वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
Reg No. MH-36-0010493
वणी:- भीमा कोरेगाव विजयी शैर्य दिनाचे औचित्य साधून वणी शहरातील 'द ग्रेट पिपल्स ग्रुप' या सामाजिक संघटनेच्या वतीने दि. १ जाने. २०२५ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, वणी येथे सकाळी मानवंदना देऊन ७.३० वाजता मोफत रक्त गट तपासणी शिबीर घेण्यात आले.तसेच सायंकाळी ६.३० वा. शुरविरांना अभिवादन आणि सन्मान समारंभाचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमामध्ये सामाजिक कार्यकर्ते व शैक्षणिक व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून वणीचे आमदार संजय देरकर, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विजय नगराळे व प्रमुख अतिथी म्हणून प्रा.पुरुषोत्तम पाटील, माजी नगराध्यक्ष करूणा कांबळे, सुरेश रायपूरे, मोरेश्वर देवतळे, ईत्यादी मान्यवर उपस्थित होते.
दिवंगत आंबेडकरी चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते सुरेश मोडक यांच्या सन्मानार्थ त्यांच्या पत्नीचा सन्मान करण्यात आला. तसेच समाजा मध्ये सामाजिक कार्यात व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यात आले.
त्यानंतर व्याख्याते दत्ता डोहे यांनी भिमा कोरेगांव शुरविरांचा इतिहास या विषयावर व्याख्यान झाले.
या कार्यक्रमाला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी द ग्रेट पिपल्स गृपच्या सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी परिश्रम घेतले.
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...
वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...
वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...