मुकूटबन येथे शौचालय व प्रवासी निवारा उपलब्ध करून द्या- सुरेंद्र गेडाम यांची मागणी
झरी जामणी :तालुक्यातील मुकूटबन येथे रस्त्याचे रुंदीकरणाचे बांधकाम व रस्त्याला लागूनच एक वर्षापासून नवीन नालीचे...
Reg No. MH-36-0010493
वणी - रविवारी दिनांक 10 नोव्हेंबर रोजी मारेगाव तालुक्यात संजय खाडे यांच्या प्रचाराची तोफ धडाडली. नरेंद्र ठाकरे व गौरीशंकर खुराणा, संजय आवारी यांच्या प्रमुख उपस्थितीत संजय खाडे यांनी मारेगाव तालुक्यातील विविध गावांचा दौरा केला. कोलगाव व मांररुळ येथे भव्य रॅली व प्रचार सभा घेण्यात आली. या रॅलीत हजारो लोकांनी सहभाग घेतला. प्रचार सभेत संजय खाडे यांनी विकासाची ब्यू प्रिंट तयार असून फक्त एक संधी द्यावे असे आवाहन मतदारांना केला. यावेळी शिट्टी वाजवून गावक-यांनी संजय खाडे यांना पाठिंबा जाहीर केला.
आज दिनांक 11 नोव्हेंबर 2024 वार रविवार रोजी प्रचाराचा ताफा मारेगाव तालुक्यात पोहोचला. मांगरूळ या गावातून प्रचाराला सुरुवात झाली. मांगरुळ येथील रहिवाशांनी वाजत गाजत संजय खाडे यांचे स्वागत केले. नरेंद्र ठाकरे, गौरीशंकर खुराणा, संजय आवारी यांनी प्रचारात सहभाग घेतला. तर कोलगाव येथील मंदिरात दर्शन घेऊन कोलगाव येथील प्रचाराला सुरुवात झाली. कोलगाव येथील रहिवाशी मोठ्या संख्येने पदयात्रेत सहभागी झाले. नागरिकांनी संजय खाडे यांना मतदान करू असे आश्वासन दिले.
मांगरुळ येथील सरपंचाचा खाडे यांना पाठिंबा
मंगरूळ गावाचे सरपंच प्रमोद केशव आत्राम यांनी अपक्ष उमेदवार संजय खाडे यांना पाठिंबा जाहीर केला. संजय खाडे हे नेहमी सर्वसामान्यांच्या मदतीला धावून जातात. त्यांनी सर्वसामान्यांचे अनेक प्रश्न सोडवले. जनहित केंद्राच्या माध्यमातून त्यांनी अनेकांचे रखडलेले कामे पूर्ण केलीत. त्यांच्या या कार्यामुळे पाठिंबा जाहीर करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी मांगरुळ येथील प्रचारामध्ये सहभाग घेतला. तसेच ते संजय खाडे यांचा प्रचार करणार असे जाहीर केले.
प्रचार सभेत बोलताना नरेंद्र ठाकरे म्हणाले की शेतमालाला भाव मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहे. सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांमुळे शेतक-यांचा उत्पादन खर्चही निघणे मुश्कील झाले आहे. शेतक-यांनी यावेळी संजय खाडे यांच्या पाठिशी उभे राहावे. संजय खाडे हे शेतकरी आहे. त्यांच्या पाठपुराव्यामुळे अनेक शेतक-यांचे प्रश्न सुटले. त्यांना शेतक-यांच्या प्रश्नांची जाण आहे. त्यामुळे त्यांच्यासारख्या शेतक-याला विधानसभेत पाठवणे गरजेचे आहे. सभेत गौरीशंकर खुराणा यांनी सरकारच्या लाडकी बहिण योजनेवर टिका केली. गॅस, तेल याचे दर वाढवून बहिणीचे स्वयंपाकघर महायुती सरकारने वाढवले. अशी टिका त्यांनी केली.
झरी जामणी :तालुक्यातील मुकूटबन येथे रस्त्याचे रुंदीकरणाचे बांधकाम व रस्त्याला लागूनच एक वर्षापासून नवीन नालीचे...
वणीः- राष्ट्रीय पातळीवर छत्तीसगढ राज्यातील दुर्ग येथे दिनांक २४ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२४ या दरम्यान राष्ट्रीय पातळीवर...
वणी :दि. 1 जानेवारी 2025 रोजी नवीन वर्षाच्या शुभ मुहूर्तावर सृष्टीत किरण बहुउद्देशीय संस्था द्वारे दीनानाथ नगर लालगुडा...
वणी :वणी येथील नामांकित फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल आपला राजवाडा (प्रत्येक घासात आनंद )येथे कॅप्टन, वेटर सह सफाई कर्मचाऱ्यांची...
वणी :- वणी नगर परिषद आरोग्य विभागात कंत्राटी कामगार म्हणून नालीसफाई चे काम करणाऱ्या कामगारांवर उपासमारीची वेळ आली...
*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-भिमा...
वणीः- राष्ट्रीय पातळीवर छत्तीसगढ राज्यातील दुर्ग येथे दिनांक २४ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२४ या दरम्यान राष्ट्रीय पातळीवर...
वणी :दि. 1 जानेवारी 2025 रोजी नवीन वर्षाच्या शुभ मुहूर्तावर सृष्टीत किरण बहुउद्देशीय संस्था द्वारे दीनानाथ नगर लालगुडा...
वणी :वणी येथील नामांकित फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल आपला राजवाडा (प्रत्येक घासात आनंद )येथे कॅप्टन, वेटर सह सफाई कर्मचाऱ्यांची...