मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव.
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
Reg No. MH-36-0010493
वणी : अवैधरित्या वाळू ची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभाग व डीबी पथकाने वेगवेगळी कार्यवाही करून ट्रॅक्टर ताब्यात घेतले आहे. डीबी पथकाने ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल केला असून महसूल विभागाची गुन्हे नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे. ही कार्यवाही गुरुवारी २६ डिसेंबरला दुपारच्या सुमारास करण्यात आली.
मानकी- पेटुर मार्गावरील रेल्वे पुलापासून काही अंतरावर असलेल्या नाल्यातून रेतीची चोरी होत असल्याची माहिती डीबी पथकाला मिळाली. डीबी पथकाने पेटुर नाल्यावर जाऊन पाहणी केली असता तेथे एक ट्रॅक्टर अवैधरित्या रेती भरतांना आढळून आले. नाल्यावरून रेती भरून हे ट्रॅक्टर निघत असतांनाच डीबी पथकाने या ट्रॅक्टरवर कार्यवाही केली. वाळू चोरी करणारे हे ट्रॅक्टर ताब्यात घेऊन पोलिस स्टेशनला लावण्यात आले आहे. दिवसाढवळ्या रेती चोरी करणाऱ्या ट्रॅक्टर चालक निलेश शंकर मिलमिले (२८) रा. मानकी याच्यावर पोलिसांनी बीएनएसच्या कलम ३०३ (२) नुसार गुन्हा दाखल केला आहे. ट्रॅक्टर हे विना क्रमांकाचे असून ट्रॉलीवर MH २९ R ८७३९ हा क्रमांक लिहिला आहे. ही कार्यवाही एपीआय धिरज गुन्हाने, जमादार संतोष आढाव, मो. वसीम, श्याम राठोड यांनी केली.
वाळू चोरीच्या दुसऱ्या ट्रॅक्टर वरील कार्यवाही ही महसूल विभागाने केली. घोन्सा मार्गावरून हे ट्रॅक्टर ताब्यात घेण्यात आले आहे. तहसील कार्यालयासमोर हे ट्रॅक्टर लावण्यात आले असून ट्रॅक्टर चालकावर गुन्हे नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे. महसूल विभागाने ताब्यात घेतलेल्या ट्रॅक्टरचा क्रमांक MH २९ BP ९६५० हा असून ट्रॉलीचा क्रमांक MH २९ BV ८५३६ हा आहे.
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
वणी : अवैधरित्या वाळू ची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभाग व डीबी पथकाने वेगवेगळी कार्यवाही करून ट्रॅक्टर...
सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी सिरोंचा या देशात शिव, फुले,...
*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...
वणी:- मंदिरातून दर्शन घेऊन घराकडे परत जात असताना धुम स्टाईल बाईक स्वाराने जबर धडक दिल्याने ७० वर्षीय इसमाचा मृत्यू...
*सतरा वर्षीय अल्पवइन मुलीच्या आत्महत्ते प्रकरनाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करा* *पीडित कुटुंबीयांनी...
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
वणी:- मंदिरातून दर्शन घेऊन घराकडे परत जात असताना धुम स्टाईल बाईक स्वाराने जबर धडक दिल्याने ७० वर्षीय इसमाचा मृत्यू...
वणी:- लोहार समाज संघटना वणीच्या वतीने भव्य राज्यस्तरीय परिचय मेळावा २१ व २२ डिसेंबर रोजी तिरुपती मंगल कार्यालय येथे...