मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.
...
Reg No. MH-36-0010493
वणी :- नागपूर येथे राज्याचे हिवाळी अधिवेशन चालू असून विरोधकांकडून सरकारला विविध प्रश्नावर घेतल्या जात आहे. तारीख १८ डिसेंबर रोजी अधिवेशनाचा तिसरा दिवस असून सभागृहाच्या पायरीवर महाविकास आघाडीकडून शेतकऱ्यांच्या शेत मालाला हमीभाव अधिक ५०% नफा घोशित करण्यात यावा या करिता आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात वणी विधानसभेचे लोकप्रिय आमदार संजय देरकर यांनी चक्क शेतातील कपासीचे झाड घेवून शेतकऱ्यांना न्याय मागितल्याने सर्वत्र शेतकऱ्यांमध्ये आ. देरकरांच्या भूमिकेचे कौतुक केल्या जात आहे.
मागील दहा वर्षात केंद्रात व राज्यात डबल इंजनची सत्ता असून शेतकऱ्यांना हमी भाव अधिक ५०% नफा देवू म्हणून आश्वासन देणाऱ्या भाजपने शेतकऱ्यांना देशोधडीला लावले आहे. शेतकऱ्यांची ना कर्ज माफी केल्या जात आहे. ना त्यांच्या शेतमालाला योग्य भाव दिल्या जात आहे. शेतकऱ्यांचा लागत खर्च देखील निघत नसल्याने मुद्दलमध्ये तोटा निर्माण होत आहे. असे असताना शेतकऱ्यांच्या कष्टाचे मूल्य सरकार ठरवू शकत नाही आहे. हे सरकार शेतकरी विरोधी धोरण आखून शेती हा व्यवसाय नष्ट करू पाहत आहे. परंतु हे सरकारचे मनसुबे पूर्ण होणार नाही. असा सूर विरोधी पक्षाकडून निघत आहे.
आज हिवाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस या निमित्ताने महाविकास आघाडीचे सर्व पक्षांची गटनेते विद्यमान आमदार यांनी विधानभवनाच्या पायरीवर शेतकऱ्याच्या शेतमालाला हमीभाव मिळालाच पाहिजे, कर्ज माफी झालीचं पाहिजेत, शेतकऱ्याना शेती पंपासाठी पूर्णवेळ विज मिळालीच पाहिजेत, यासाठी लाक्षणिक आंदोलन केले त्यानिमित्ताने विधानसभेतील सर्व महाविकास आघाडीचे आमदार व नेते मंडळी उपस्थित होते. वणी विधानसभेतील आमदार संजय देरकर हे सुद्धा या आंदोलनात सहभागी होते त्यांनी कपासीचे बोंडे भरलेले झाडच विधी मंडळात पोहचविण्याचे शेतकऱ्यांसाठी झटणारा एकमेव आमदार म्हणून त्यांचे वणी विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये चर्चा होत आहे.
वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...
वणी:- वणी येथील बालकलावंतांनी चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ बालनाट्य स्पर्धेत द्वितीय...
वणी :- नागपूर येथे राज्याचे हिवाळी अधिवेशन चालू असून विरोधकांकडून सरकारला विविध प्रश्नावर घेतल्या जात आहे. तारीख १८...
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...
वणी:- परभणी येथे १० डिसेंबर रोजी एका समाजकंटकाने भारतीय संविधानाची प्रतिकृतीची विटंबना केली. या देशद्रोही कृत्याचा...
वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...
वणी:- वणी येथील बालकलावंतांनी चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ बालनाट्य स्पर्धेत द्वितीय...