यवतमाळ, वणी, आर्णी, दिग्रस मतदारसंघात गृहमतदानास प्रारंभ
यवतमाळ : विधानसभा निवडणुकीत 85 वर्षावरील मतदार आणि दिव्यांग मतदारांचे मतदानाचे प्रमाण वाढविण्यासोबतच त्यांना मतदानाची...
Reg No. MH-36-0010493
यवतमाळ : विधानसभा निवडणुकीत 85 वर्षावरील मतदार आणि दिव्यांग मतदारांचे मतदानाचे प्रमाण वाढविण्यासोबतच त्यांना मतदानाची घरपोच सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी त्यांचे गृहमतदान घेण्यात येत आहे. जिल्ह्यात 1 हजार 588 मतदार गृहमतदान करणार आहे. त्यात 1 हजार 267 वयोवृद्ध तर 321 दिव्यांग मतदारांचा समावेश आहे. आज यवतमाळ, वणी, आर्णी व दिग्रस विधानसभा मतदारसंघात गृहमतदानास प्रारंभ झाला.
यवतमाळ विधानसभा मतदारसंघातील 305 मतदारांनी गृहमतदानाची मागणी केली होती. त्यात 85 वर्षावरील मतदार 281 तर दिव्यांग 24 मतदारांचा समावेश आहे. आज यवतमाळ शहरासह मतदारसंघात विविध पथकांद्वारे या मतदारांच्या घरी जावून त्याचे पोस्टल बॅलेटद्वारे मतदान घेण्यास सुरुवात झाली. यवतमाळ येथे मतदान सुरु असतांना मतदारसंघाच्या सामान्य निरिक्षक श्रीमती देवसेना यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली व वयोवृद्ध मतदारांशी संवाद साधला.
वणी विधानसभा मतदारसंघात एकून 168 मतदार गृहमतदान करणार आहे. त्यात 85 वर्ष वयावरील 140 तर दिव्यांग 28 मतदारांचा समावेश आहे. या मतदारांनी रितसर अर्ज करून गृहमतदानाची मागणी केली होती. या मतदारसंघात देखील आज अशा मतदानाची सुरुवात झाली.
आर्णी विधानसभा मतदारसंघात सुद्धा आज गृहमतदान सुरु झाले. या ठिकाणी एकून 185 मतदार गृहमतदान करणार आहे. त्यात 136 मतदार 85 वर्षावरील वयाचे असून 49 मतदार हे दिव्यांग मतदार आहेत. दिग्रस विधानसभा मतदारसंघात सुद्धा आज गृहमतदान सुरु झाले. या मतदारसंघात एकू 248 मतदार गृहमतदान करणार आहेत. त्यात 144 मतदार 85 वर्ष वयाचे असून दिव्यांग मतदार 104 इतके आहेत.
राळेगाव विधानसभा मतदारसंघात देखील कालपासून गृहमतदानास सुरुवात झाली. या मतदारसंघात वयोवृद्ध 58 वर्षावरील 96 तर दिव्यांग 22 अशा 118 मतदारांनी गृहमतदानासाठी अर्ज केले होते. त्यांचे निवडणूक पथकाच्यावतीने घरी जावून मतदान घेतले जात आहे. पुसद व उमरखेड विधानसभा मतदारसंगाचे गृहमतदान संपले आहे.
यवतमाळ : विधानसभा निवडणुकीत 85 वर्षावरील मतदार आणि दिव्यांग मतदारांचे मतदानाचे प्रमाण वाढविण्यासोबतच त्यांना मतदानाची...
वणी :मतदारसंघात अनेक कोळसा खानी आणि विविध कंपन्या असून सुद्धा येथील युवक बेरोजगारच आहे. त्यामुळे मी निवडून आल्यानंतर...
वणी : विपुल खनिज संपत्तीने नटलेल्या वणी विभागाची सत्तेतील नेत्यांनी वाट लावली आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहे. तरुणाच्या...
वणी:- विपुल खनिज संपत्तीने नटलेल्या वणी विभागाची सत्तेतील नेत्यांनी वाट लावली आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहे. तरुणाच्या...
वणी: मनसेने सर्व बाजूने मतदारांना केंद्रित करत प्रचारामध्ये जोरदार आघाडी घेतली आहे. यात सर्वाधिक संख्या युवा आणि...
वणी -:- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण चांगलेच तापले आहे. प्रचारासाठी आता अवघा आठवडा उरला असतांना...