मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.
...
Reg No. MH-36-0010493
झरी :निसर्गाच्या लहरीपणामुळे झरी तालुक्यात शेतपिकांचे मोठे नुकसान झाले असून, त्यामुळे शेतकरी हतबल झालेला आहे.खरीप हंगामात विमा भरला असता नुकसान झाल्याचा क्लेम शेतकऱ्यांनी केला. अशा परिस्थितीत पंचनामा करण्यासाठी आलेल्या विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींनी बाजार मांडला असून, नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्यासाठी प्रती पीक २०० तर प्रति सातबारा १००० रुपयांचा भावच ठरविला आहे. त्यामुळे यातून शेतकऱ्यांची प्रचंड लूट सुरू आहे.दरम्यान हा सर्व प्रकार घडत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. झरी तालुक्यात अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. ज्या शेतकऱ्यांनी पीकविमा भरला व ज्यांनी ७२ तासांत विमा कंपनीकडे तक्रारी केल्या, अशाच शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करण्याचे काम सध्या सुरू आहे. त्यासाठी विमा कंपनीमार्फत नेमण्यात आलेले प्रतिनिधी गावोगावी जाऊन शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे पंचनामे करत आहेत.
मात्र, नुकसानीचा आर्थिक गैरफायदा उचलत विमा कंपनीचे हे प्रतिनिधी प्रती पीक व प्रती गट क्रमांक दोनशे ते हजार रुपयांपर्यंत रक्कम उकळत आहेत.जास्त पैसे दिले तर जास्त हेक्टर नुकसान दाखवू असे प्रतिनिधी सांगून पैसे उकळत आहेत.एका शेतकऱ्याने चार ते पाच पिके लावली आहेत.तसेच एका शेतकऱ्याच्या कुटुंबियांचे अनेक खाते आहेत. अडकोली येथील एका शेतकऱ्याला ४ हजार मागणी केली असता संतप्त शेतकऱ्याने त्या प्रतिनिधीला बियर बार च्या समोर चांगलाच चोप दिल्याचे माहिती मिळाली.अशा शेतकऱ्यांनी हजारो रुपये मोजले तरच विमा कंपनीचे प्रतिनिधी पंचनामे करतात.तरी याकडे कृषी विभागाने तातडीने लक्ष देण्याची गरज आहेत.
सर्व पंचनामे हे एकाच ठिकाणी बसून करण्यात येत असून अडकोली,पवणार, मार्की, खडकडोह यासह तालुक्यातील सर्वच गावांत असा प्रकार सुरू आहे. शेतकरी वर्गाला देशोधडीला लावत त्यांच्याकडून पैसे उकळण्याच्या या प्रकाराची गंभीर दखल घेऊन संबंधित विमा कंपनीचे प्रतिनिधी व त्यांना पाठीशी घालणारे संबंधित विभाग यासह सर्व चौकशी करून त्यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करावेत. नामदेव गोहोकार
शेतकरी (अडकोली)
वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...
वणी:- वणी येथील बालकलावंतांनी चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ बालनाट्य स्पर्धेत द्वितीय...
वणी :- नागपूर येथे राज्याचे हिवाळी अधिवेशन चालू असून विरोधकांकडून सरकारला विविध प्रश्नावर घेतल्या जात आहे. तारीख १८...
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...
वणी:- परभणी येथे १० डिसेंबर रोजी एका समाजकंटकाने भारतीय संविधानाची प्रतिकृतीची विटंबना केली. या देशद्रोही कृत्याचा...
झरी :तालुक्यातील मुकुटबन येथील विठ्ठल दासरवार या शेतकऱ्याच्या सम्पूर्ण शेताची रान डुकराने नासाडी करून उभे कापसाचे...
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश, होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश, मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश, असा साजरा...
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश, होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश, मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश, असा साजरा...