आमदाराने विकासाच्या नावावर फक्त कमिशन खोरीचे धंदे केले -राजू उंबरकर यांचा घणाघात
वणी : विपुल खनिज संपत्तीने नटलेल्या वणी विभागाची सत्तेतील नेत्यांनी वाट लावली आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहे. तरुणाच्या...
Reg No. MH-36-0010493
उमरखेड (सय्यद रहीम रजा ):आज सोमवार ला महाविकास आघाडीचे उमेदवार साहेबराव कांबळे च्या प्रचारासाठी नाना पटोले यांची जाहीर सभा उमरखेड येथे शासकीय विश्राम गृह इथे असंख्य संख्येने कार्यकर्ते आणि जनतेचा अथांग जनसागर जमला होता.
जाहीर सभा मध्ये जनतेला संबोधित करताना महाविकास आघाडीचे उमेदवार साहेबराव कांबळे यांनी महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश कमिटी अध्यक्ष नाना पटोले समोर उमरखेड महागाव मतदार संघातल्या समस्याचा पाढा वाचताना त्यांनी सांगितले की साहेब,मला माझ्या मतदार संघाचा विकास करायचा आहे.आज तरुणांच्या हाताला काम नाही, मागील १० वर्षात महायुती सरकारने आमच्या तालुक्यात उद्योग आणण्यासाठी काही केले नाही. तरुणांच्या बेरोजगारीने मनाला यातना होतात.मागील दोन वर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बंदिस्त करून त्यांचा अपमान केला आहे. तो मला मोठ्या दिमाखात स्थापन करायचा आहे.
आरोग्याचा प्रश्न इतका मोठा आहे की, सर्व आरोग्य यंत्रणा सलाईनवर आहे त्या यंत्रणा मला सक्षम करायच्या आहेत.
महिलांच्या विकासासाठी काम करायचे आहे. जाहीर सभेत महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश कमिटी अध्यक्ष नाना पटोले म्हणतात की,ही निवडणूक महाराष्ट्रातील भ्रष्टमहायुती सरकारच्या विरोधात आहे. महायुती सरकारने महाराष्ट्र भ्रष्टाचाराच्या खाईत लोटला आहे.
याच यवतमाळच्या भूमीत नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये सांगितलं होत की, येत्या ५ वर्षात शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू. पण आज १० वर्षे झाली शेतकरी अजूनही आत्महत्या करत आहे.मी नाना पटोले तुम्हाला आश्वासन देतो की, संपूर्ण विदर्भातील एकही शेतकरी सरकारी योजने पासून वंचित राहणार नाही.
शेतकऱ्याच्या घामाला दाद द्यायची नाही आणि त्यांना मारून टाकण्याचे काम महायुती नरेंद्र मोदी सरकारने केले.
नरेंद्र मोदीने ही पॉलिसी आणली की, गोरगरिबांच्या खिशातले पैसे रोज काढायचे आणि अदानीला द्यायचे.
भाजप फक्त हिंदू मुसलमान करते, पण शेतकऱ्यांच्या घामाला किमंत देणार नाहीत, त्यांना शेतकऱ्यांच्या घामाचा वास सहन होत नाही.
भाजप जनतेला गुलाम बनवण्याचा षडयंत्र करत असून गरीब मुलांना शिक्षणा पासून वंचित ठेवण्यासाठी पंधरा हजार ज़िल्हा परिषद शाळा बंद करणार आहे.
या मतदार संघात अवैध धंदयावर लगाम राहिली नाही अधिकारी स्थिर नाही,महायुती सरकार गेल्या शिवाय चांगल होणार नाही.यांनी रस्त्यात ही कमिशन घेऊन रस्त्याची वाट लावली आहे.
साहेबराव कांबळे यांच्या पाठीमागे नाना पटोले आणि मी नागेश आष्टीकर उभे आहे.मी महाविकास आघाडीच्या कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांना विनंती करतो की तुम्ही महविकास आघाडीचे काम मनधन लावून करा जे काम करणार नाही त्याची महाविकास आघाडी गय करणार नाही.
वणी : विपुल खनिज संपत्तीने नटलेल्या वणी विभागाची सत्तेतील नेत्यांनी वाट लावली आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहे. तरुणाच्या...
वणी:- विपुल खनिज संपत्तीने नटलेल्या वणी विभागाची सत्तेतील नेत्यांनी वाट लावली आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहे. तरुणाच्या...
वणी: मनसेने सर्व बाजूने मतदारांना केंद्रित करत प्रचारामध्ये जोरदार आघाडी घेतली आहे. यात सर्वाधिक संख्या युवा आणि...
वणी -:- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण चांगलेच तापले आहे. प्रचारासाठी आता अवघा आठवडा उरला असतांना...
वणी :महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार राजु उंबरकर यांच्याकरिता विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटना मैदानात...
वणी : शिवसेना (उबाठा) व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजय देरकर यांच्या प्रचारार्थ गुरुवार दिनांक 14 नोव्हेंबर रोजी...
वणी : विपुल खनिज संपत्तीने नटलेल्या वणी विभागाची सत्तेतील नेत्यांनी वाट लावली आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहे. तरुणाच्या...
वणी: मनसेने सर्व बाजूने मतदारांना केंद्रित करत प्रचारामध्ये जोरदार आघाडी घेतली आहे. यात सर्वाधिक संख्या युवा आणि...
वणी -:- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण चांगलेच तापले आहे. प्रचारासाठी आता अवघा आठवडा उरला असतांना...