*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
Reg No. MH-36-0010493
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा येथे ३ जानेवारी ते ५ जानेवारी रोजी करण्यात आले होते.
या स्पर्धेचे उद्घघाटन पांढरकवडा येथील सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सुहास गाडे,भा.प्र.से. यांच्या अध्यक्षतेखाली तालुका क्रिडा अधिकारी जयश्री लोखंडे यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झाले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा प्रशासन अधिकारी, शुभम कॅमतवार, अनुप अग्रवाल, गिरीष पारेकर, गणेश देशमुख, राजू घोडकी, महेश कुमार जामनोर, आयोजक नगर परिषदेचे मुख्य अधिकारी ज्ञानेश्वर सोनोने, प्रामुख्याने उपस्थित होते. या स्पर्धेत नगरपरिषद वणीच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कला व क्रीडा कामगिरी करून जिल्ह्याचे सर्वसाधारण विजेतेपद मिळविले.
नगर परिषदेमध्ये कार्यरत शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या क्रीडा व कलागुणांना वाव मिळावी याकरिता शासनातर्फे कला व क्रीडा स्पर्धेचे आयोजन दरवर्षी करण्यात येते, यावर्षी यजमानपद पांढरकवडा नगर परिषदे कडे होते.३ जानेवारीपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत विविध खेळ प्रकारात जवळपास 500 प्रतिस्पर्धी खेळाडूंनी भाग घेतला होता. त्यात वणी नगर परिषदेच्या 35 खेळाडू विविध स्पर्धेत मुख्याधिकारी डॉ. सचिन गाडे यांच्या नेतृत्वात सहभागी झाले होते.
या स्पर्धेत वणी नगर परिषदेचे एक नृत्य स्पर्धा, द्वितीय क्रमांक, चंदू परेकर, एकल गायन स्पर्धा, प्रथम क्रमांक दिगंबर ठाकरे, युगलगीत गायन स्पर्धा प्रथम क्रमांक दिगंबर ठाकरे, देवेंद्र खरवडे, वेशभूषा द्वितीय क्रमांक वंदना परसावार, युगल नृत्य स्पर्धा प्रथम क्रमांक कु. उत्कर्षा गावित, सौ. स्वाती आवारी, कविता वाचन द्वितीय क्रमांक रजनी पोयाम, हर्षल ठोसरे, चारोळी वाचन द्वितीय क्रमांक विजय चव्हाण, नाटिका प्रथम क्रमांक नगरपरिषद वणी यात सहभागी कलाकार मीना काशीकर, दर्शना राजगडे, रजनी पोयाम, शुभांगी वैद्य, मंगला पेंदोर, वंदना परसावार, लता ठमके, किरण जगताप, सुनिता जकाते, नीलिमा राऊत, वेणू कोटरंगे, रेखा धानोरकर यांनी `पोरगी देता का हो पोरगी, ही नाटिका उत्कृष्टरीत्या सादर केली.१०० मीटर धावण्याच्या शर्यतीत प्रथम क्रमांक कपिल तोमस्कर,४०० धावण्याच्या शर्यतीत प्रथम क्रमांक हनुमान गाऊत्रे,४०० मिटर रिले स्पर्धेत कपिल तोमस्कर, हनुमान गाऊत्रे, संजय पवार, निलेश राठोड यांनी सहभाग घेऊन त्यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.
या नेत्र दीपक यशाबद्दल मुख्याधिकारी डॉ.सचिन गाडे, उपमुख्य अधिकारी जयंत सोनटक्के, कार्यालय अधीक्षक नितेश राठोड, कर निरीक्षक किरण गडलिंग, अग्निशमन अधिकारी नंदू बेलसरे, संगणक अभियंता हर्षल ठोसरे, विद्युत अभियंता प्रशांत बळी, कर निरीक्षक सचिन लोणारे, स्वच्छता निरीक्षक रूषिकेश वायदंडे, पाणीपुरवठा अभियंता शुभम तोडसाम, कर अधीक्षक प्रशांत कांबळे, स्थापत्य अभियंता निलेश इंगळे, मयुरेश केंद्रे सहाय्यक नगर रचना नगरपरिषद वणी, यांनी सर्व सहभागी खेळाडूंचे अभिनंदन करून वणी नगरपरिषदेत विजयोत्सव थाटात साजरा केला. यावेळी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी,उपमुख्याधिकारी,कर्मचारी ,स्पर्धक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...
वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...
वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...
वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...
वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...
वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...