Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / प्रगती नगर परिसरात...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

प्रगती नगर परिसरात रात्री तिन घरी घरफोडी, शहरातील नागरिकांत भीतीचे वातावरण.

प्रगती नगर  परिसरात रात्री तिन घरी घरफोडी, शहरातील नागरिकांत भीतीचे वातावरण.
ads images

वणी :- वणी शहरात परत एकदा चोरट्यांनी डोके वर काढायला सुरुवात केली आहे. दिवाळी सणानिमित्त बाहेरगावी जाणाऱ्या नागरिकांच्या बंद घरांना चोरटे टार्गेट करू लागले आहेत. शहरातील प्रगती नगर येथील बंद घराला टार्गेट करून चोरट्यांनी चांदीच्या वस्तू व रोख रक्कमेवर हाथ साफ केला. ही घटना ८ नोव्हेंबर ते ९ नोव्हेंबर दरम्यान घडली. ९ नोव्हेंबरला घराचे दार उघडं दिसल्याने ही घटना उघडकीस आली.

शहरातील प्रगती नगर येथे वास्तव्यास असलेले निकेश अरुण माकडे (४४) हे दिवाळी निमित्त परिवारासह बाहेरगावी गेले होते. घरी कुणी नसल्याची संधी साधून चोरट्यांनी घरफोडी केली. घराचा कुलूप कोंडा तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. घरातील एका लोखंडी कपाटात ठेऊन असलेले रोख ४० हजार ५०० रुपये व दुसऱ्या लाकडी कपाटातील चांदीच्या तीन वाट्या, एक चमच, एक गडू, दोन करंडे, तीन नाणी व तीन चांदीचे बिस्कीट एकूण वजन ५०० ग्राम किंमत ५ हजार रुपये तसेच १० रुपयांच्या नोटांचे विस बंडल (२० हजार रुपये), ५०० च्या १४ नोटा (७ हजार रुपये) असा एकूण ७२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला. निकेश माकडे हे कुटुंबासह बाहेरगावी गेलेले असतांना त्यांचा दरवाजा खुला दिसल्याने ही घटना उघडकीस आली. निकेश माकडे यांनी घरी येऊन बघितले असता त्यांना घरातील दोनही कपाटातील मौल्यवान वस्तू व रोख रक्कम चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. त्यांनी याबाबत पोलीस स्टेशनला तक्रार नोंदविल्याने पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध बीएनएसच्या कलम ३३१ (३), ३३१(४), ३०५ (A) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार अनिल बेहेरानी यांच्या मार्गदर्शनात पोलिस करीत आहे.

ताज्या बातम्या

मुकूटबन येथे शौचालय व प्रवासी निवारा उपलब्ध करून द्या- सुरेंद्र गेडाम यांची मागणी 02 January, 2025

मुकूटबन येथे शौचालय व प्रवासी निवारा उपलब्ध करून द्या- सुरेंद्र गेडाम यांची मागणी

झरी जामणी :तालुक्यातील मुकूटबन येथे रस्त्याचे रुंदीकरणाचे बांधकाम व रस्त्याला लागूनच एक वर्षापासून नवीन नालीचे...

राष्ट्रीय पातळीवरील नृत्य स्पर्धेत वणीतील स्पर्धकांनी विविध नृत्य स्पर्धांमध्ये मारली बाजी. 02 January, 2025

राष्ट्रीय पातळीवरील नृत्य स्पर्धेत वणीतील स्पर्धकांनी विविध नृत्य स्पर्धांमध्ये मारली बाजी.

वणीः- राष्ट्रीय पातळीवर छत्तीसगढ राज्यातील दुर्ग येथे दिनांक २४ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२४ या दरम्यान राष्ट्रीय पातळीवर...

पीडित वृद्धाच्या सेवेसाठी  लालगुडा (वणी ) येथे माऊली वृद्धाश्रम  सुरु 02 January, 2025

पीडित वृद्धाच्या सेवेसाठी लालगुडा (वणी ) येथे माऊली वृद्धाश्रम सुरु

वणी :दि. 1 जानेवारी 2025 रोजी नवीन वर्षाच्या शुभ मुहूर्तावर सृष्टीत किरण बहुउद्देशीय संस्था द्वारे दीनानाथ नगर लालगुडा...

वणी येथील नामांकित हॉटेल आपला राजवाडा येथे कॅप्टन, वेटर सह सफाई कर्मचाऱ्यांची भरती सुरु 02 January, 2025

वणी येथील नामांकित हॉटेल आपला राजवाडा येथे कॅप्टन, वेटर सह सफाई कर्मचाऱ्यांची भरती सुरु

वणी :वणी येथील नामांकित फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल आपला राजवाडा (प्रत्येक घासात आनंद )येथे कॅप्टन, वेटर सह सफाई कर्मचाऱ्यांची...

नगर परिषद वणी आरोग्य विभाग कंत्राटी कामगारांवर उपासमारीची वेळ, काम द्या अन्यथा आंदोलन करू, कामगारांचा निवेदनातून इशारा. 02 January, 2025

नगर परिषद वणी आरोग्य विभाग कंत्राटी कामगारांवर उपासमारीची वेळ, काम द्या अन्यथा आंदोलन करू, कामगारांचा निवेदनातून इशारा.

वणी :- वणी नगर परिषद आरोग्य विभागात कंत्राटी कामगार म्हणून नालीसफाई चे काम करणाऱ्या कामगारांवर उपासमारीची वेळ आली...

*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न* 01 January, 2025

*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न*

*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-भिमा...

वणीतील बातम्या