वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
Reg No. MH-36-0010493
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार भीमनगर वणी, येथे उपवर - वधु परिचय व पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे.
सद्या धकाधकीच्या जीवनामध्ये भेटीगाठी कमी झालेल्या आहेत, त्यामुळे एकमेकांसोबत बरेच दिवस भेट होत नसल्याने एकत्र आणण्याकरीता तसेच समाजातील पालक आणि उपवर- वधुसाठी हा खास उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून समाजबांधव एकत्रित यावे आणि उपवर- वधु यांचा परिचय होऊन लग्नगाठ बांधण्याचा उद्दात हेतू आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून धर्मपाल माने सर यवतमाळ तर या कार्यक्रमाचे उदघाटक विवेक मेश्राम सर वर्धा, तसेच प्रमुख अतिथी म्हणून पंढरीनाथ आडे सर राहणार आहेत, या मेळाव्यामध्ये युवक युवतीचा परिचय होणार असून त्यांना मान्यवरांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. उपवर-वधू यांची नोंदणी मेळाव्याच्या ठिकाणी मेळाव्याच्या दिवशी सकाळी १० ते ११ च्या दरम्यान करण्यात येईल. उपवर-वधु यांनी मेळाव्यात येताना एक फोटो सोबत आणावा. या मेळाव्यात उपवर-वधु घटस्फोटित वधु-वर विधवा -विधुर वधु-वर यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून जास्तीत जास्त वधु - वर यांनी सहभागी होण्याचे आवाहन कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक इंदुताई वाघमारे ८६६८४६०४०५ सुहास नगराळे. विलास वाघमारे . यांनी केले आहे.
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...