भाजपा युवा मोर्चा तर्फे सदस्यता नोंदणी अभियान.
वणी:- वणी येथे भारतीय युवा मोर्चा यवतमाळ जिल्हा भाजपा सदस्यता नोंदणी अभियान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या...
Reg No. MH-36-0010493
वणी - एचडी एन्टरप्राईजेस व गौरव जॉइंट वेंचर प्रा. लि. या कंपनीत काम करणा-या 65 कामगारांना अचानक कामावरून कमी करण्यात आले आहे. त्यामुळे या कुटुंबावर उपासमारीची पाळी आली आहे. कामगारांना पुन्हा कामावर रुजू करावे, या मागणीसाठी कामगारांनी कंपनीविरोधात एल्गार पुकारला आहे. दिनांक 27 जानेवारीपासून कामावरून कमी केलेले कामगार कंपनीच्या गेटसमोर आमरण उपोषण करणार आहे. याबाबत कामगारांनी उपविभागीय अधिकारी व कंपनी व्यवस्थापनाला याबाबत निवेदन दिले आहे. दरम्यान कंपनीच्या या भूमिकेवर कामगार नेते व वेकोलिचे टीएससी मेंबर संजय खाडे यांनी संताप व्यक्त केला असून त्यांनी कामगारांच्या भूमिकेला आपला पाठिंबा जाहीर केला आहे.
एचडी एन्टरप्राईजेस व गौरव जॉइंट वेंचर प्रा. लि. ही कंपनी निलजई ओपनकास्ट खाणीसाठी ओ.बी. उत्खननाचे काम करते. गेल्या 5 वर्षांपासून या कंपनीचे काम सुरु आहे. या कामासाठी एचडी एन्टरप्राईजेस या कंपनीचे 35 डंपर व गौरव जॉइंट वेंचर या कंपनीचे 60 डंपर सुरु आहेत. सध्या ही कंपनी पूर्ण क्षमतेने काम करीत आहे. मात्र असे असूनही या कंपनीत काम करणा-या 65 कामगारांना नोकरीवरून कमी करण्यात आले आहे. त्यामुळे कामगारांवर उपासमारीची पाळी आली आहे. या विरोधात कामगार सहकुटुंब आमरण उपोषण करणार आहेत. 27 जानेवारी पासून कामगारांच्या उपोषणाला सुरुवात होत आहे.
हा भूमिपुत्रांवर अन्याय - संजय खाडे
वेकोलिसाठी स्थानिकांनी आपली जमीन दिली. शेती गेल्यामुळे शेतकरी, शेतमजूर व अनेक स्थानिकांचा रोजगार गेला. वेकोलिमुळे होणा-या प्रदूषणामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. प्रदूषणाचा स्थानिकांच्या आरोग्यावर याचा परिणाम होत आहे. वेकोलिला प्रगतीत भूमिपुत्रांच्या त्यागाचा मोठा वाटा आहे. मात्र वेकोलिसाठी काम करणा-या कंपन्या आता भूमिपुत्रांच्याच जिवावर उठल्या आहेत. हा भूमिपुत्रावरचा अन्याय सहन केला जाणार नाही. कंपनीने तात्काळ कामगारांना नोकरीवर रुजू करावे.
याबाबत कामगारांनी उपविभागीय अधिकारी व कंपनी व्यवस्थापनाला निवेदन देऊन कामावर रुजू करण्याची विनंती केली आहे. निवेदनावर प्रभाकर खोब्रागडे, संजय पारशिवे, कान्हू तामगाडगे, महेश गोवरदिपे, अनिल डोंगे, योगेश कामतवार, प्रकाश इंगोले, सुरेश पारशिवे, वासुदेव चिडे, किसन खेडेकर, अरुण डाहूले, प्रवीण कातरकर, श्रीकांत निंदेकर, संजय व-हाटे, प्रकाश नागोसे, रवि गुरनुले, संदीप नांदे, संजय वासनकर, आकाश गोबाडे, तुळशीदास धांडे, सुनील कातरकर, विजय खुटेमाटे, दिलिप काकडे, गणेश सातपुते, भाऊराव काकडे, मिथून निब्रड, विशाल गोवारदिपे, पुरुषोत्तम पाचभाई, राजू ढपकर, वैभव खाडे, हरिभाऊ खेडेकर, संतोष राजूकर, अनिल बोबडे, अरुण असिनकर, दीपक खुसपुरे, सुभाष पिंगे, गणेश पारशिवे, मंगेश देरकर इत्यादींची स्वाक्षरी आहे.
वणी:- वणी येथे भारतीय युवा मोर्चा यवतमाळ जिल्हा भाजपा सदस्यता नोंदणी अभियान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या...
वणी - एचडी एन्टरप्राईजेस व गौरव जॉइंट वेंचर प्रा. लि. या कंपनीत काम करणा-या 65 कामगारांना अचानक कामावरून कमी करण्यात आले...
वणी:१०४ सुवर्ण पदक स्केटिंगमध्ये पटकावणारी बोटोणी येथील मनस्वी पिंपरे ही गुरुवारी (दि. 23) बोटोणी ते वणी 30 किमी. अंतर...
वणी : वणी शहरात सौंदर्याकरण साई मंदिर ते टिळक चौक ते कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात करण्यात आले. यामध्ये मध्यभागी...
वणी:- हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व विद्यमान आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त...
वणी:- वेकोलीच्या उकणी खान परीसरात कुजलेल्या अवस्थेत वाघाचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती. त्या मृत वाघाचे...
वणी:- वणी येथे भारतीय युवा मोर्चा यवतमाळ जिल्हा भाजपा सदस्यता नोंदणी अभियान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या...
वणी:१०४ सुवर्ण पदक स्केटिंगमध्ये पटकावणारी बोटोणी येथील मनस्वी पिंपरे ही गुरुवारी (दि. 23) बोटोणी ते वणी 30 किमी. अंतर...
वणी : वणी शहरात सौंदर्याकरण साई मंदिर ते टिळक चौक ते कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात करण्यात आले. यामध्ये मध्यभागी...