वणी:- वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष वाघमारे यांनी वणी तालुका अध्यक्ष पदी हरीश पाते यांची काही महिन्यां अगोदर निवड केली. पाते यांनी पक्षाला बांधिल राहून पक्ष वाढीसाठी खुप प्रयत्न केले,पक्षाची वाढ होत असताना विधनसभेची निवडून जाहीर झाली. पाते यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली होती पण ऐन वेळी पक्षात सभासद नसनाऱ्या व्यक्तिला जिल्हा अध्यक्ष यांनी वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी दिली.
त्यामुळे वणी तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नाराज होऊन ऐन वेळी तालुकाध्यक्ष हरीश पाते यांना उमेदवारी अर्ज दाखल करण्यास भाग पाडले.अशी माहिती आमच्या प्रतिनिधीनला देण्यात आली.
दिनांक २९ ऑक्टोंबर रोजी दुपारी पाते यांनी पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन उमेदवारी अर्ज दाखल केला.
यावेळी शिवाजी दुपारे, देवानंद झाडे, रविंद्र कांबळे,रज्जत सातपुते, गौतम जिवणे, प्रशांत गाडगे, सचिव मडावी,प्रशांत मडावी, पुखराज खैरे, आकाश बोरकर, अनिल पथाडे, नरेंद्र वाळके,बुध्दघोष लोणारे,अर्चना कांबळे, विशाखा लोखंडे, बबिता गाडगे, मधुमती वाळके, यासह असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.