

वणी: बोटोनी सारख्या ग्रामीण भागातून येऊन कमी वयात स्केटिंग गोल्ड मेडलिस्ट ठरलेली मनस्वीने आज "३० की.मी. स्केटिंग फॉर युवा" बोटोणी ते वणी हे ३० किलोमीटरचे अंतर स्केटिंग करून गाठले आहे. याबद्दल आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षनेते राजू उंबरकर यांच्या वतीने शहरातील छत्रपती चौकात तिचे भव्य दिव्य स्वागत करण्यात आले.३० की. मी. स्केटिंग फॉर युवा अंतर्गत आज मनस्वीने मारेगाव तालुक्यातील बोटोनी येथून सकाळी ०८.०० वाजता स्केटिंग साठी सुरूवात करून यवतमाळ ते वणी महामार्गावरून हे ३० की. मी. चे अंतर अवघ्या २ तासात पार केले. या स्केटिंग दरम्यान तिचे गावोगावी स्वागत करण्यात आले. ०८.३० वाजता मनस्वी ने मारेगाव गाठल्या नंतर तिचे स्वागत करण्यात आले. यानंतर तिने वणीकडे प्रस्थान केले.

मनस्वीने बाल वयातच पराक्रमाचं उंच शिखर गाठलं आहे. तिने आपल्या पराक्रमाने गाव व तालुक्याचं नाव उंचावलं आहे. कुणालाही हेवा वाटावा असं कर्तृत्व तिनं केलं आहे. स्केटिंगमध्ये १०४ सुवर्ण पदकं पटकावणारी मनस्वी तरुण पिढीला संदेश देण्याकरिता व त्यांचा आत्मविश्वास वाढविण्याकरिता बोटोणी वरून वणी येथे स्केटिंग केले. तिच्या जिद्द व पराक्रमाचा सन्मान व्हावा म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना या बाल स्केटिंग पटूचं शहरात भव्य स्वागत करण्यात आले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य नेते राजू उंबरकर यांनी हुरहुन्नरी व कर्तबगार मुलामुलींना यशस्वी वाटचालीकरता नेहमीच प्रोत्साहन देत असतात. मनस्वीने कमी वयात यशाचे उत्तुंग शिखर गाठल्याबद्दल तिचे अभिनंदन करतांनाच ती यशाचे नवनवीन शिखर गाठत राहावी, याकरिता राजू उंबरकर यांनी शहरातील छत्रपती चौकात फटाक्याच्या आतिषबाजीत भव्य दिव्य स्वागत करून तिला शाल, सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देत तिचे स्वागत केले व तिला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तर यापुढें मनस्वीला तिच्या क्षेत्रांत कुठचीही अडचण आल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना तिच्या सोबत खंबीरपणे उभी राहणार असल्याची ग्वाही दिली.

तिने याआधी बोटोणी ते मारेगाव हे १२ किमी नंतर स्केटिंग करून पार केले होते. आई - वडिलांच्या या मेहनती बद्दल आणि तिला या शिक्षणाचे धडे दिल्या बद्दल प्रशिक्षक प्रशांतजी मल यांचे सुद्धा मनसेने आभार व्यक्त केले. तर या स्वागत समारंभात रोटरी क्लब ऑफ ब्लँक डायमंड सिटी वणीने सुद्धा सक्रिय सहभाग घेऊन मनस्वीचे स्वागत केले व शुभेच्छा दिल्या.या प्रसंगी मनसेचे माजी सभापती धनंजय त्रिंबके, महिला जिल्हाध्यक्षा अर्चना बोदाडकर, फाल्गुन गोहोकार, रुपेश ढोके, गोविंदराव थेरे, रमेश पेचे, राजू बोदाडकर, रणजीत बोंडे, सौ. सिंधू बेसकर, वैशाली तायडे, सौ. स्नेहा विशाल पिंपरे, मेघा तांबेकर, अंकुश बोढे, गुड्डू वैद्य, गितेश वैद्य, मयूर गेडाम, मयूर घाटोळे, उदय खिरटकर, वसंता घोटेकर, धीरज पिदुरकर, अमर राजूरकर, गोवर्धन पीदुरकर, गजानन बोंडे, विनोद गोहोकार, स्वप्निल कांबळे, प्रतिक बुरडकर, संस्कार तेलतुंबडे, कृष्णा कुकडेजा, तर रोटरी क्लबचे अध्यक्ष परेश पटेल, उपाध्यक्ष अश्विन कोंडावार, सचिव धवन अग्रवाल, निकेत गुप्ता, अंकुश जयस्वाल, अनिल उत्तरवार, आशिष गुप्ता यांच्या सह सर्व सदस्य उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हरीश कामारकर तर आभार शुभम पिंपळकर यांनी व्यक्त केले.

ताज्या बातम्या

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप. 23 January, 2025

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप.

वणी:- हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे अवचित साधून, वणी येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले नगरपरिषद...

मुंगोली येथील नागरिकांना पुनर्वसण ठिकाणी प्लॉट वाटप करा, विजय पिदुरकर यांची मागणी. 23 January, 2025

मुंगोली येथील नागरिकांना पुनर्वसण ठिकाणी प्लॉट वाटप करा, विजय पिदुरकर यांची मागणी.

वणी:- तालुक्यातील मुंगोली गावातील सर्व जमीन वेकोलीने अधिग्रहण केली. जमिनीसह गावाचे पुनर्वसन करणे हे विकोलीच्या प्रस्तावात...

हिंदरत्न मनस्वीचे मनसेने वणीत केले जंगी स्वागत 23 January, 2025

हिंदरत्न मनस्वीचे मनसेने वणीत केले जंगी स्वागत

वणी: बोटोनी सारख्या ग्रामीण भागातून येऊन कमी वयात स्केटिंग गोल्ड मेडलिस्ट ठरलेली मनस्वीने आज "३० की.मी. स्केटिंग फॉर...

*निधन वार्ता* 23 January, 2025

*निधन वार्ता*

*निधन वार्ता* वार्ता राजू गोरे चंद्रपूर प्रतिनिधी - चिकणी नजीक शेगांव (खुर्द ) ता. वरोरा जि. चंद्रपूर येथील पंचक्रोशीत...

ग्रामीण रुग्णालय वणी व ट्रामाकेअर युनिट यांची जोडणी करून रक्त साठा युनिटची व्यवस्था  तात्काळ करा. 23 January, 2025

ग्रामीण रुग्णालय वणी व ट्रामाकेअर युनिट यांची जोडणी करून रक्त साठा युनिटची व्यवस्था तात्काळ करा.

वणी:-ग्रामीण रुग्णालय वणी येथील ट्रॉमा केअर युनिट हे ग्रामीण रुग्णालयापासून अलग असल्याने ते रूग्णांकरिता सुविधा...

*भारतीय बेरोजगार मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी मार्फत राष्ट्रपतीं यांना भारतीय जवानांना न्याय देण्यास निवेदन* 22 January, 2025

*भारतीय बेरोजगार मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी मार्फत राष्ट्रपतीं यांना भारतीय जवानांना न्याय देण्यास निवेदन*

*भारतीय बेरोजगार मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी मार्फत राष्ट्रपतीं यांना भारतीय जवानांना न्याय देण्यास निवेदन* ✍️मुनिश्वर...

वणीतील बातम्या

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप.

वणी:- हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे अवचित साधून, वणी येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले नगरपरिषद...

मुंगोली येथील नागरिकांना पुनर्वसण ठिकाणी प्लॉट वाटप करा, विजय पिदुरकर यांची मागणी.

वणी:- तालुक्यातील मुंगोली गावातील सर्व जमीन वेकोलीने अधिग्रहण केली. जमिनीसह गावाचे पुनर्वसन करणे हे विकोलीच्या प्रस्तावात...

ग्रामीण रुग्णालय वणी व ट्रामाकेअर युनिट यांची जोडणी करून रक्त साठा युनिटची व्यवस्था तात्काळ करा.

वणी:-ग्रामीण रुग्णालय वणी येथील ट्रॉमा केअर युनिट हे ग्रामीण रुग्णालयापासून अलग असल्याने ते रूग्णांकरिता सुविधा...