मानवी हक्क सुरक्षा परिषदेची वृक्ष वाचविण्यासाठी धडपड.
वणी : वणी शहरात सौंदर्याकरण साई मंदिर ते टिळक चौक ते कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात करण्यात आले. यामध्ये मध्यभागी...
Reg No. MH-36-0010493
वणी:- हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व विद्यमान आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य महाआरोग्य शिबीर वणी येथील शिक्षण प्रसारक मंडळ शाळेच्या प्रांगणात १९ जानेवारी रोजी सकाळी १० ते दुपारी ३ पर्यंत आयोजित करण्यात आले होते. दरम्यान याशिबिरात विविध आजार असलेल्या असंख्य रुग्णांनी महाआरोग्य शिबिराचा लाभ घेतला.
आयोजित या शिबिराचे उद्घाटक म्हणून वणीचे आमदार संजय देरकर तर अध्यक्ष म्हणून माजी नगराध्यक्ष तथा शि.प्र.मंडळाचे अध्यक्ष विजय मुकेवार तर प्रमुख अतिथी म्हणून शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख संजय निखाडे, शरद ठाकरे, दीपक कोकास, संतोष माहूरे, सावंगी मेघे येथील शशांक गोतरकर, डॉ. एन. पी. शिंगणे, सुनील कातकडे, गणपत लेडांगे सुधीर थेरे, आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सावंगी मेघे जि. वर्धा येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय, वणी तालुका आरोग्य विभाग, व ग्रामीण रुग्णालय वणी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या शिबिरात हजारो रुग्णांनी सहभाग घेतला होता. यात विविध आजाराचे रुग्ण सहभागी झाले होते. जवळपास अडीच ते तीन हजार रुग्णांनी सहभाग नोंदवला. यात विविध आजारांवर शस्त्रक्रिया करण्यासाठी स्थानिक श्री संत जगन्नाथ महाराज नांदेश्वर देवस्थान येथे विविध दिवशी बोलाविण्यात आले आहे. आजतागायत सर्वात मोठे आरोग्य शिबीर विद्यमान आमदार संजय देरकर यांनी जनसामान्यांचा विचार करीत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त या महाआरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात विविध आजारावरील रुग्णांची तपासणी करून त्यांना विनोबा भावे रुग्णालय मेघे सावंगी येथे शस्त्रक्रिया होणार आहे. केवळ रुग्णांना औषध देण्यासाठी नव्हे तर?, त्यांच्या जिवासाठी आमदार संजय देरकर व संजय निखाडे यांनी जे कार्य केले ते जनसामान्याच्या आरोग्यासाठी! हे या महाशिबिरातून निदर्शनात येत होते. त्यामुळे सर्व सामान्य रुग्णांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. शिबिर यशस्वी करण्यासाठी वणी येथील एस.पी.एम. शाळेतील प्रांगणात महाआरोग्य शिबीर आयोजित केले होते. प्रसंगी या शिबिरात ग्रामीण रुग्णालय वणीचे अधीक्षक डॉ धर्मेंद्र सुलभेवार, डॉ विवेक गोफणे, वणी तालुका वैद्यकीय अधिकारी, डॉ समीर थेरे, मारेगावच्या तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ अर्चना देठे, झरि येथील तालुक वैधकिय अधिकारी डॉ मोहन गेडाम,
डॉ सुभाष इंगळे वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय मारेगाव तसेच डॉ. विलास बोबडे, बालू दुधकोहले, आशा सेविका, आरोग्य सेवक आदींनी परिश्रम घेतले.
वणी : वणी शहरात सौंदर्याकरण साई मंदिर ते टिळक चौक ते कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात करण्यात आले. यामध्ये मध्यभागी...
वणी:- हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व विद्यमान आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त...
वणी:- वेकोलीच्या उकणी खान परीसरात कुजलेल्या अवस्थेत वाघाचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती. त्या मृत वाघाचे...
वणी:- काही दिवसा पासून वेकोली प्रशासना कडून होत असलेल्या ब्लास्टिंग मुळे बेलोरा गावातील घरांना हादरे बसत असुन मातीचा...
वणी : वणी शहरात सौंदर्याकरण साई मंदिर ते टिळक चौक ते कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात करण्यात आले. यामध्ये मध्यभागी...
वणी:- वेकोलीच्या उकणी खान परीसरात कुजलेल्या अवस्थेत वाघाचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती. त्या मृत वाघाचे...