Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / देवस्थान समितीची शेत...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

देवस्थान समितीची शेत जमीन परस्पर विक्री केल्याच्या आरोपाचे संजय देरकर यांनी केले खंडन

देवस्थान समितीची शेत जमीन परस्पर विक्री केल्याच्या आरोपाचे संजय देरकर यांनी केले खंडन
ads images

राजकीय वैमनस्यातून माझ्यावर करण्यात आलेले आरोप खोटे असल्याचे संजय देरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन केले खंडन

वणी:सद्गुरू जगन्नाथ महाराज संस्थान वेगावच्या नावाने नोंदणीकृत असलेली झरी जामणी तालुक्यातील रुईकोट येथील शेत जमीन मे. बी.एस. इस्पात लि. या कोळसाखानी करीता परस्पर विक्री केल्याचा बंडू देवाळकर या व्यक्तीने पत्रकार परिषदेतून केलेला आरोप धादांत खोटा असून एखाद्याच्या स्वच्छ प्रतिमेला दाग लावण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे. यामागे राजकीय षडयंत्र असून त्याचा बोलविता धनी कुणी तरी वेगळाच आहे. राजकीय कुरघोडीतुन अशा प्रकरे लांछन लावण्याचे कुटील प्रयत्न सुरु झाले आहेत. जगन्नाथ महाराज संस्थानच्या नावाने धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत असलेली ही शेत जमीन त्यांची रीतसर परवानगी घेऊनच विक्री करण्यात आली आहे. तसेच जगन्नाथ महाराज देवस्थान समितीचा ठराव घेऊन व ठरव बुकात नोंदणी करून हा व्यवहार करण्यात आला आहे. त्यामुळे जगन्नाथ महाराज संस्थानच्या नावे असलेली शेत जमीन आर्थिक हव्यासापोटी परस्पर विक्री केल्याचा हेतुपुरस्सरपणे करण्यात आलेला आरोप बिनबुडाचा असल्याचे स्पष्टीकरण संस्थानचे विश्वस्त संजय देरकर यांनी १७ ऑक्टोंबर रोजी पत्रकार परिषदेतून दिले.

Advertisement

जगन्नाथ महाराज संस्थानची जमीन बी,एस. इस्पात लि. या कंपनीला परस्पर विकून संजय देरकर यांनी आपला आर्थिक फायदा करून घेतल्याचा तथ्यहीन आरोप बंडू देवाळकर या व्यक्तीने पत्रकार परिषद घेऊन केला. त्यावर स्पष्टीकरण देण्याकरिता संजय देरकर यांनी देखील पत्रकार परिषद घेऊन या आरोपाचे पूर्णपणे खंडन केले आहे. झरी जामणी तालुक्यातील रुईकोट येथील जगन्नाथ महाराज संस्थान वेगावच्या नावे रजिस्टर असलेली ही पाच एकर शेत जमीन सन १९७४ साली रामलू उर्फ रामन्ना बकन्नाजी मंदावार यांनी वणी रजिस्टर कार्यालयात बक्षिस पत्राद्वारे संस्थानला दान दिली. त्यानंतर १९८६ साली संस्थानच्या वतीने धर्मदाय आयुक्ताकडे या शेत जमिनीची नोंदणी करण्यात आली.

Advertisement

१९८६ पासून जगन्नाथ महाराज संस्थान वेगावच्या नावे ही शेत जमीन रजिस्टर असून तशी सातबाऱ्यावर नोंद देखील आहे. दरम्यान मे. बी. एस. इस्पात लि. या कंपनीने कोळसाखानी करीता येथील शेत जमिनी अधिग्रहित केल्या. मात्र सर्वे नंबर ४९/५  मधील २.२ हेक्टर असलेली ही शेत जमीन जगन्नाथ महाराज संस्थानच्या नावे रजिस्टर असल्याने ती अधिग्रहित होणे बाकी होते. त्यामुळे कोळसा कंपनी वारंवार या शेत जमिनी बाबत पाठपुरावा करीत होती. त्याकरिता २५ जानेवारी २०२४ रोजी धर्मदाय आयुक्त अमरावती यांच्याकडे या शेत जमिनीच्या विक्री बाबत परवानगी मिळण्याकरिता देवस्थान समिती कडून अर्ज सादर करण्यात आला. त्यानुसार १९ सप्टेंबर २०२४  रोजी शेत जमीन विक्री करण्याकरिता धर्मादाय आयुक्तांकडून परवानगी मिळाली. ही सर्व प्रक्रिया नियमानुसार करण्यात आली. शेत जमीन खरेदी विक्रीचे सर्व व्यवहारही पारदर्शकपणे झाले आहेत. जगन्नाथ महाराज संस्थानच्या खात्यातच ही सर्व रक्कम जमा होणार आहे. त्यातून दुसरीकडे शेत जमीन घेऊन सद्गुरू जगन्नाथ महाराज यांचं देवस्थान बांधण्यात येणार आहे. मंदावार यांनी दान केलेल्या शेत जमिनीचे ट्रस्टी म्हणून मंदावार कुटुंबातील सदस्यच जबादारी पार पाडत होते. त्यामुळे जगन्नाथ महाराज संस्थान वेगावच्या नावे रजिस्टर असलेली शेत जमीन परस्पर विक्री केल्याचा माझ्यावर करण्यात आलेला आरोप धादांत खोटा असल्याचे स्पष्टीकरण संजय देरकर यांनी पत्रकार परिषदेतून दिले आहे.

ताज्या बातम्या

हच.आर.जि. ट्रान्सपोर्ट  कंपनीतर्फे  ज्वलनशील इंधनाची रिफिलिंग मुख्य मार्गावर नागरिकांच्या जीवितेला धोका. 18 October, 2024

हच.आर.जि. ट्रान्सपोर्ट कंपनीतर्फे ज्वलनशील इंधनाची रिफिलिंग मुख्य मार्गावर नागरिकांच्या जीवितेला धोका.

घुग्घूस : वेकोलीच्या पैनगंगा मुंगोली खाणीत कोळसा वाहतूक करणारी वादग्रस्त हच. आर. जि.कंपनीचा धोकादायक प्रकरण उघडकीस...

देवस्थान समितीची शेत जमीन परस्पर विक्री केल्याच्या आरोपाचे संजय देरकर यांनी केले खंडन 17 October, 2024

देवस्थान समितीची शेत जमीन परस्पर विक्री केल्याच्या आरोपाचे संजय देरकर यांनी केले खंडन

वणी:सद्गुरू जगन्नाथ महाराज संस्थान वेगावच्या नावाने नोंदणीकृत असलेली झरी जामणी तालुक्यातील रुईकोट येथील शेत जमीन...

वणी शहरातील सर्वात मोठं फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल आपला राजवाडा 22 ऑक्टोबर पासून आपल्या सेवेत. 17 October, 2024

वणी शहरातील सर्वात मोठं फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल आपला राजवाडा 22 ऑक्टोबर पासून आपल्या सेवेत.

वणी : वणी शहरातील व परिसरातील खास खव्ययांसाठी व्हेज -नॉनव्हेज पदार्थांची विशेष मेजवानी सह भरपूर वेरायटी युक्त हॉटेल...

बोरी (बु ) येथील 32 वर्षीय विवाहित युवकाने विहिरीत उडी टाकून केली आत्महत्या 17 October, 2024

बोरी (बु ) येथील 32 वर्षीय विवाहित युवकाने विहिरीत उडी टाकून केली आत्महत्या

मारेगाव: तालुक्यातील बोरी( बु )येथील 32 वर्षीय युवकाची गावाजवळील नाल्याच्या काठावर असलेल्या सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या...

महात्मा ज्योतिबा फुलेंच्या तैलचित्राचे सौंदर्यी करण कामाचे भूमिपूजन. 16 October, 2024

महात्मा ज्योतिबा फुलेंच्या तैलचित्राचे सौंदर्यी करण कामाचे भूमिपूजन.

वणी:- शहरातील महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्रा जवळील सौंदर्यीकरणाच्या कामाचा भूमिपूजन...

शेणगाव ग्रामसभेत नागरिकांचा आक्रोश, दारुड्या उपसरपंचावर कारवाईची मागणी. 16 October, 2024

शेणगाव ग्रामसभेत नागरिकांचा आक्रोश, दारुड्या उपसरपंचावर कारवाईची मागणी.

घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...

वणीतील बातम्या

हच.आर.जि. ट्रान्सपोर्ट कंपनीतर्फे ज्वलनशील इंधनाची रिफिलिंग मुख्य मार्गावर नागरिकांच्या जीवितेला धोका.

घुग्घूस : वेकोलीच्या पैनगंगा मुंगोली खाणीत कोळसा वाहतूक करणारी वादग्रस्त हच. आर. जि.कंपनीचा धोकादायक प्रकरण उघडकीस...

वणी शहरातील सर्वात मोठं फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल आपला राजवाडा 22 ऑक्टोबर पासून आपल्या सेवेत.

वणी : वणी शहरातील व परिसरातील खास खव्ययांसाठी व्हेज -नॉनव्हेज पदार्थांची विशेष मेजवानी सह भरपूर वेरायटी युक्त हॉटेल...

महात्मा ज्योतिबा फुलेंच्या तैलचित्राचे सौंदर्यी करण कामाचे भूमिपूजन.

वणी:- शहरातील महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्रा जवळील सौंदर्यीकरणाच्या कामाचा भूमिपूजन...