वणी:- वणी विधानसभेची उमेदवारी शिवसेना उबाठा गटाचे संजय देरकर यांना जाहीर झालीआहे.संजय देरकर हे पुन्हा चौथ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. काल मंगळवार दिनांक २९ ऑक्टोबर, 2024 रोजी त्यांनी वणी शहरातून रॅली काढत आपल्या हजारो समर्थकांसह वणी विधानसभा मतदारसंघासाठी नामांकन अर्ज दाखल केला.यावेळी कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी पहायला मिळाली. ही गर्दी पाहून विरोधकांना घाम फुटला असल्याचे दिसून आले.
वणी विधानसभा मतदार संघामध्ये महाविकास आघाडीचे शिवसेना ठाकरे उबाठा गटाचे संजय देरकर यांना उमेदवारी देण्यात आली. संजय देरकर हे जनतेच्या विविध अडी अडचणी व समस्यांना घेऊन शासन दरबारी प्रश्न मांडण्यासाठी लढत आहे. ते नेहमी अग्रेसर असतात.त्यामुळे भक्कम जनाधाराची वोट बँक त्यांचेकडे आहे. याच आधारावर पुन्हा एकदा या निवडणुकीत आपलं नशीब आजमावणार आहेत. आपल्या हजारो समर्थकांसह जत्रा मैदानावरून रॅलीची सुरूवात करत शहरात जोरदार शक्ती प्रदर्शन केलें. वणी येथील उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी यांच्या कडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. मतदारांनी महाविकास आघाडीच्या पाठीशी उभे राहावे, भाजपच्या व मिंदे शासनाच्या खोटारड्या योजनांना बळी पडू नये. असंविधानिक शासनाने निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण योजना सुरु करून महिलांचे मतदान विकत घेण्याचा घात घातला आहे, शेतकऱ्यांच्या शेती पिकाला भाव नाही आणि हे खोटारडे सरकार शेतकऱ्याचा सन्मान करत असल्याचे सोंग करीत आहे असा घणाघात यावेळी खासदार संजय देशमूख यांनी केला.
यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय देशमुख, सुनिल कातकडे,उबाठाचे उप जिल्हा प्रमुख संजय निखाडे,दिपक कोकास, कॉंग्रेसचे माजी आमदार वामनराव कासावार, वसंत जिनिंगचे अध्यक्ष आशिष खुलसंगे, यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष प्रा. टिकाराम कोंगरे, मोरेश्वर पावडे, डॉ.महेंन्द्र लोढा, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे महाराष्ट्र प्रदेश संघटक विजय नगराळे, सचिव गुणवंत टोंगे, दिलीप भोयर, मेघराज गेडाम,आबिद हुसेन यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.