मुकूटबन येथे शौचालय व प्रवासी निवारा उपलब्ध करून द्या- सुरेंद्र गेडाम यांची मागणी
झरी जामणी :तालुक्यातील मुकूटबन येथे रस्त्याचे रुंदीकरणाचे बांधकाम व रस्त्याला लागूनच एक वर्षापासून नवीन नालीचे...
Reg No. MH-36-0010493
वणी : स्वयंपाक घरातील मूलभूत गरजाने कमालीच्या त्र्यागलेल्या माझ्या बहिणी व शेतकऱ्यांच्या उत्पादनाला मिळत असलेला तोडका भाव यावर तब्बल दहा वर्ष चिक्कार शब्द न काढणाऱ्या लोकप्रतिनिधीचे वांझोटेपण वेदनादायी आहे.हे जनसामान्यांचे प्रश्न किमान विधानसभेत लावून धरले असते तर मी दस्तूरखुद्द राजु उंबरकर आमदाराचा प्रचार करणार होतो अशी भूमिका नुकत्याच पार पडलेल्या राज ठाकरे यांच्या प्रचारसभेत उंबरकर यांनी विषद केली.
वणी विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजु उंबरकर यांच्या प्रचारार्थ आयोजित प्रचारसभेत मनसे सुप्रिमो राज ठाकरे आले असता ते बोलत होते.मागील अनेक वर्षांपासून या मतदारसंघात रस्त्याची पूर्णतः चाळणी झाली आहे. सोबत गॅस, तेल, वीज सारख्या मूलभूत गरजाचे दर गगणाला भिडले आहे. त्यामुळे माझ्या बहिणीचे स्वयंपाक घरात त्रेधातिरपट उडत आहे. शेतकऱ्यांच्या उत्पादनाला भाव तोडका आहे. किमान कापसाला दहा व सोयाबीनला सात हजार रुपये भाव अपेक्षित असतांना विद्यमान आमदार मूग गिळून आहे. या सर्व गरजात जीएसटी तब्बल 18 टक्के मानगुटीवर बसल्याने नागरिकांचे आर्थिक शोषण होत आहे.
सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नाला सपशेल बगल देत आमदार महोदय टक्केवारीत जाम खुश आहे. एकही प्रश्न विधानसभेत बोलू नये हे या मतदारसंघांचे दुर्देव असून माझ्या बहिणींच्या व शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत सभागृहात आवाज उठविला असता तर मी स्वतः आमदाराचा प्रचार केला असता. हे नमूद करतांना उंबरकर यांनी एकदा संधी देण्यावर भर दिला.
झरी जामणी :तालुक्यातील मुकूटबन येथे रस्त्याचे रुंदीकरणाचे बांधकाम व रस्त्याला लागूनच एक वर्षापासून नवीन नालीचे...
वणीः- राष्ट्रीय पातळीवर छत्तीसगढ राज्यातील दुर्ग येथे दिनांक २४ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२४ या दरम्यान राष्ट्रीय पातळीवर...
वणी :दि. 1 जानेवारी 2025 रोजी नवीन वर्षाच्या शुभ मुहूर्तावर सृष्टीत किरण बहुउद्देशीय संस्था द्वारे दीनानाथ नगर लालगुडा...
वणी :वणी येथील नामांकित फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल आपला राजवाडा (प्रत्येक घासात आनंद )येथे कॅप्टन, वेटर सह सफाई कर्मचाऱ्यांची...
वणी :- वणी नगर परिषद आरोग्य विभागात कंत्राटी कामगार म्हणून नालीसफाई चे काम करणाऱ्या कामगारांवर उपासमारीची वेळ आली...
*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-भिमा...