Home / यवतमाळ-जिल्हा / झरी-जामणी / उमेद संघटनेच्या प्रलंबित...

यवतमाळ-जिल्हा    |    झरी-जामणी

उमेद संघटनेच्या प्रलंबित मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत काम बंद आंदोलन

उमेद संघटनेच्या प्रलंबित मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत काम बंद आंदोलन

न्यायासाठी संविधानिक पद्धतीने बेमुदत काम बंद

झरीजामणी :उमेद संघटनेच्या एकमेव प्रलंबित मागण्या पूर्ण न झाल्यामुळे दिनांक ३ आक्टोंबर पासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू करण्याच  इशारा झरी तालुका उमेद अभियान तसेच राज्यभरातून उमेद च्या माध्यमातून देण्यात आला.मागील अनेक दिवसांपासून शासनकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्यामुळे हे बेमुद्दत काम बंद आंदोलन सुरु करण्यात येणार आहे.
राज्यात ८४ लाख ग्रामीण कुटुंबाच्या उज्वल भवितव्यासाठी शासनाच्या ग्रामविकास व पंचायत राज विभागाअंतर्गत उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानास स्वतंत्र
कायमस्वरूपी विभाग म्हणून आस्थापनेला मान्यता देऊन,सर्व कार्यरत कंत्राटी कर्मचारी यांना शासनाच्या समक्ष पदावर कायमस्वरूपी सेवेत समाविष्ट करून घेणे या प्रमुख मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येत आहे. मागणी पूर्ण न झाल्यास आम्ही न्यायासाठी संविधानिक पद्धतीने बेमुदत काम बंद आंदोलनात उमेद अभियानातील कंत्राटी अधिकारी,कर्मचारी सर्व समुदाय संसाधन व्यक्ती व सर्व सवयम सहायता समूहातील महिला लाखो च्या संख्येने सहभागी होत असून, सदर बेमुदत आंदोलनात आपण स्वतः आमचे तालुका प्रशासन प्रमुख म्हणून उपस्थित राहून मार्गदर्शन करावे. जेणेकरून आपला आम्हाला पाठिंबा आहे याची खात्री होईल. तरी आमची एकमेव मागणी मान्य करून आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशा आशियाचे निवेदन संघटनेच्या वतीने तहसीलदार झरी जामणी यांचेमार्फत महाराष्ट्र शासनाला देण्यात आले आहे.
यावेळी झरी जामणी तालुक्यातील उमेद अभियानातील अधिकारी कर्मचारी व सर्व कॅडर शेकडोच्या संख्येने उपस्थित होते.

काय आहे प्रमुख मागण्या

84 लाख ग्रामीण कुटुंबाच्या उज्वल भविष्यासाठी शासनाच्या ग्रामविकास व पंचायतराज विभागाअंतर्गत उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियानास स्वतंत्र कायमस्वरूपी विभाग म्हणून आस्थापनेला मान्यता देऊन सर्व कार्यरत कंत्राटी अधिकारी कर्मचारी यांना शासनाच्या समकक्ष पदावर कायमस्वरूपी सेवेत समाविष्ट करून घेणे

असा आहे आंदोलनात होणारा कृती कार्यक्रम

गावस्तरावर
१ उमेद मागणी जनजागृती फेरी, नवरात्र जागर फेरी,दिंडी प्रभात फेरी,ग्रामसंघ व प्रभाग संघ ठराव,महिला ग्रामसभा ठराव, ग्रामसभा ठराव,
तालुकास्तरावर
२ जनजागृती फेरी,तालुकास्तरीय अधिवेशन तथा जनजागृती मेळावा 
राज्यस्तरीय
३ राज्यस्तरीय अधिवेशन तथा मागणीबाबत जनजागृती महामेळावा

ताज्या बातम्या

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. 20 December, 2024

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

...

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन 20 December, 2024

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन

वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...

चंद्रपूर येथे झालेल्या बालनाट्य स्पर्धेत वणीच्या चमुला द्वितीय पारितोषिक. 19 December, 2024

चंद्रपूर येथे झालेल्या बालनाट्य स्पर्धेत वणीच्या चमुला द्वितीय पारितोषिक.

वणी:- वणी येथील बालकलावंतांनी चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ बालनाट्य स्पर्धेत द्वितीय...

आ. संजय देरकर यांनी कपासीचे झाड घेवून मागितला शेतकऱ्यांना  न्याय. 18 December, 2024

आ. संजय देरकर यांनी कपासीचे झाड घेवून मागितला शेतकऱ्यांना न्याय.

वणी :- नागपूर येथे राज्याचे हिवाळी अधिवेशन चालू असून विरोधकांकडून सरकारला विविध प्रश्नावर घेतल्या जात आहे. तारीख १८...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* 16 December, 2024

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...

परभणी येथील भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची  विटंबना करणाऱ्यां समाज कंठकावर कारवाई करा, भारतीय बौध्द महासभा,समता सैनिक दल व वंचित बहुजन आघाडी यांची मागणी. 16 December, 2024

परभणी येथील भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्यां समाज कंठकावर कारवाई करा, भारतीय बौध्द महासभा,समता सैनिक दल व वंचित बहुजन आघाडी यांची मागणी.

वणी:- परभणी येथे १० डिसेंबर रोजी एका समाजकंटकाने भारतीय संविधानाची प्रतिकृतीची विटंबना केली. या देशद्रोही कृत्याचा...

झरी-जामणीतील बातम्या

रान डुकरांचा हैदोस, मुकुटबन येथील शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान

झरी :तालुक्यातील मुकुटबन येथील विठ्ठल दासरवार या शेतकऱ्याच्या सम्पूर्ण शेताची रान डुकराने नासाडी करून उभे कापसाचे...