Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / शिपाई भरती प्रक्रिया...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

शिपाई भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात, जिल्हाधिकारी यांना निवेदन.

शिपाई भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात, जिल्हाधिकारी यांना निवेदन.

वणी:- तालुक्यातील नांदेपेरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत घोळ झाल्याची तक्रार नांदेपेरा येथील नागरिकांनी जिल्हाधिकारी यवतमाळ यांना निवेदन देण्यात आले.निवेदनात म्हटले आहे की,

ग्रामपंचायत नांदेपेरा येथे शिपाई भरती प्रक्रियेत घेण्यात आलेल्या परीक्षेत परिक्षा घेण्यात आलेल्या सभागृहात संबंधित अधिकाऱ्यांनी घोळ निर्माण करून परिक्षेच्या नियमाची पायमल्ली केल्याने संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करून  झालेली शिपाई भरती प्रक्रिया निष्पपणे चौकशी करून परिक्षेत बसलेल्या परिक्षार्थींना योग्यतेनुसार निवड करू न्याय ध्यावा.असे निवेदनात म्हटले आहे.

३० डिसेंबर रोजी वणी पंचायत समिती अंतर्गत नांदेपेरा ग्रामपंचायत येथे शिपाई भरती करीता परिक्षा घेण्यात आली.त्यात १० विद्यार्थी लेखी  परिक्षेसाठी बसले होते. सदर परिक्षा संपल्या नंतर अर्धा तासात तोंडी स्वरुपात निकाल जाहीर करण्यात आला. त्यात रविंद्र देविदास ढवस या विद्यार्थ्यांला उत्तीर्ण करण्यात आले. सबंधित विद्यार्थ्यांला सभागृहातील परिक्षकाने सहकार्य करून उत्तीर्ण केले. सदर परिक्षा घेत असतांना परिक्षकाने सभागृहातील बैठक व्यवस्थे मध्ये फेरबदल केला. उत्तीर्ण विद्यार्थ्यांला शेवटच्या कोपऱ्यात बसवून सहकार्य केले.

सर्व १० ही परिक्षार्थी विद्यार्थ्यांच्या गुनासह निकाल घोषित करून प्रश्न पत्रिका तसेच उत्तर पत्रिकेची एक प्रत देण्यात यावी. या परिक्षेत पारदर्शकता नव्हती यात घोळ करून आर्थिक व्यवहार झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. तसेच एक समिती स्थापन करून परत परीक्षा घेण्यात यावी.

या प्रकरणाची चार दिवसात दखल न घेतल्यास नाईलाजास्तव सर्व परिक्षार्थी  तहसील कार्यालया समोर आंदोलन सुरू करू असा इशारा निवेदनातु देण्यात आला.

यावेळी  सुरेश शेंडे,सचिन चीकटे, तुषार खामनकर, पवन कोडापे,अजय किनेकर, राहूल वांढरे,धिरज खामनकर,प्रविण खैरे,साहिल ठमके, प्रफुल पावले ईत्यादी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

शिपाई भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात, जिल्हाधिकारी यांना निवेदन. 10 January, 2025

शिपाई भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात, जिल्हाधिकारी यांना निवेदन.

वणी:- तालुक्यातील नांदेपेरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत घोळ झाल्याची तक्रार नांदेपेरा...

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा,   वणी वाहतूक शाखेचा उपक्रम. 09 January, 2025

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.

वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन. 09 January, 2025

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन.

वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी*    *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा* 09 January, 2025

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा*

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* 08 January, 2025

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

वणीतील बातम्या