Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / राष्ट्रीय पातळीवरील...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

राष्ट्रीय पातळीवरील नृत्य स्पर्धेत वणीतील स्पर्धकांनी विविध नृत्य स्पर्धांमध्ये मारली बाजी.

राष्ट्रीय पातळीवरील नृत्य स्पर्धेत वणीतील स्पर्धकांनी विविध नृत्य स्पर्धांमध्ये मारली बाजी.

वणीः- राष्ट्रीय पातळीवर छत्तीसगढ राज्यातील दुर्ग येथे दिनांक २४ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२४ या दरम्यान राष्ट्रीय पातळीवर अखिल भारतीय नृत्य स्पर्धा "नाट्य नर्तन" स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या राष्ट्रीय पातळीवरील अखिल भारतीय नृत्य स्पर्धेमध्ये वणीतील कु. भार्गवी विरेंद्र महाजण, कु. उर्वी प्रणित बांगडे, कु. सिया सचिन डोर्लीकर, कु. त्रिशा भावेश हरपलवार, चि. आरुश सुधीर पांडे, कु. सान्वी शिंदे, कु. धृविया रासेकर, कु. युक्ता साहारकर, कु. सानिध्या झाडे, कु. राजेश्वरी तुषार कोंडावार यांनी विविध नृत्य स्पर्धेमध्ये नाट्य नर्तन या स्पर्धेमध्ये एकल, युगल आणि समुह नृत्य अशा विविध स्पर्धेत सहभाग घेवुन राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकवत वणीतील स्पर्धकांनी बाजी मारली. 

वरिल आयोजित अखिल भारतीय नृत्य स्पधेमध्ये नाट्य नर्तन या स्पर्धेमध्ये एकल, युगल आणि समुह नृत्य या नृत्याकरीता कु. भार्गवी विरेंद्र महाजण हिने चार प्रथम  पारितोषीक पटकावले तर कु. उर्वी बांगडे हिने एकल व युगल, समूह या दोन्हीही नृत्याकरीता तीन प्रथम पारितोषीक पटकावित वणीची शान राष्ट्रीय पातळीवर उंचावली. या शिवाय एकल नृत्य स्पर्धेमध्ये कु. त्रिशा हरपलवार हिने द्वितीय पारितोषीक तसेच चि. आरूश पांडे याने प्रथम, कु. सान्वी शिंदे हिने द्वितीय, कु. युक्ता साहारकर हिने द्वितीय, कु. सानिध्या झाडे हिने द्वितीय तर राजेश्वरी कोंडावार हिने तृतीय पारितोषीक मिळवत वणीतील नृत्य चमुनी वणीकरांची मान उंचावली.नृत्य गुरुरत्न कु. पुजा धनवटे यांनी मोलाची कामगिरी केल्यामुळे त्यांना सुध्दा उत्कृष्ट नृत्य गुरुरत्न म्हणुन या प्रसंगी गौरविण्यात आले.

 

या बाबत असे की, अशा नृत्य स्पर्धा दरवर्षी राष्ट्रीय पातळीवर आयोजित करण्यात येत असुन या स्पर्धेमध्ये विविध राज्यातील स्पर्धक भाग घेत असतात.याआधी हिच स्पर्धा महाराष्ट्र राज्यातील नांदेड व गोवा येथील पणजी येथे आयोजित करण्यात आली होती.त्यामध्ये सुद्धा याच स्पर्धाकांनी पारितोषिक पटकविले होते.                          राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेमध्ये वणीतील चमूंनी बाजी मारणे, हे वणीकरांसाठी अभिमानास्पद बाब आहे. वणीतील चमुंनी राष्ट्रीय पातळीवर विविध स्पर्धेत विजय मिळवत प्रथम पारितोषीक पटकाविल्याने स्पर्धकांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. स्पर्धकांनी या विजयाचे श्रेय त्यांचे आई वडील व गुरूजनांना दिले आहे.

ताज्या बातम्या

आ. संजय देरकरांच्या हस्ते अडेगाव येथे शंकर पटाचे थाटात उद्घाटन, आमदार संजय देरकरांना आवरला नाही शंकर पटाची जोडी हाकण्याचा मोह. 04 January, 2025

आ. संजय देरकरांच्या हस्ते अडेगाव येथे शंकर पटाचे थाटात उद्घाटन, आमदार संजय देरकरांना आवरला नाही शंकर पटाची जोडी हाकण्याचा मोह.

वणी : झरी जामनी तालुक्यातील अडेगाव येथील इनामी बैल जोडीच्या शंकर पटाचे आयोजन करण्यात आले होते. या पटाचे उद्धाटन वणी...

सिद्धार्थ वस्तीगृह येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी. 04 January, 2025

सिद्धार्थ वस्तीगृह येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी.

वणी:- ३ जानेवारी रोजी सिद्धार्थ वसतीगृह वणी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी...

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* 04 January, 2025

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे*

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी* 04 January, 2025

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी*

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी* ✍️मुनिश्वर बोरकरगडचिरोली गडचिरोली:-माळी...

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे 03 January, 2025

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली...

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. 03 January, 2025

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

...

वणीतील बातम्या

आ. संजय देरकरांच्या हस्ते अडेगाव येथे शंकर पटाचे थाटात उद्घाटन, आमदार संजय देरकरांना आवरला नाही शंकर पटाची जोडी हाकण्याचा मोह.

वणी : झरी जामनी तालुक्यातील अडेगाव येथील इनामी बैल जोडीच्या शंकर पटाचे आयोजन करण्यात आले होते. या पटाचे उद्धाटन वणी...

पीडित वृद्धाच्या सेवेसाठी लालगुडा (वणी ) येथे माऊली वृद्धाश्रम सुरु

वणी :दि. 1 जानेवारी 2025 रोजी नवीन वर्षाच्या शुभ मुहूर्तावर सृष्टीत किरण बहुउद्देशीय संस्था द्वारे दीनानाथ नगर लालगुडा...