Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / नगर परिषद शाळा क्रमांक...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

नगर परिषद शाळा क्रमांक ७ ही सर्वोत्तम शाळा, आमदार बोदकुरवार.

नगर परिषद शाळा क्रमांक ७ ही सर्वोत्तम शाळा, आमदार बोदकुरवार.

वणी:   वणी शहरामधील सेमी इंग्लिश माध्यमांमधून शिक्षण देणारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नगर परिषद शाळा क्रमांक ७ ही शैक्षणिक बाबी सोबत इतर उपक्रम राबविणारी ही सर्वोत्तम शाळा आहे. अशी प्रशंसा आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी केली. ते शाळेत आयोजित केलेल्या विद्यार्थ्यांच्या बालसभेत शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत झळकलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करतांना बोलत होते.

  या बालसभेच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक गजानन कासावार हे होते. प्रमुख अतिथी म्हणून शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा योगिता निंबाळकर, मनीषा गायकवाड, जयेश चोरडिया हे होते.

      सर्वप्रथम बालसभेला सुरुवात होवून इयत्ता सहाव्या वर्गातील विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमावर आधारित कविता, गोष्टी, नाटिका, थोर पुरुषांची माहिती दिली. त्यानंतर आमदार बोदकुरवार यांनी यावर्षी इयत्ता पाचव्या वर्गातून शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत स्थान मिळविलेल्या वैष्णवी सुदामा बघेल हिचा व तिच्या आईचा व वर्ग शिक्षक दिगांबर ठाकरे यांना भेटवस्तू  शाल श्रीफळ व प्रमाणपत्र देवून आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. त्यानंतर आमदारांनी शाळेला 2 कोटी 15 लाख रुपयाचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल शाल श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला.

     पुढे बोलताना आमदार बोदकुरवार म्हणाले की, नगर परिषद शाळा क्रमांक ७ मधील विद्यार्थी दरवर्षी शिष्यवृत्ती परीक्षेत मेरिट मध्ये येतात. या शाळेत उत्कृष्ठ शिक्षणासोबत विविध सहशालेय उपक्रम राबवून विद्यार्थ्यांचा विकास घडवून आणल्या जातो ही आनंदाची बाब आहे. त्यामुळेच या शाळेला अत्याधुनिक करण्यासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला आहे. यावेळी शाळेतील शिक्षक कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

ताज्या बातम्या

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. 20 December, 2024

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

...

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन 20 December, 2024

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन

वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...

चंद्रपूर येथे झालेल्या बालनाट्य स्पर्धेत वणीच्या चमुला द्वितीय पारितोषिक. 19 December, 2024

चंद्रपूर येथे झालेल्या बालनाट्य स्पर्धेत वणीच्या चमुला द्वितीय पारितोषिक.

वणी:- वणी येथील बालकलावंतांनी चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ बालनाट्य स्पर्धेत द्वितीय...

आ. संजय देरकर यांनी कपासीचे झाड घेवून मागितला शेतकऱ्यांना  न्याय. 18 December, 2024

आ. संजय देरकर यांनी कपासीचे झाड घेवून मागितला शेतकऱ्यांना न्याय.

वणी :- नागपूर येथे राज्याचे हिवाळी अधिवेशन चालू असून विरोधकांकडून सरकारला विविध प्रश्नावर घेतल्या जात आहे. तारीख १८...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* 16 December, 2024

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...

परभणी येथील भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची  विटंबना करणाऱ्यां समाज कंठकावर कारवाई करा, भारतीय बौध्द महासभा,समता सैनिक दल व वंचित बहुजन आघाडी यांची मागणी. 16 December, 2024

परभणी येथील भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्यां समाज कंठकावर कारवाई करा, भारतीय बौध्द महासभा,समता सैनिक दल व वंचित बहुजन आघाडी यांची मागणी.

वणी:- परभणी येथे १० डिसेंबर रोजी एका समाजकंटकाने भारतीय संविधानाची प्रतिकृतीची विटंबना केली. या देशद्रोही कृत्याचा...

वणीतील बातम्या

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन

वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...

चंद्रपूर येथे झालेल्या बालनाट्य स्पर्धेत वणीच्या चमुला द्वितीय पारितोषिक.

वणी:- वणी येथील बालकलावंतांनी चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ बालनाट्य स्पर्धेत द्वितीय...