धाडसी घरफोडी सोन्याच्या दागिन्यांसह रोख लंपास.
वणी:- शहरातील गुरूवर्य कॉलनी येथील बंद घर फोडून नगदी ४५ हजार रुपये व सोन्याचे दागिने मिळून ४ लाख ९० हजारांचा मुद्देमाल...
Reg No. MH-36-0010493
वणी:- शहरातील गुरूवर्य कॉलनी येथील बंद घर फोडून नगदी ४५ हजार रुपये व सोन्याचे दागिने मिळून ४ लाख ९० हजारांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना आज दिनांक ७ डिसेंबर रोजी सकाळी उघडकीस आली.
गुरूवर्य कॉलनीतील कमलाबाई बालकृष्ण भुसारी वय ८० वर्ष या स्वताचे घरी एकट्याच राहतात, त्यांचा लहान मुलगा हा त्यांचे शेजारी राहतो लहान मुलाची पत्नी ह्या सासुला रोज जेवण देतात त्यामुळे काल दिंनाक ६ डिसेंबर रोजी कमलाबाई लहान मुलांकडे जेवण करून तिथेच झोपी गेल्या. सकाळी त्यांचेकडे काम करणारा मुलगा घरी आला व त्याने चाबी मागुन घराचे दार उघडून किचन खोलीकडे गेला असता त्याला किचनचा मागील दरवाज्याचा कोंडा तुटलेला दिसला असता त्यांनी धावत जाऊन लहान मुलांकडे येऊन कमलाबाईला माहिती दिली असता त्यांनी घरी जाऊन बघीतले असता बेडरूम मधील लोखंडी कपाट उघडे दिसले व त्यातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले. कपाटात ठेवून असलेले सोन्याची चपला कंठी ४५ ग्राम, कंठी ३५ ग्राम, सोन्याच्या दोन अंगठ्या ८ ग्राम, मणी १ग्राम असे ८९ ग्राम वजनाचे दागीणे व नगद ४५ हजार रुपये रोख रक्कम असा एकूण ४लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केला.
चोरट्यांनी चोरी केल्या नंतर किचन रूम मध्ये चहा करून पिला.
घटने बाबत वणी पोलिस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात आली. यवतमाळ येथील डॉग युनिट व ठसे तज्ज्ञ यांनी तपासणी केली. पुढील तपास ठाणेदार अनिल बेहराणी यांचे मार्गदर्शनाखाली वणी पोलिस करीत आहेत.
वणी:- शहरातील गुरूवर्य कॉलनी येथील बंद घर फोडून नगदी ४५ हजार रुपये व सोन्याचे दागिने मिळून ४ लाख ९० हजारांचा मुद्देमाल...
वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने वणी विधानसभेत केलेले काम पहाता निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय निश्चित...
वणी :सब एरिया वेस्टर्न कोल्ड फिल्ड लिमिटेड, निलजई यांच्या अधिनस्त असलेलल्या निलजई येथील जी. एन. आर. कंपनी प्रा.लि मध्ये...
वणी:- दिनांक सात व आठ डिसेंबर 2024 रोजी शासकीय मैदान, वणी येथे छत्रपती संभाजी महाराज इकॉनॉमिक फोरमच्या वतीने क्रिकेट लीग...
वणी : राज्यात महायुतीने दणदणीत अभूतपूर्व यश संपादन केले. नागरिकांना सत्ता स्थापनेची उत्सुकता होती. अखेर शपथविधीला...
वणी:- येथील केएफडी ॲकडमी व नागपूर येथील टिम मशुरी यांच्यावतीने पहिल्यांदा वणी येथील मूकबधिर मुले व मुली रॅम्पवर...
झरी :निसर्ग व पर्यावरण मंडळ झरी आणि सहयोग ग्रुप मुकुटबन कडुन ग्रामीण रुग्णालय झरी येथे फळवाटप कार्यक्रम घेण्यात आला.निसर्ग...
वणी:- सुशगंगा पब्लिक स्कूल मध्ये 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिवस (संविधान दिन) मोठ्या उत्साहात साजरा केला. हा कार्यक्रम...