मातंग समाजाचा मनसेला पाठींबा, उंबरकरांचे वाढतंय बळ
वणी :महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार राजु उंबरकर यांच्याकरिता विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटना मैदानात...
Reg No. MH-36-0010493
वणी:- मुकुटबन तालुक्यातील मौजा रुईकोट येथील पाच एकर जमीन गट क्रमांक 49/5 ही जगन्नाथ महाराज देवस्थान वेगाव यांना कृष्णराव मंदावार यांनी दान दिली होती. ही शेत जमीन बीएस ईस्पात कोळसा कंपनीला जगन्नाथ महाराज देवस्थान कमिटीचे सचिव संजय देरकर यांनी सप्टेंबर 23 मध्ये धर्मदाय आयुक्त कार्यालयाची कोणतीही परवानगी न घेता करोडोचा भ्रष्टाचार करून जमीन कंपनीला कोळसा उत्खननाकरिता ताब्यात दिली. बिएस ईस्पात कंपनीने त्या पाच एकर जमिनीतून बेकायदेशीर रित्या 50 कोटी चे वर कोळसा उत्खनन करून विकला गेला. या सर्व प्रकारची तक्रार जगन्नाथ महाराजाचे भक्त व समाजसेवक बंडू देवाळकर यांनी ३/१०/२०२४ ला जिल्हाधिकारी यवतमाळ, जिल्हा खनिकर्म अधिकारी यवतमाळ, सहाय्यक धर्मादाय आयुक्त यवतमाळ, पोलीस स्टेशन मुकुटबन, यांचे कडे तक्रार केली. त्यानंतर कंपनी व संजय देरकर यांनी धावपळ करीत 17/ 10/ 2024 रोजी जमिनीची उधारीत विक्री केली त्यांचे विक्री पत्रात 2025 पर्यंतच्या पोष्ट डेटेड चेकचे विवरण दिलेले आहे. या संपूर्ण प्रकरणाची आम्ही पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांना माहिती दिली. परंतु त्यांनी कोणतीही दखल घेतली नाही. विक्री झाल्यानंतर संबंधित विभागाने या जमिनीचा फेरफार घेतला नाही व आज सुद्धा जगन्नाथ महाराज संस्थान वेगाव यांच्या नावाने सातबारा निघत आहे. कंपनीच्या नावाने जमीन नसताना सुद्धा जमिनीचे पूर्ण खोदकाम झालेले आहे.
तसेच या संपूर्ण प्रकरणाची तक्रार हायकोर्ट नागपूर खंडपीठ वकीला मार्फत चंद्रकांत घुगूल व गोविंदा निखाडे वेगाव यांनी नोटिसेस संबंधित विभागाला व संस्थेचे सचिव संजय देरकर यांना दिली. परंतु आजपर्यंत त्यांचे कोणतेही उत्तर आम्हाला मिळाले नाही. जगनाथ महाराज देवस्थानचे शेत जमिनीची व कंपनीची चौकशी ईडी यांनी सप्टेंबर 2024 मध्ये केली व त्याबाबत तहसील कार्यालय झरी याला पत्र सुद्धा दिले याशिवाय वणी विधानसभेतील जगन्नाथ महाराज यांचे मंदिरे व जमिनी बळकावल्या त्यांच्या संस्थेने अजून पर्यंत कोणताही हिशोब सार्वजनिक केला नाही. या संपूर्ण प्रकरणाबाबत तक्रार बंडू देवाळकर यांनी खान परिसरात येऊन जगन्नाथ महाराजांची पाच एकर जमीन दाखवण्याचे आव्हान केले. परंतु त्यांनी आजपर्यंत कोणतीही उत्तर दिले नाही. या सर्व प्रकरणाची दखल घ्यावी व त्यांना पोलीस प्रशासनाने ताब्यात घेऊन प्रकरणाची चौकशी करावी.अशी मागणी सुध्दा पत्रकार परिषदेत केली. तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कडे तक्रार करून सुद्धा त्यांनी याची दखल न घेता संजय देरकर यांना पक्षाची उमेदवारी दिली.त्यामुळे मी व माझे कार्यकर्त्यांनी सामुहिक राजीनामे दिले. अशी माहिती आज दिनांक १० नोव्हेंबर रोजी घरी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.
यावेळी चंद्रकांत घुगूल व पत्रकार उपस्थित होते.
वणी :महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार राजु उंबरकर यांच्याकरिता विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटना मैदानात...
वणी : शिवसेना (उबाठा) व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजय देरकर यांच्या प्रचारार्थ गुरुवार दिनांक 14 नोव्हेंबर रोजी...
उमरखेड (सय्यद रहीम रजा ):आज सोमवार ला महाविकास आघाडीचे उमेदवार साहेबराव कांबळे च्या प्रचारासाठी नाना पटोले यांची...
यवतमाळ : राज्यात दिनांक 20 नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे. आयोगाच्या निर्देशाप्रमाणे निवडणुकीचा दिवस व आदल्या दिवशी वर्तमानपत्रात...
वणी :मतांचा जोगवा आणि फोडाफोडीचे राजकारण करण्यात साऱ्या पक्ष आणि उमेदवार मश्गूल असताना, इकडे महाराष्ट्र नवनिर्माण...
वणी:- शहरातील एसबीआय बँके मधून ६० लाख रुपये सिमेंटच्या पोत्यात भरून घेऊन जात असताना भरारी पथकांनी टागोर चौक परिसरात...
वणी :महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार राजु उंबरकर यांच्याकरिता विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटना मैदानात...
वणी : शिवसेना (उबाठा) व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजय देरकर यांच्या प्रचारार्थ गुरुवार दिनांक 14 नोव्हेंबर रोजी...
उमरखेड (सय्यद रहीम रजा ):आज सोमवार ला महाविकास आघाडीचे उमेदवार साहेबराव कांबळे च्या प्रचारासाठी नाना पटोले यांची...