मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.
...
Reg No. MH-36-0010493
वणी:- वणी ते घुग्गुस चंद्रपूर हा राज्य मार्ग वर्दळीचा आहे.या रस्त्यावर वर्धा नदी लगत बेलोरा चेक पोस्ट
येथे वेकोलीची अवैध पार्किंग आहे.त्या पार्किंग मुळे वाहतूकीस अडथळा निर्माण होतो आहे.त्यामुळे ती पार्किंग हटविण्यात यावी यासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदुरकर यांनी उपविभागीय अधिकारी वणी यांना निवेदन दिले.
बेलोरा चेक पोस्ट येथे नविन पुलाच्या बांधकामाला जोडरस्ता जोडायचा या करीता चालू असलेला राज्य मार्ग वरील रस्ता दुभाजक एका बाजूने बंद केला असुन ३०० मिटर अंतरात वाहतूक दोन्ही बाजूची एकाच रस्त्यावरून वाहतूक सुरू केली आहे.या ठिकाणी कोळसा वाहतूकी दरम्यान उसळणारी धुळ रस्त्यावर साचल्याने वाहतूकीमुळे मोठ्या प्रमाणात धूळ प्रदुषण होत आहे.
सोबतच वेकोली नायगाव उपक्षेत्राचे कोळसा भरण्यासाठी येणारे ट्रक बाजूला थांबत असल्याने वाहतूक ३ दिवसा पासून वारंवार जाम होत आहे.
यापुर्वी या ठिकाणी बरेच अपघात घडले असून जिवीतहानी झाली आहे.
एकच रस्ता सुरू केल्याने बससेवा, आरोग्य सेवा, दैनंदिन प्रवासी यांनी कुठून मार्ग काढायचा असा गंभिर प्रश्न निर्माण झाला आहे.एकाच बाजूने रस्ता सुरू केल्याने उर्वरित साईड पट्टीवर खडीकरण करून रस्त्याची रुंदी वाढविणे गरजेचे आहे.एकाच बाजुने वाहतूक वळवितांना कुठल्याच उपाययोजना न केल्याने सिमे लगतच्या नायगाव,बेलोरा,पुनवट,निलजई, सावंगी येथील विद्यार्थी दुध भाजीपाला उत्पादक शेतकरी, नागरिक यांचे हाल होत आहे.
विद्यार्थी, आजारी रुग्ण, कामगार दैनंदिन प्रवाशी नागरिक यांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन सार्वजनिक बांधकाम विभाग,आय.व्हि.आर.सि.एल.
रस्ता कंपणी,उपक्षेत्र प्रबंधक वेकोली नायगाव, पोलिस निरीक्षक शिरपूर, पोलिस निरीक्षक वाहतूक शाखा वणी या सर्वांना सूचित करून सुरक्षित वाहतूक होण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी.बेलोरा चेकपोस्ट वळण रस्ता ठिकाणी अपघात किंवा दुर्घटना झाल्यास संबंधित विभाग जबाबदार राहील असे निवेदनात नमूद केले आहे.
वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...
वणी:- वणी येथील बालकलावंतांनी चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ बालनाट्य स्पर्धेत द्वितीय...
वणी :- नागपूर येथे राज्याचे हिवाळी अधिवेशन चालू असून विरोधकांकडून सरकारला विविध प्रश्नावर घेतल्या जात आहे. तारीख १८...
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...
वणी:- परभणी येथे १० डिसेंबर रोजी एका समाजकंटकाने भारतीय संविधानाची प्रतिकृतीची विटंबना केली. या देशद्रोही कृत्याचा...
वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...
वणी:- वणी येथील बालकलावंतांनी चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ बालनाट्य स्पर्धेत द्वितीय...