Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / लवकरच ७२ ओबीसी वसतिगृहांची...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

लवकरच ७२ ओबीसी वसतिगृहांची मागणी पूर्ण करु; ओबीसी हितासाठी कटिबध्द : उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस

लवकरच ७२ ओबीसी वसतिगृहांची मागणी पूर्ण करु; ओबीसी हितासाठी कटिबध्द : उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस
ads images

आज महाराष्ट्रातील ७२ पैकी ४४ ओबीसी शासकीय वस्तीगृहाचे लोकार्पण संपन्न, ४४ ओबीसी शासकीय वस्तीगृह सुरु झाल्याचे समाधान : डॉ. अशोक जीवतोडे

चंद्रपूर : आता विविध घटकांमध्ये सर्वात जास्त वसतिगृह ओबीसींचे सुरू आहे, लवकरच ओबीसींच्या ७२ शासकीय वसतिगृहांची मागणी पूर्ण करु, तरुणाई स्वतःच्या पायावर उभी राहावी, यासाठी वसतिगृह उपयोगी ठरतील. ओबीसी करीता सर्वाधिक ४८ शासन निर्णय माझ्या कारकीर्दीत निघाले, याचे मला समाधान आहे. हे सर्व ओबीसी समाज पाठीशी असल्यामुळे करु शकलो, मी ओबीसी हितासाठी कटिबध्द राहील, असे ४४ शासकीय वसतिगृहांच्या लोकार्पण सोहळा प्रसंगी उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Advertisement

राज्यातील इतर मागास बहुजन कल्याण मुलां-मुलींच्या ४४ शासकीय वसतिगृहांचा लोकार्पण सोहळा आज (दि.९) ला नागपूर येथील वर्धा रोड वरील मेट्रो स्टेशन सभागृहात संपन्न झाला. सदर उद्घाटन सोहळा इतर मागास बहुजन कल्याण विभागाअंतर्गत आयोजित करण्यात आला होता.

Advertisement

या सोहळ्याचे उद्घाटक केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी, अध्यक्षस्थानी राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, प्रमुख अतिथी इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री ना. अतुल सावे उपस्थित होते. यासह नागपूर विभागातील विविध आमदार उपस्थित होते.

ओबीसी संघटनांच्या माध्यमातून ओबीसी विद्यार्थ्यांकरिता राज्य सरकारतर्फे शासकीय वसतिगृह सुरु करण्यात यावे, अशी मागणी होती. या मागणीला यश आले असुन मागणी असलेल्या ७२ वसतिगृहापैकी ४४ शासकीय वसतिगृह भारतीय जनता पक्ष प्रणित महायुती सरकारतर्फे लोकार्पित करण्यात आली.

४४ ओबीसी शासकीय वस्तीगृह सुरु झाल्याचे समाधान डॉ. अशोक जीवतोडे यांनी या निमित्ताने व्यक्त केले.या उद्घाटन सोहळ्याकरीता नागपूर येथे चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोली, नागपूर जिल्ह्यातून भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. अशोक जीवतोडे यांच्या नेतृत्वात शेकडो ओबीसी विद्यार्थी व समाज बांधव उपस्थित होते.

ताज्या बातम्या

बौद्ध धर्माची दीक्षा घेणाऱ्या गंगन्ना ड्यागर्लावार परिवाराचा सत्कार 21 October, 2024

बौद्ध धर्माची दीक्षा घेणाऱ्या गंगन्ना ड्यागर्लावार परिवाराचा सत्कार

झरी :गगन्ना ड्यागर्लावार व त्यांच्या परिवाराच्या सगळ्या सदस्यानी धम्मचक्र प्रवर्तन दिनी नागपुर येथे बौद्ध धर्माची...

*नाभिक समाज संघटनेचे कार्य कौतुकास्पद - भूषण फुसे*    *नगाजी महाराज पुण्यतिथी सोहळा संपन्न* 21 October, 2024

*नाभिक समाज संघटनेचे कार्य कौतुकास्पद - भूषण फुसे* *नगाजी महाराज पुण्यतिथी सोहळा संपन्न*

*नाभिक समाज संघटनेचे कार्य कौतुकास्पद - भूषण फुसे* *नगाजी महाराज पुण्यतिथी सोहळा संपन्न* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा...

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेश संघटक सचिव विजय नगराळे व डॉ. सौ.संचिता विजय नगराळे यांचे चिरंजीव. 21 October, 2024

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेश संघटक सचिव विजय नगराळे व डॉ. सौ.संचिता विजय नगराळे यांचे चिरंजीव.

शुभेच्छुक:-आई, वडील आजी, व आप्त परिवार तसेच मित्र मंडळ....

बीजेपीचा वणी विधानसभा क्षेत्राचा उमेदवार ठरला 20 October, 2024

बीजेपीचा वणी विधानसभा क्षेत्राचा उमेदवार ठरला

वणी :भारतीय जनता पार्टी ने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज महाराष्ट्रातील एकूण 99 उमेदवारांच्या नावाची घोषणा...

*गोंडपिपरी येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न*    *डॉ अशोक कूडे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश : गोंडपिपरी तालुका काँग्रेसच्या उपाध्यक्ष पदी नियुक्ती* 20 October, 2024

*गोंडपिपरी येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* *डॉ अशोक कूडे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश : गोंडपिपरी तालुका काँग्रेसच्या उपाध्यक्ष पदी नियुक्ती*

*गोंडपिपरी येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* डॉ अशोक कूडे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश : गोंडपिपरी...

*कोरपणा येते स्टेट बँक देण्यात यावी*    *भुषन फुसे यांची मागणी* 19 October, 2024

*कोरपणा येते स्टेट बँक देण्यात यावी* *भुषन फुसे यांची मागणी*

*कोरपणा येते स्टेट बँक देण्यात यावी* भुषन फुसे यांची मागणी ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपणा:-एकीकडे...

वणीतील बातम्या

बीजेपीचा वणी विधानसभा क्षेत्राचा उमेदवार ठरला

वणी :भारतीय जनता पार्टी ने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज महाराष्ट्रातील एकूण 99 उमेदवारांच्या नावाची घोषणा...

यवतमाळ येथे वधू-वर परिचय मेळावा आयोजन.

वणी:- यवतमाळ जिल्ह्यातील नेर येथील नगाजी महाराज देवस्थान येथे १८ ऑक्टोंबर रोजी महाराष्ट्र नाभिक महामंडळ जिल्हा...