मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.
...
Reg No. MH-36-0010493
पुणे: धनगर समाजाच्या हक्काचे अनुसूचित जमातीचे (एसटी) आरक्षण तातडीने लागू करण्याचा शासन निर्णय उद्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत काढावा, या मागणीसाठी सकल धनगर समाजातर्फे रविवारी पुण्यात ढोल वादन आंदोलन करण्यात आले. सारसबागजवळील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुतळ्याला अभिवादन करून धनगर समाजबांधवांनी एसटी आरक्षण लागू करण्याची मागणी केली.
पुणे, पिंपरी-चिंचवड परिसरातील शेकडो धनगर बांधव, भगिनी यामध्ये सहभागी झाले होते. ऍड. विजय गोफणे, सोमनाथ देवकाते, अनिकेत कवाने, डी. बी. नाईक, मधुसूदन बरकडे, योगेश खरात, महादेव वाघमोडे, विष्णुदास गावडे, सुनंदा गडदे, पिंटू कोकरे, भरत गुरव, डॉ. सुधाकर न्हाळदे, खंडू तांबडे यासह अन्य धनगर बांधव उपस्थित होते.
ऍड. विजय गोफणे म्हणाले, "राज्यघटनेने धनगरांना एसटी प्रवर्गात आरक्षण दिलेले आहे. मात्र, राज्य सरकारकडून त्याची अंमलबजावणी केली जात नाही. आजवर अनेकदा धनगर समाजाची फसवणूक झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शब्दाला जगणारे नेते आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे. त्यामुळे उद्याच्या मंत्रिमंडळ बैठकीचे यासंदर्भातील शासन निर्णय काढून मुख्यमंत्र्यांनी धनगर समाजाला दिलेला शब्द खरा करावा. तसे झाले, तर येत्या निवडणुकीत राज्यातील दोन कोटी धनगर समाज त्यांच्या पाठीशी राहील."
"आचारसंहिता लागण्यापूर्वी महायुती सरकारने हा निर्णय घेतला नाही, तर विधानसभा निवडणुकीत धनगर समाज आपली ताकद दाखवून देईल. राज्यातील ८० ते ९० मतदारसंघात धनगर समाजाची निर्णायक भूमिका राहणार आहे. तर ७० ते ८० मतदारसंघात ५० ते ६० हजारांचे मतदान धनगर समाजाचे आहे. त्यामुळे महायुती सरकारने धनगर समाजाचा पाठिंबा मिळवायचा, की समाजाचा रोष ओढवून घ्यायचा, हे मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व मंत्रिमंडळाने ठरवावे," असे गोफणे म्हणाले.
वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...
वणी:- वणी येथील बालकलावंतांनी चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ बालनाट्य स्पर्धेत द्वितीय...
वणी :- नागपूर येथे राज्याचे हिवाळी अधिवेशन चालू असून विरोधकांकडून सरकारला विविध प्रश्नावर घेतल्या जात आहे. तारीख १८...
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...
वणी:- परभणी येथे १० डिसेंबर रोजी एका समाजकंटकाने भारतीय संविधानाची प्रतिकृतीची विटंबना केली. या देशद्रोही कृत्याचा...
वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...
वणी:- वणी येथील बालकलावंतांनी चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ बालनाट्य स्पर्धेत द्वितीय...