यवतमाळ, वणी, आर्णी, दिग्रस मतदारसंघात गृहमतदानास प्रारंभ
यवतमाळ : विधानसभा निवडणुकीत 85 वर्षावरील मतदार आणि दिव्यांग मतदारांचे मतदानाचे प्रमाण वाढविण्यासोबतच त्यांना मतदानाची...
Reg No. MH-36-0010493
वणी - वणी विधानसभा क्षेत्रावर काँग्रेसचा दावा होता. वणी विधानसभा मतदारसंघ कायम काँग्रेसचा पारंपरिक गड राहिला आहे. मी काँग्रेसच्या उमेदवारीसाठी इच्छुक होतो. मात्र सर्वसामान्य जनतेच्या आग्रहानंतरही ही जागा शिवसेना (उबाठा) गटाला गेली. त्यामुळे काँग्रेस पक्षात प्रचंड नाराजी आहे. मी काँग्रेसचा निष्ठावान कार्यकर्ता आहे. मात्र अखेर कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव व प्रेमापोटी मला निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घ्यावा लागला. ही लढाई केवळ माझी नसून काँग्रेसच्या अस्तित्वासाठीची आहे. त्यामुळे मी लढणार आणि जिंकणार, अशी गर्जना संजय खाडे यांनी दिनांक ४ नोव्हेंबर रोजी वणीतील वसंत जिनिंग मधिल हॉल मध्ये पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. या पत्रकार परिषदेत शिवसेना व काँग्रेसचे अनेक प्रमुख नेते उपस्थित होते.सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी निवडणुकीच्या रिंगणात पत्रकार परिषदेत संजय खाडे म्हणाले की माझी लढाई ही शेतक-यांच्या हितासाठी राहणार आहे. कष्ट करून पिकवलेल्या शेतमालाला योग्य तो भाव न मिळणा-या कास्तकारासाठी आहे. परिसरात खनिज संपत्ती असूनही रोजगारासाठी झगडावे लागणा-या बेरोजगार भूमीपु्त्रांसाठी आहे. दलित, आदिवासी, मुस्लिम यांच्या हक्कासाठी आहे. माझा लढा वणी व गावात शुद्ध पाणी मिळावे, गोरगरीबांना योग्य ती आरोग्य सेवा मिळावी. निवडणूक जवळ आली की अचानक सक्रीय होणा-या प्रव़ृत्तीविरोधात आहे. जनतेच्या कामाला कोण धावून जाते व कोण निष्क्रीय आहे, हे जनतेला चांगलेच माहिती आहे. त्यामुळे या लढाईत सर्व जनता माझ्या पाठिशी उभी राहिल, असा मला ठाम विश्वास आहे. असेही ते म्हणाले. यावेळी बोलताना ते भावूक झाले व त्यांना अश्रू अनावर झाले.
शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष विश्वास नांदेकर म्हणाले की मी एक शिवसैनिक म्हणून राजकारण सुरु केले. आजही मी एक शिवसैनिकच आहे. गेल्या 30 वर्षांपासून मी राजकारणात आहे. राजकारणात असताना पदाची कधीही चिंता केली नाही. सोबत राहून पोटात खंजर खुपसण्याचे काम मी करीत नाही. त्यामुळे मी संजय खाडे यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. या लढाईत माझ्यासोबत वणी विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे तिन्ही तालुका प्रमुख आहेत. तर नरेंद्र ठाकरे म्हणाले की संजय खाडे यांनी काँग्रेस पक्षासाठी कायम निष्ठेने काम केले. निष्ठेने काम करणा-यांच्या मी कायम सोबत राहिलो आहे. एकिकडे निष्क्रिय माणूस आहे तर दुसरीकडे सक्रिय माणूस आहे. त्यामुळे संजय खाडे यांच्या पाठिशी उभे राहण्याचा निर्णय घेतल्याचे ठाकरे म्हणाले.
महाविकास आघाडीत उभी फूट
शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विश्वास नांदेकर, मारेगाव तालुका अध्यक्ष संजय आवारी, झरी तालुका अध्यक्ष चंद्रकांत घुगुल काँग्रेसचे नरेंद्र ठाकरे, पुरुषोत्तम आवारी, शंकर व-हाटे, तेजराज बोढे, पलाष बोढे, गौरीशंकर खुराणा यांच्यासह सुनील वरारकर, प्रशांत गोहोकार, पवन शाम एकरे यांनी त्यांना पाठिंबा जाहीर केला आहे. पत्रकार परिषदेला काँग्रेस, शिवसेना व विविध संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
यवतमाळ : विधानसभा निवडणुकीत 85 वर्षावरील मतदार आणि दिव्यांग मतदारांचे मतदानाचे प्रमाण वाढविण्यासोबतच त्यांना मतदानाची...
वणी :मतदारसंघात अनेक कोळसा खानी आणि विविध कंपन्या असून सुद्धा येथील युवक बेरोजगारच आहे. त्यामुळे मी निवडून आल्यानंतर...
वणी : विपुल खनिज संपत्तीने नटलेल्या वणी विभागाची सत्तेतील नेत्यांनी वाट लावली आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहे. तरुणाच्या...
वणी:- विपुल खनिज संपत्तीने नटलेल्या वणी विभागाची सत्तेतील नेत्यांनी वाट लावली आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहे. तरुणाच्या...
वणी: मनसेने सर्व बाजूने मतदारांना केंद्रित करत प्रचारामध्ये जोरदार आघाडी घेतली आहे. यात सर्वाधिक संख्या युवा आणि...
वणी -:- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण चांगलेच तापले आहे. प्रचारासाठी आता अवघा आठवडा उरला असतांना...
वणी:- विपुल खनिज संपत्तीने नटलेल्या वणी विभागाची सत्तेतील नेत्यांनी वाट लावली आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहे. तरुणाच्या...
:- वणी आज दिनांक ५ नोव्हेंबर रोजी सकाळी वणी वरोरा मार्गावरील रेल्वे गेटच्या बाजूला अनोळखी इसमाने गळफास घेतलेल्या...
वणी :वणी विधानसभा निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज घेण्याचा शेवटचा दिवस होता. आजच्या दिवशी चार उमेवारांनी अर्ज परत घेतला....