Home / यवतमाळ-जिल्हा / वणी विधानसभा निवडणुकीत...

यवतमाळ-जिल्हा

वणी विधानसभा निवडणुकीत एकूण 12 उमेदवार उभे,संजय खाडे पहिल्यादाच निवडणुकीच्या रिंगणात

वणी विधानसभा निवडणुकीत एकूण 12 उमेदवार उभे,संजय खाडे पहिल्यादाच निवडणुकीच्या रिंगणात
ads images

या उमेदवारांनी घेतला अर्ज मागे संजय खाडे यांची बंडखोरी, निवडणूक होणार चौरंगी....

वणी :वणी विधानसभा निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज घेण्याचा शेवटचा दिवस होता. आजच्या दिवशी चार उमेवारांनी अर्ज परत घेतला. सर्वांचे लक्ष लागलेले काँग्रेसचे संजय खाडे यांनी निवडणुकीच्या रिंगणात कायम राहण्याचा निर्णय घेतला. छाननीत 20 पैकी 4 उमेदवारांचा अर्ज बाद झाला होता. त्यामुळे 16 उमेदवार रिंगणात राहिले होते. तर आज दु. 3 वाजेपर्यंत 4 उमेदवारांनी अर्ज मागे घेतला. यात अजय पांडुरंग धोबे, आसिम हुसैन मंजूर हुसैन, यशवंत बोंडे व या अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे. काही वेळातच अपक्षांना निवडणूक चिन्ह वाटप केले जाणार आहे.

Advertisement

हे आहेत अंतिम उमेदवार

अरुणकुमार रामदास खैरे (बसपा), राजू मधुकरराव उंबरकर (मनसे), संजय निळकंठ देरकर (शिवसेना उबाठा), संजीवरेड्डी बापूराव बोदकुरवार (भाजप), अनिल घनश्याम हेपट (कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया), प्रवीण रामाजी आत्राम (राष्ट्रीय गोंडवाना पार्टी), राजेंद्र कवडुजी निमसटकर (वंचित बहुजन आघाडी), संजय रामचंद्र खाडे, केतन नत्थुजी पारखी, नारायण शाहु गोडे, हरिष दिगांबर पाते, निखिल धर्मा ढुरके असे 12 उमेदवार रिंगणात राहणार आहेत. तर आज यशवंत शिवराम बोंडे, राहुल नारायण आत्राम अजय पांडुरंग धोबे, आसिम हुसैन मंजूर हुसैन आज उमेदवारी अर्ज मागे घेतला. छाननीच्या दिवशी देवाराव आत्माराम वाटगुरे, सुनील गणपतराव राउत, रत्नपाल बापूराव कनाके, संतोष उद्धवराव भादीकर यांचे अर्ज बाद झाले होते. त्यामुळे रिंगणात 16 उमेदवार उरले होते.

वणी विधानसभा निवडणूक झाली रंगतदार

काँग्रेसचे संजय खाडे यांनी अर्ज भरल्यानंतर चार दिवसांत कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. या काळात त्यांनी विविध पक्ष, सामाजिक संघटना, नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या. तसेच इतर पक्षातील नाराज नेत्यांचीही त्यांनी भेट घेतली. या चर्चेनंतरच त्यांनी निवडणूक लढण्याचा निर्णय घेताल. दरम्यान आज सकाळपासूनच ते अर्ज परत घेणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. मात्र दुपारी ते अर्ज परत घेणार नाही हेजवळपास निश्चित झाले. दु. 3 पर्यंत त्यांनी अर्ज परत न घेतल्याने ते निवडणूक लढण्यावर शिक्कामोर्तब झाले. महाविकास आघाडीतील काही नेत्यांनी त्यांना समर्थन दिल्याचे बोलले जात आहे.

संजय खाडे यांच्या उमेदवारीमुळे आता वणी विधानसभेची निवडणूक चौरंगी होणार आहे. आ. संजीवरेडंडी बोदकुरवार, संजय देरकर, राजू उंबरकर व संजय खाडे यांच्यात मुख्य लढत होणार आहे. तर वंचितचे राजेंद्र निमसटकर, कम्युनिस्ट पक्षाचे अनिल हेपट व बसपाचे अरुणकुमार खैरे पक्षाचे उमेदवार देखील शर्यतीत आहे.

ताज्या बातम्या

यवतमाळ, वणी, आर्णी, दिग्रस मतदारसंघात गृहमतदानास प्रारंभ 14 November, 2024

यवतमाळ, वणी, आर्णी, दिग्रस मतदारसंघात गृहमतदानास प्रारंभ

यवतमाळ : विधानसभा निवडणुकीत 85 वर्षावरील मतदार आणि दिव्यांग मतदारांचे मतदानाचे प्रमाण वाढविण्यासोबतच त्यांना मतदानाची...

आमदार झाल्यास सर्व प्रथम २० हजार युवकास रोजगार उपलब्ध करुन देईल - उंबरकर 14 November, 2024

आमदार झाल्यास सर्व प्रथम २० हजार युवकास रोजगार उपलब्ध करुन देईल - उंबरकर

वणी :मतदारसंघात अनेक कोळसा खानी आणि विविध कंपन्या असून सुद्धा येथील युवक बेरोजगारच आहे. त्यामुळे मी निवडून आल्यानंतर...

आमदाराने विकासाच्या नावावर फक्त कमिशन खोरीचे धंदे केले -राजू उंबरकर यांचा घणाघात 13 November, 2024

आमदाराने विकासाच्या नावावर फक्त कमिशन खोरीचे धंदे केले -राजू उंबरकर यांचा घणाघात

वणी : विपुल खनिज संपत्तीने नटलेल्या वणी विभागाची सत्तेतील नेत्यांनी वाट लावली आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहे. तरुणाच्या...

आतापर्यंत सगळ्याला आजमावले एकदा मनसेला संधी द्या- राजू उंबरकर 13 November, 2024

आतापर्यंत सगळ्याला आजमावले एकदा मनसेला संधी द्या- राजू उंबरकर

वणी:- विपुल खनिज संपत्तीने नटलेल्या वणी विभागाची सत्तेतील नेत्यांनी वाट लावली आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहे. तरुणाच्या...

राजू उंबरकरच्या प्रचारात महिलांचा मोठा सहभाग 13 November, 2024

राजू उंबरकरच्या प्रचारात महिलांचा मोठा सहभाग

वणी: मनसेने सर्व बाजूने मतदारांना केंद्रित करत प्रचारामध्ये जोरदार आघाडी घेतली आहे. यात सर्वाधिक संख्या युवा आणि...

संजय खाडे यांच्या प्रचारासाठी पत्नी संगीता खाडे मैदानात, महिलाशक्तींनी पिंजून काढले वणी शहर, रोज विविध गावांचा दौरा. 13 November, 2024

संजय खाडे यांच्या प्रचारासाठी पत्नी संगीता खाडे मैदानात, महिलाशक्तींनी पिंजून काढले वणी शहर, रोज विविध गावांचा दौरा.

वणी -:- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण चांगलेच तापले आहे. प्रचारासाठी आता अवघा आठवडा उरला असतांना...

यवतमाळ-जिल्हातील बातम्या

आतापर्यंत सगळ्याला आजमावले एकदा मनसेला संधी द्या- राजू उंबरकर

वणी:- विपुल खनिज संपत्तीने नटलेल्या वणी विभागाची सत्तेतील नेत्यांनी वाट लावली आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहे. तरुणाच्या...

गळफास घेतलेल्या अवस्थेत अनोळखी ईसमाचा मॄतदेह आढळला.

:- वणी आज दिनांक ५ नोव्हेंबर रोजी सकाळी वणी वरोरा मार्गावरील रेल्वे गेटच्या बाजूला अनोळखी इसमाने गळफास घेतलेल्या...

आता लढणार आणि जिंकणार, संजय खाडे यांची पत्रकार परिषदेत गर्जना.

वणी - वणी विधानसभा क्षेत्रावर काँग्रेसचा दावा होता. वणी विधानसभा मतदारसंघ कायम काँग्रेसचा पारंपरिक गड राहिला आहे....