Home / यवतमाळ-जिल्हा / झरी-जामणी / झरी तालुक्यातील आरोग्य...

यवतमाळ-जिल्हा    |    झरी-जामणी

झरी तालुक्यातील आरोग्य सेवेचा प्रश्न गंभीर, शासनाचे दुर्लक्ष,सुविधांचा अभाव

झरी तालुक्यातील आरोग्य सेवेचा प्रश्न गंभीर, शासनाचे दुर्लक्ष,सुविधांचा अभाव
ads images

शिवसेना (उबाठा ) वणी विधानसभा प्रमुख संजय देरकर यांनी केला आरोग्य विभागाचा पंचनामा

झरी :शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वणी विधानसभा प्रमुख संजयभाऊ देरकर यांनी दि. 1 ऑक्टोबर ला झरी तालुक्यातील आरोग्य सुविधेचा पंचनामा केला. 

Advertisement

आरोग्या बाबत आयुष्यमान भारत, "आरोग्य परम धनम " हे ब्रीद वाक्य घेऊन जनतेच्या आरोग्यासाठी ग्रामीण रूग्णालय,प्राथमिक आरोग्य केंद्र आणि आरोग्य उपकेंद्र निर्माण केली. देरकर यांनी झरी तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय येथे भेटी दिली असता  तालुका झरी च्या नावाने भव्य अशी इमारत बांधली पण इथे इमारत आहे, स्टाफ नाही केवळ एक महिला डाॅक्टर उपस्थित होत्या. इतर स्टाफ डाॅक्टर व साहित्य औषधे यांचा अभाव आहे. झरी येथे ग्रामीण रुग्णालय आहे. महिला डाॅक्टर नाही. एक्स रे मशीन आहे. ऑपरेटर नाही. शस्त्र क्रिया करण्यासाठी बाहेरील डाॅक्टर ची अपांइटमेन्ट घ्यावी लागते. मिळाले तर ठिक नाही तर काही नाही. झरी येथील PHC आहे. ओपीडीत पेशन्ट नाही. एकाच गावात दोन दवाखानेआहे. पेशन्ट PHC ऐवजी ग्रामीण रूग्णालयात जातात. इथल केंद्र दुसरीकडे स्थलांतरित केले गेले नाही. शिबला येथील PHC जीर्ण झाली. आता OPD क्वार्टर मधे सुरू आहे. अनेक ठिकाणी स्टाफ नर्स, ANM नाही. अनुशेष बाकी आहे. LAB असिस्टन्ट नाही. मुकूटबन PHC केंद्र तालुक्यात सर्वाधिक बाह्य रूग्ण असणार केंद्र आहे. बिल्डींग अपुरी आहे. क्वार्टर जीर्ण झाली. नविन इमारत आवशक आहे. रक्त तपासणीसाठी पुरेशी व्यवस्था नाही. बाहेरील कंपनी करार तत्वावर काम करते आहे. आरोग्य सेवक पद रिक्त आहे. तालुक्यात सर्व आवशक ठिकाणी पुरेसा स्टाफ नाही. कामाचा ताण जास्त आहे. याही परीस्थितीत आदिवासी बहुल भागातील जनतेच्या आरोग्यासाठी सर्व सोई सुविधा पुर्ण करण्यासाठी शासन अपयशी ठरले आहे. अशी एकंदरीत परीस्थिती आहे. कर्मचारी आहे त्या विपरीत परिस्थितीतून सेवा करीत आहे. मुकूटबन येथील आरोग्य केंद्र व येथील स्वच्छता चांगली होती. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था मात्र नाही. इथला आरो प्लान्ट बंद असल्याची माहिती मिळाली. कंपनी प्रदुषणाने दमा अस्थमा व स्किन डिसीज प्रमाणात वाढ झाली आहे. गावागावात डेंगू चे रूग्ण वाढले आहे.  तिन महिन्यापासून गावातील सांडपाणी मंदिर च्या दारातून वाहते आहे. संपुर्ण जाणार येणार व दर्शन करणारे या गटार गंगेच्या बाबत मुग गिळून चूप बसून आहे. या सर्व बाबींचा परीणाम आयुष्यान भारत योजना केवळ ब्रीदवाक्य आहे. कारण जिकतकेदा आरोग्य शिबिर घेतली जातात तिथे हजारोंच्या संख्येने रूग्ण येत असतात. जनता जीवंत आहे, म्हणून जगतेय जीवन कण्हत कण्हत. हाच काय तो आयुष्यमान भारत! या अभियानात शिवसेना पदाधिकारी संतोषभाऊ माहूरे, सतिशभाऊ आदेवार, विजय पानघंटीवार, दयाकर गेडाम, संदिप विंचू, विनोद चिंतावार, प्रविन चिटलावार, प्रभाकर मद्देलवार, मधुकर पारशिवे, संजय आसुटकर, किशोर काटकर, किशोर गोन्लावार, संतोष लेडांगे, संतोष चेटपेल्लीवार, संजय भोयर, विनोद गावंडे, प्रकाश खिरटकार, सुनील धर्नीवार, सुरेश  ताडूरवार, तुळशीराम झाडे, आत्माराम नखाते, बालू दुधकोहळे, अशोक पंधरे, दुष्यंत उपरे, तुळशीराम दुर्गे, सुलेमान खान, उमेशा परताम , दत्ता परचाके, संजय बिजगुनवार, संतोष मंचलवार, रमेश उरवते, गोपाल कनाके, सलिम कुरेशी, भीमराव टेकाम, हमजद शेख, शब्बीरभाई,देवानंद येवले आणि शिवसैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते.

Advertisement

ताज्या बातम्या

हच.आर.जि. ट्रान्सपोर्ट  कंपनीतर्फे  ज्वलनशील इंधनाची रिफिलिंग मुख्य मार्गावर नागरिकांच्या जीवितेला धोका. 18 October, 2024

हच.आर.जि. ट्रान्सपोर्ट कंपनीतर्फे ज्वलनशील इंधनाची रिफिलिंग मुख्य मार्गावर नागरिकांच्या जीवितेला धोका.

घुग्घूस : वेकोलीच्या पैनगंगा मुंगोली खाणीत कोळसा वाहतूक करणारी वादग्रस्त हच. आर. जि.कंपनीचा धोकादायक प्रकरण उघडकीस...

देवस्थान समितीची शेत जमीन परस्पर विक्री केल्याच्या आरोपाचे संजय देरकर यांनी केले खंडन 17 October, 2024

देवस्थान समितीची शेत जमीन परस्पर विक्री केल्याच्या आरोपाचे संजय देरकर यांनी केले खंडन

वणी:सद्गुरू जगन्नाथ महाराज संस्थान वेगावच्या नावाने नोंदणीकृत असलेली झरी जामणी तालुक्यातील रुईकोट येथील शेत जमीन...

वणी शहरातील सर्वात मोठं फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल आपला राजवाडा 22 ऑक्टोबर पासून आपल्या सेवेत. 17 October, 2024

वणी शहरातील सर्वात मोठं फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल आपला राजवाडा 22 ऑक्टोबर पासून आपल्या सेवेत.

वणी : वणी शहरातील व परिसरातील खास खव्ययांसाठी व्हेज -नॉनव्हेज पदार्थांची विशेष मेजवानी सह भरपूर वेरायटी युक्त हॉटेल...

बोरी (बु ) येथील 32 वर्षीय विवाहित युवकाने विहिरीत उडी टाकून केली आत्महत्या 17 October, 2024

बोरी (बु ) येथील 32 वर्षीय विवाहित युवकाने विहिरीत उडी टाकून केली आत्महत्या

मारेगाव: तालुक्यातील बोरी( बु )येथील 32 वर्षीय युवकाची गावाजवळील नाल्याच्या काठावर असलेल्या सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या...

महात्मा ज्योतिबा फुलेंच्या तैलचित्राचे सौंदर्यी करण कामाचे भूमिपूजन. 16 October, 2024

महात्मा ज्योतिबा फुलेंच्या तैलचित्राचे सौंदर्यी करण कामाचे भूमिपूजन.

वणी:- शहरातील महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्रा जवळील सौंदर्यीकरणाच्या कामाचा भूमिपूजन...

शेणगाव ग्रामसभेत नागरिकांचा आक्रोश, दारुड्या उपसरपंचावर कारवाईची मागणी. 16 October, 2024

शेणगाव ग्रामसभेत नागरिकांचा आक्रोश, दारुड्या उपसरपंचावर कारवाईची मागणी.

घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...

झरी-जामणीतील बातम्या

शेतकरी विकास विद्यालयाच्या ग्रंथालयाला पुस्तक संच भेट

झरी :मांगली येथील श्री.विलास कसोटे यांचा एकुलता एक मुलगा दिवंगत कुणाल विलास कसोटे बारा वर्षापूर्वी मरण पावला होता...

झरी तालुक्यात पीकविमा कंपनी प्रतिनिधी कडून शेतकऱ्यांची लूट

झरी :निसर्गाच्या लहरीपणामुळे झरी तालुक्यात शेतपिकांचे मोठे नुकसान झाले असून, त्यामुळे शेतकरी हतबल झालेला आहे.खरीप...

उमेद संघटनेच्या प्रलंबित मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत काम बंद आंदोलन

झरीजामणी :उमेद संघटनेच्या एकमेव प्रलंबित मागण्या पूर्ण न झाल्यामुळे दिनांक ३ आक्टोंबर पासून बेमुदत काम बंद आंदोलन...