भाजपा युवा मोर्चा तर्फे सदस्यता नोंदणी अभियान.
वणी:- वणी येथे भारतीय युवा मोर्चा यवतमाळ जिल्हा भाजपा सदस्यता नोंदणी अभियान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या...
Reg No. MH-36-0010493
*
वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार भाजप व महायुती सरकारच्या विरोधात आहे. शेतमालाच्या भावामुळे शेतक-यांचा सरकारवर रोश आहे. निकृष्ट कामामुळे स्थानिक लोकप्रतिनिधींवर मतदारांची कमालीची नाराजी आहे. काँग्रेस व शिवसेनेचे अधिकाधिक कार्यकर्ते आपल्या पाठिशी आहे. त्यामुळे यावेळी आपला विजय निश्चित आहे, अशी गर्जना संजय खाडे यांनी बूथ कार्यकर्ता प्रशिक्षणाच्या वेळी केली. रविवारी सकाळी अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्यातर्फे बूथ सदस्यांसाठी एएसएल लॉन येथे प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी कार्यकर्ते व बूथ सदस्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
सुमारे 500 बूथ सदस्य व कार्यकर्ते शिबिराला उपस्थित होते. बूथ सदस्यांना विश्वास नांदेकर, नरेंद्र ठाकरे, गौरीशंकर खुराणा, संजय आवारी, चंद्रकांत घुगुल, प्रसाद ठाकरे, वासुदेव विधाते, राजाभाऊ पाथ्रडकर, प्रमोद वासेकर, प्रशांत गोहोकार यांनी मार्गदर्शन केले. आजपर्यंत संजय खाडे यांनी आम्हाला सर्वतो परी मदत करीत आम्हाला सांभाळून घेतले. आता याची परतफेड करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे आम्ही गावातील प्रत्येक मतदारांसाठी परिश्रम घेऊन संजूभाऊं खाडे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करणार, असे वचन कार्यकत्यांनी दिले.
बूथ प्रशिक्षण शिबिरानंतर खाडे यांचा झरी तालुक्यात प्रचार दौरा झाला. दु. 12.30 वा. झमकोला येथून झरी तालुक्यातील प्रचाराला झाली. निमणी, शिबला, हिवरा बारसा इ. गावात पदयात्रा काढण्यात आली. यावेळी नागरिकांनी खाडे यांचे वाजत गाजत व हार टाकून स्वागत केले. यावेळी काढण्यात आलेल्या पदयात्रेत गावक-यांनी शिट्टी वाजवून खाडे यांना समर्थन दिले. पदयात्रेत मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधव, झरी तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्ते व शिवसैनिक उपस्थित होते.
विविध संघटनांचा खाडे यांना पाठिंबा
मारेगाव येथील विरांगणा राणी दुर्गावती आदिवासी महिला संघटनेतर्फे अपक्ष उमेदवार संजय खाडे यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला. आदिवासी समाजाचे प्रश्न केवळ खाडे हेच सोडवू शकतात. मारेगाव तालुक्यातील सर्व आदिवासी महिलांच्या संघटना खाडे यांच्या पाठिशी उभ्या राहिल, असे संघटनेतर्फे जाहिर करण्यात आले. मार्डी येथील धनोजे कुणबी समाज संस्थे तर्फे पाठिंबा जाहीर करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष शुभाष पिंपळशेंडे, सचिव किशोर सुर, मनीषा पिंपळशेंडे, शंकर पोटे, पिंटू आवारी, जीवन काळे इत्यादींची उपस्थिती होती.
सोमवारी संजय खाडे यांचा रोड शो. : दीपक चौकाटी चौकापासून रोड शोला (पदयात्रा) सुरुवात होणार आहे. काठेड ऑईल मील, सर्वोदय चौक, टागोर चौक, आंबेडकर चौक, टिळक चौक, खाती चौक, गांधी चौक, दीपक चौपाटी व जत्रा मैदान असा रोड शोचा मार्ग आहे. पदयात्रेनंतर जत्रा मैदान येथे भव्य सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
वणी:- वणी येथे भारतीय युवा मोर्चा यवतमाळ जिल्हा भाजपा सदस्यता नोंदणी अभियान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या...
वणी - एचडी एन्टरप्राईजेस व गौरव जॉइंट वेंचर प्रा. लि. या कंपनीत काम करणा-या 65 कामगारांना अचानक कामावरून कमी करण्यात आले...
वणी:१०४ सुवर्ण पदक स्केटिंगमध्ये पटकावणारी बोटोणी येथील मनस्वी पिंपरे ही गुरुवारी (दि. 23) बोटोणी ते वणी 30 किमी. अंतर...
वणी : वणी शहरात सौंदर्याकरण साई मंदिर ते टिळक चौक ते कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात करण्यात आले. यामध्ये मध्यभागी...
वणी:- हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व विद्यमान आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त...
वणी:- वेकोलीच्या उकणी खान परीसरात कुजलेल्या अवस्थेत वाघाचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती. त्या मृत वाघाचे...
वणी:- वणी येथे भारतीय युवा मोर्चा यवतमाळ जिल्हा भाजपा सदस्यता नोंदणी अभियान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या...
वणी - एचडी एन्टरप्राईजेस व गौरव जॉइंट वेंचर प्रा. लि. या कंपनीत काम करणा-या 65 कामगारांना अचानक कामावरून कमी करण्यात आले...
वणी:१०४ सुवर्ण पदक स्केटिंगमध्ये पटकावणारी बोटोणी येथील मनस्वी पिंपरे ही गुरुवारी (दि. 23) बोटोणी ते वणी 30 किमी. अंतर...