Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / नागपुरात प्रहारला भगदाड,...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

नागपुरात प्रहारला भगदाड, उपजिल्हाप्रमुख मनसेत दाखल

नागपुरात प्रहारला भगदाड, उपजिल्हाप्रमुख मनसेत दाखल
ads images

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षनेते नेते राजु उंबरकर यांच्या हस्ते आज वणी येथील पक्ष कार्यालयात माहूरकर यांचा मनसेत पक्ष प्रवेश सोहळा सम्पन्न

वणी :विधानसभेच्या तोंडावर विविध राजकीय घडामोडीला वेग आला. यातच आज प्रहार जनशक्ती पक्षाला रामराम करत जिल्हा उप प्रमुख निलेश माहूरकर यांनी आपल्या समर्थकांसह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत दाखल झाले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षनेते नेते राजु उंबरकर यांच्या हस्ते आज वणी येथील पक्ष कार्यालयात माहूरकर यांचा मनसेत पक्ष प्रवेश पार पडला.  माहूरकर यांच्या पक्षप्रवेशनाने मनसेला बळ मिळाले असून आगामी विधानसभेत याचा फायदा पक्षाला होणारं असल्याचे बोलले जात आहे.

Advertisement

निलेश माहुरकर यांनी प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षात अनेक सामाजिक आणि राजकीय उपक्रमासह विविध मुद्द्याला घेऊन आक्रमक स्वरूपाचे आंदोलने केली होती. तर नुकत्याच पार पडलेल्या बुटीबोरी नगर परिषदेमध्ये त्यांनी निवडणूक लढवून समाधानकारक मताधिक्य प्राप्त केले होते. तर कामगार क्षेत्रामध्ये विविध कंपन्यावर त्यांनी कामगार संघटनेच्या माध्यमातून पकड निर्माण केली असून नामांकित कंपन्यावर प्रहार जनशक्ती पक्षाच्या कामगार संघटना उभ्या केल्या. आता या सर्वांचा फायदा मनसेच्या पदरात पडणार. माहूरकर यांनी आज अचानक मनसेत प्रवेश केल्याने विविध राजकिय चर्चांना उधाण आले. मनसेचे नेते राजु उंबरकर यांनी माहूरकर यांच्या गळ्यात पक्षाचा दुप्पटा टाकून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी नागपुर जिल्हाध्यक्ष आदित्य दुरुगकर, बिजाराम किनकर ( हिंगणा मनसे उमेदवार) वणी तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार, शिवराज पेचे, विलन बोदाडकर, अजित शेख, शुभम भोयर, मयूर गेडाम, संदिप वाघमारे, लक्की सोमकुंवर यांच्या सह नागपुर येथिल सर्व पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते..

Advertisement

ताज्या बातम्या

अखेर महाविकास आघाडीचा वणी विधानसभेचा उमेदवार जाहीर 23 October, 2024

अखेर महाविकास आघाडीचा वणी विधानसभेचा उमेदवार जाहीर

वणी : वणी विधानसभा निवडणुकीसाठी गेल्या कित्येक महिन्यापासून उत्सुकता लागलेल्या महाविकास आघाडीच्या वणी विधानसभा...

 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृती समिती सौभाग्य नगर हुडकेश्वर द्वारा कोजागिरी उत्सव सम्पन्न 23 October, 2024

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृती समिती सौभाग्य नगर हुडकेश्वर द्वारा कोजागिरी उत्सव सम्पन्न

वणी :दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा कोजागिरी पौर्णिमेचा कार्यक्रम पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृती समिती सौभाग्य...

नागपुरात प्रहारला भगदाड, उपजिल्हाप्रमुख मनसेत दाखल 23 October, 2024

नागपुरात प्रहारला भगदाड, उपजिल्हाप्रमुख मनसेत दाखल

वणी :विधानसभेच्या तोंडावर विविध राजकीय घडामोडीला वेग आला. यातच आज प्रहार जनशक्ती पक्षाला रामराम करत जिल्हा उप प्रमुख...

बौद्ध धर्माची दीक्षा घेणाऱ्या गंगन्ना ड्यागर्लावार परिवाराचा सत्कार 21 October, 2024

बौद्ध धर्माची दीक्षा घेणाऱ्या गंगन्ना ड्यागर्लावार परिवाराचा सत्कार

झरी :गगन्ना ड्यागर्लावार व त्यांच्या परिवाराच्या सगळ्या सदस्यानी धम्मचक्र प्रवर्तन दिनी नागपुर येथे बौद्ध धर्माची...

*नाभिक समाज संघटनेचे कार्य कौतुकास्पद - भूषण फुसे*    *नगाजी महाराज पुण्यतिथी सोहळा संपन्न* 21 October, 2024

*नाभिक समाज संघटनेचे कार्य कौतुकास्पद - भूषण फुसे* *नगाजी महाराज पुण्यतिथी सोहळा संपन्न*

*नाभिक समाज संघटनेचे कार्य कौतुकास्पद - भूषण फुसे* *नगाजी महाराज पुण्यतिथी सोहळा संपन्न* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा...

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेश संघटक सचिव विजय नगराळे व डॉ. सौ.संचिता विजय नगराळे यांचे चिरंजीव. 21 October, 2024

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेश संघटक सचिव विजय नगराळे व डॉ. सौ.संचिता विजय नगराळे यांचे चिरंजीव.

शुभेच्छुक:-आई, वडील आजी, व आप्त परिवार तसेच मित्र मंडळ....

वणीतील बातम्या

अखेर महाविकास आघाडीचा वणी विधानसभेचा उमेदवार जाहीर

वणी : वणी विधानसभा निवडणुकीसाठी गेल्या कित्येक महिन्यापासून उत्सुकता लागलेल्या महाविकास आघाडीच्या वणी विधानसभा...

बीजेपीचा वणी विधानसभा क्षेत्राचा उमेदवार ठरला

वणी :भारतीय जनता पार्टी ने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज महाराष्ट्रातील एकूण 99 उमेदवारांच्या नावाची घोषणा...