Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / ग्रामीण रुग्णालय वणी...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

ग्रामीण रुग्णालय वणी व ट्रामाकेअर युनिट यांची जोडणी करून रक्त साठा युनिटची व्यवस्था तात्काळ करा.

ग्रामीण रुग्णालय वणी व ट्रामाकेअर युनिट यांची जोडणी करून रक्त साठा युनिटची व्यवस्था  तात्काळ करा.

नि: स्वार्थ सेवा 24 तास रक्तदान व सामाजिक संघटना वणी यांची मागणी.

वणी:-ग्रामीण रुग्णालय वणी  येथील ट्रॉमा केअर युनिट  हे ग्रामीण रुग्णालयापासून अलग असल्याने ते रूग्णांकरिता सुविधा जनक होत नाही. ते एकत्र जोडण्यात यावे जेणेकरून रुग्णांचा होणारा त्रास कमी होईल व त्यांना सुविधा मिळेल तसेच तेथे रक्त साठा युनिटची व्यवस्था करण्यात यावी, यासाठी नि:स्वार्थ सेवा २४ तास रक्तदान व सामाजिक संघटनेच्या वतीने २२ जानेवारी रोजी उपविभागीय अधिकारी वणी यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले.  वणी हे तालुक्याचे ठिकाण असून हा परिसर वेकोलीचा असल्याने या   भागात मोठ्या प्रमाणात जड वाहनांची रहदारी असते त्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत, त्या अपघातात गंभीर जखमींना अतिरक्तस्राव झाल्यास त्यांचा मृत्यू होत आहे. करिता वणी ग्रामीण रुग्णालयात  रक्त साठा युनिटची निर्मिती केल्यास बऱ्याच अपघातात जखमी झालेल्या रुग्णांचे जीव वाचू शकतात कारण वणी पासून चंद्रपूर हे ७० किलोमीटर यवतमाळ हे १२० किलोमीटर, नागपूर १३० अंतरावर आहे त्यामुळे रुग्णांना तेथे पोहोचण्यास उशीर होतो व रुग्ण दगावतो तसेच डिलेव्हरी झालेल्या महिलांना सुद्धा कधीकधी रक्ताची आवश्यकता पडते त्यांना सुद्धा रक्त साठा युनिटचा उपयोग होऊ शकतो करिता ग्रामीण रुग्णालय वणी येथे रक्त साठा युनिटची निर्मिती त्वरित करण्यात यावी ही या परिसरातील नागरिकांची मागणी आहे. यापूर्वी सुद्धा या समितीने वारंवार पत्रव्यवहार करून मागणी केली आहे. पण त्याकडे अजून पर्यंत कोणीही लक्ष दिलेले नाही. करिता  रक्त साठा युनिट, ग्रामीण रुग्णालय व ट्रामाकेअर  युनिट हे एकत्र करण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे. या मागणीला गांभीर्याने घेता दुर्लक्ष केले व या भागातील रुग्णाचे जीव असेच रक्ता अभावी जात राहिले तर नाईलाजास्तव  आम्हाला तीव्र आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल जर येत्या एक महिन्यात कोणतीही हालचाल अथवा कारवाई न केल्यास आमची संघटना संवैज्ञानिक मार्गाने तीव्र आंदोलन उभे करू, त्यामुळे निर्माण होणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास प्रशासन जबाबदार राहील याची नोंद घ्यावी. असे निवेदनात नमूद केले आहे.यावेळी संस्थापक अध्यक्ष अमोल धानोरकर, राजु चौधरी,विक्की बापावर, विलास आवारी,पवन बुरान,निकेश होले, विनोद इंगळे, योगेश आवारी, अनिल रेभे,हितेश गोंडे, गोविंद नरपांडे, बंटी प्रेमकुंठावार, राहुल यादव, गौरव यासह संघटनेचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ताज्या बातम्या

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप. 23 January, 2025

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप.

वणी:- हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे अवचित साधून, वणी येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले नगरपरिषद...

मुंगोली येथील नागरिकांना पुनर्वसण ठिकाणी प्लॉट वाटप करा, विजय पिदुरकर यांची मागणी. 23 January, 2025

मुंगोली येथील नागरिकांना पुनर्वसण ठिकाणी प्लॉट वाटप करा, विजय पिदुरकर यांची मागणी.

वणी:- तालुक्यातील मुंगोली गावातील सर्व जमीन वेकोलीने अधिग्रहण केली. जमिनीसह गावाचे पुनर्वसन करणे हे विकोलीच्या प्रस्तावात...

हिंदरत्न मनस्वीचे मनसेने वणीत केले जंगी स्वागत 23 January, 2025

हिंदरत्न मनस्वीचे मनसेने वणीत केले जंगी स्वागत

वणी: बोटोनी सारख्या ग्रामीण भागातून येऊन कमी वयात स्केटिंग गोल्ड मेडलिस्ट ठरलेली मनस्वीने आज "३० की.मी. स्केटिंग फॉर...

*निधन वार्ता* 23 January, 2025

*निधन वार्ता*

*निधन वार्ता* वार्ता राजू गोरे चंद्रपूर प्रतिनिधी - चिकणी नजीक शेगांव (खुर्द ) ता. वरोरा जि. चंद्रपूर येथील पंचक्रोशीत...

ग्रामीण रुग्णालय वणी व ट्रामाकेअर युनिट यांची जोडणी करून रक्त साठा युनिटची व्यवस्था  तात्काळ करा. 23 January, 2025

ग्रामीण रुग्णालय वणी व ट्रामाकेअर युनिट यांची जोडणी करून रक्त साठा युनिटची व्यवस्था तात्काळ करा.

वणी:-ग्रामीण रुग्णालय वणी येथील ट्रॉमा केअर युनिट हे ग्रामीण रुग्णालयापासून अलग असल्याने ते रूग्णांकरिता सुविधा...

*भारतीय बेरोजगार मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी मार्फत राष्ट्रपतीं यांना भारतीय जवानांना न्याय देण्यास निवेदन* 22 January, 2025

*भारतीय बेरोजगार मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी मार्फत राष्ट्रपतीं यांना भारतीय जवानांना न्याय देण्यास निवेदन*

*भारतीय बेरोजगार मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी मार्फत राष्ट्रपतीं यांना भारतीय जवानांना न्याय देण्यास निवेदन* ✍️मुनिश्वर...

वणीतील बातम्या