आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
वणी: - शिवसेना (उबाठा) व महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देरकर यांनी आज रविवारी वणी शहरात जोरदार शक्ती प्रदर्शन केले. यावेळी काढण्यात आलेल्या महारॅलीला शहरातील व ग्रामीण भागातील हजारो नागरिक सहभागी झाले. टिळक चौकात रॅलीचे रुपांतर सभेत झाले. यावेळी बोलताना संजय देरकर यांनी एकजुटीने लढू व जिंकू, अशी गर्जना दिली. रॅलीत खा. संजय देशमुख व माजी आ. वामनराव कासावार, जिल्हा संपर्कप्रमुख राजेंद्र गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. रॅलीसाठी सर्व घटक पक्षाचे कार्यकर्ते, नेते एकत्र आल्याने रॅलीत महाविकास आघाडीची वज्रमुठ दिसून आली.
दुपारी 1 वाजता जत्रा मैदान येथील हनुमान मंदिरात नारळ फोडून रॅलीला सुरुवात झाली. ढोलताशा, डफडे, गोंडी वाद्यवृंद, डीजेच्या गजरात व कार्यकर्त्यांच्या जल्लोषात रॅली निघाली. रॅलीच्या सुरुवातीला महिलांसह किरण देरकर यांची उपस्थिती होती. सजवल्या बग्गीत संजय देरकर हे मान्यवरांसह उपस्थित होते.
यावेळी खा. संजय देशमुख, वामनराव कासावार, राजेंद्र गायकवाड, टिकाराम कोंगरे, राजीव कासावार, आशिष खुलसंगे, घनश्याम पावडे, सुनील कातकडे, संजय निखाडे, कुमार मोहरमपुरी, कॉम्रेड दिलीप परचाके, रज्जाक पठाण, विजय नगराळे, योगिता मोहोड, अरुणा खंडाळकर, अरविंद ठाकरे, देवीदास काळे, इजहार शेख, डॉ, महेंद्र लोढा, राकेश खुराणा, सुशील मुथा, अल्का महकुळकर, विवक मांडवकर, मारोती गौरकार, गजानन किन्हेकार, दीपक कोकास, गणपत लेगांडे, जयसिंग गोहोकार, रज्जाक पठाण, विजय नगराळे, वर्षा निकम, डीमन टाँगे, श्यामा तोटेवार, शालिनी रासेकर, योगिता मोहोड, सुनंदा गुहे, मंगला झिल्पे, साधना गोहोकर, जयसिंग गोहोकार, आबिद हुसेन, इजहार शेख, अजय धोबे , राजू तुरणकर, मंगेश पाचभाई, प्रवीण खानझोडे, महेश कुचेवार , गोविंद डवरे, शेख फारुक, सिद्दिक रांगरेज, अशोक पांडे, ओम ठाकूर , सुधिर थेरे इ. प्रमुख समावेश होता.
रंगनाथ स्वामी मंदिरापासून वाजत गाजत निघालेल्या रॅलीत रस्त्यावरील लोकांनी प्रतिसाद देत समर्थन दिले. कुठे रॅलीवर फुलांचा वर्षांवर करण्यात आला. सुमारे एक किलोमीटर लांब ही रॅली होती. रॅली भगतसिंग चौक, गाडगेबाबा चौक, गांधी चौक, खाती चौक असा मार्गक्रमण करीत टिळक चौक येथे पोहोचली. येथे रॅलीचे रुपांतर विराट सभेत झाले. उसळलेला जनसागर पाहून मी निश्चित झालो. आता देरकर यांचा विजय पक्का आहे, असे मनोगत वामनराव कासावार यांनी सभेत व्यक्त केले.
खा. संजय देशमुख यांनी हे सरकार शेतकरी विरोधी आहे. स्थानिक आमदार हे टक्केवारीचे राजकारण करतात. महाविकास आघाडीचे सरकार आल्यास 3 लाखांची कर्जमाफी व 25 लाखांचा विमा शेतक-यांना मोफत देण्यात येईल. समाजात तेढ निर्माण करणा-या बीजेपीला उखडून फेका, असे आवाहन त्यांनी भाषणातून केले.
शेतकरी, बेरोजगार तरुणच जागा दाखवणार - संजय देरकर
शेतमालाला भाव नसल्याने आपल्या विधानसभा क्षेत्रात सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या होतात. महायुती सरकार राज्यातील उद्योग गुजरातला पळवत आहे. त्यामुळे आपल्या भागातील सुशिक्षित तरुण बेरोजगार आहे. महागाईमुळे महिलांचे बजेट बिघडले आहे. यावेळी शेतकरी, बेरोजगार तरुणच भाजप सरकारला जागा दाखवणार. तुम्ही एक संधी दिल्यास शेतकरी, बेरोजगार, महिलांचे प्रश्न सोडवण्याचा पुरेपुर प्रयत्न करणार, असे मनोगत देरकर यांनी व्यक्त केले.
या महारॅलीत शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, आप, माकप, किसान सभा, संभाजी ब्रिगेड इत्यादी पक्ष व संघटनेचे नेते, कार्यकर्ते सहभागी झाले होते. तसेच रॅलीत मोठ्या प्रमाणात वणी शहरासह ग्रामीण भागातील मतदारांचा समावेश होता.
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...