Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / जैताई नवरात्रात भक्ती...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

जैताई नवरात्रात भक्ती स्वराभिषेक

जैताई नवरात्रात भक्ती स्वराभिषेक
ads images
ads images

वणी:- या वर्षी दि.३ऑक्टोबर पासून सुरु होणाऱ्या जैताई नवरात्रात भक्तीरसपूर्ण कार्यक्रमांना प्राधान्य देण्यात आले आहे. मंदिराचा प्रतिष्ठाप्राप्त जैताई मातृगौरव पुरस्कार यावर्षी अध्यात्माच्या माध्यमातून समाजसेवेला आयुष्य समर्पित केलेल्या प.पू. सद्गुरू शिरीषदादा कवडे, पुणे ह्यांना दि.८ ऑक्टोबर मंगळवार रोजी विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद पुंड यांच्या हस्ते प्रदान केला जाणार आहे.                     

Advertisement

दि.६ ऑक्टोबर, रविवार रोजी मुंबई येथील विख्यात व्याख्यात्या अपर्णा बेडेकर आपल्या 'तिनेच गगन झेलियेले 'या विषयावरील व्याख्यानातून मुक्ताबाई,

Advertisement

जनाबाई, कान्होपात्रा, वेणास्वामी आणि बहिणाबाई या महाराष्ट्राच्या देदीप्यमान पंचकन्यांच्या प्रेरक कर्तृत्वाचा आढावा घेणार आहे.              

दि.१०ऑक्टोबर गुरुवारला नागपूर येथील नामवंत गायक निरंजन बोबडे ५० कलावंतांनी नटलेला एक अपूर्व ,नेत्रदीपक व कर्णमधुर भक्तीरसपूर्ण कार्यक्रम ' भक्तीस्वराभिषेक ' सादर करणार आहे. नागपूर येथील कवि +- मूळचे वणीचे - मधुकर सवरंपते यांच्या ' स्मृतिगंध ' या काव्यसंग्रहाचे

प्रकाशन प्रा. डाॅ. दिलीप अलोणे यांच्या हस्ते विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद पुंड यांच्या अध्यक्षतेखाली बुधवार दि.९ ऑक्टोबर रोजी संपन्न होणार आहे. कार्यक्रमाचे आयोजन विदर्भ साहित्य संघाच्या स्थानिक शाखेने व नगर वाचनालयाने केले आहे.

दि.३ ऑक्टोबर रोजी श्रीपाद सेवा भजन मंडळाचे भजन ,४ रोजी नागपूरचे शाम धुमकेकर यांचे कीर्तन ५ ला जनार्दन लाडसे व संच यांच्या सुगम संगीताचा कार्यक्रम,दि.७ रोजी संस्कार भारती व सागर झेप

बहुउद्देशीय संस्था प्रस्तुत देवीचा गोंधळ, जोगवा

व इतर नृत्यांचा कार्यक्रम, दि.११ ला जैताई भजन मंडळाचे भजन अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हे सर्व कार्यक्रम रोज रात्री ८ वाजता जैताई मंदिराच्या प्रांगणात संपन्न होणार आहेत. याशिवाय ३ ते११ ऑक्टोबर पर्यंत रोज सकाळी ७.३० ते १०.३०स्त्रियांच्या आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन

श्री विश्वयोग आयुर्वेदिक व पंचकर्म उपचार केंद्र वणीच्या वतीने करण्यात आले आहे. प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य व नाडी परीक्षण तज्ञ सुवर्णा सोनाली चरपे ह्या रुग्ण तपासणी करतील.    

नवरात्रातील या सर्व कार्यक्रमांचा लाभ बंधु भगिनींनी बहुसंख्येने घ्यावा अशी विनंती आयोजक संस्थेने केली आहे.

ताज्या बातम्या

जैताई नवरात्रात भक्ती स्वराभिषेक 28 September, 2024

जैताई नवरात्रात भक्ती स्वराभिषेक

वणी:- या वर्षी दि.३ऑक्टोबर पासून सुरु होणाऱ्या जैताई नवरात्रात भक्तीरसपूर्ण कार्यक्रमांना प्राधान्य देण्यात आले...

*अनुभवी आणि विकासशील नेतृत्व आ. सुभाषभाऊ धोटेंना पून्हा संधी द्या : खा. प्रतिभा धानोरकर*    *कोरपणा काँग्रेसच्या वतीने खा. प्रतिभा धानोरकरांचा सत्कार : भाजप, शे. संघटनेच्या कार्यकर्तेंचा काँग्रेसमध्ये प्रवेश* 28 September, 2024

*अनुभवी आणि विकासशील नेतृत्व आ. सुभाषभाऊ धोटेंना पून्हा संधी द्या : खा. प्रतिभा धानोरकर* *कोरपणा काँग्रेसच्या वतीने खा. प्रतिभा धानोरकरांचा सत्कार : भाजप, शे. संघटनेच्या कार्यकर्तेंचा काँग्रेसमध्ये प्रवेश*

*अनुभवी आणि विकासशील नेतृत्व आ. सुभाषभाऊ धोटेंना पून्हा संधी द्या : खा. प्रतिभा धानोरकर* *कोरपणा काँग्रेसच्या वतीने...

*अखेर कोरपना तहसीलदार प्रकाश व्हटकर निलंबित*    *कढोली खुर्द अवैध सरपंच निवड प्रकरण भोवले* 28 September, 2024

*अखेर कोरपना तहसीलदार प्रकाश व्हटकर निलंबित* *कढोली खुर्द अवैध सरपंच निवड प्रकरण भोवले*

*अखेर कोरपना तहसीलदार प्रकाश व्हटकर निलंबित* *कढोली खुर्द अवैध सरपंच निवड प्रकरण भोवले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा...

विदर्भ राज्य आंदोलन समीतीच्या वतीने वणी येथे फसव्या नागपूर कराराची होळी. 28 September, 2024

विदर्भ राज्य आंदोलन समीतीच्या वतीने वणी येथे फसव्या नागपूर कराराची होळी.

वणी: विदर्भ राज्य आंदोलन समिती गेल्या बारा वर्षापासून विदर्भावर सतत अन्याय करणाऱ्या नागपूर काराची होळी येत्या 28 सप्टेंबर...

वंचीतचे विधानसभा अध्यक्ष दिलीप भोयर सहकाऱ्यांसह राष्ट्रवादीत, मुंबईत पक्षप्रमुख शरदचंद्र पवार यांच्या उपस्थित घेतला प्रवेश. 28 September, 2024

वंचीतचे विधानसभा अध्यक्ष दिलीप भोयर सहकाऱ्यांसह राष्ट्रवादीत, मुंबईत पक्षप्रमुख शरदचंद्र पवार यांच्या उपस्थित घेतला प्रवेश.

वणी : येथील वंचित बहुजन आघाडीचे विधानसभा अध्यक्ष तथा ओबीसी समाजाचे नेते दिलीप भोयर यांनी ता. २७ सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी...

विजेचा शॉक लागुन, युवकाचा मृत्यू. 28 September, 2024

विजेचा शॉक लागुन, युवकाचा मृत्यू.

वणी:- पोलीस स्टेशन शिरपूर हद्दीत येत असलेल्या पुनवट येथे वास्तव्यास असलेल्या तुषार शामराव मडावी वय २१ वर्ष रा.पुनवट...

वणीतील बातम्या

विदर्भ राज्य आंदोलन समीतीच्या वतीने वणी येथे फसव्या नागपूर कराराची होळी.

वणी: विदर्भ राज्य आंदोलन समिती गेल्या बारा वर्षापासून विदर्भावर सतत अन्याय करणाऱ्या नागपूर काराची होळी येत्या 28 सप्टेंबर...

वंचीतचे विधानसभा अध्यक्ष दिलीप भोयर सहकाऱ्यांसह राष्ट्रवादीत, मुंबईत पक्षप्रमुख शरदचंद्र पवार यांच्या उपस्थित घेतला प्रवेश.

वणी : येथील वंचित बहुजन आघाडीचे विधानसभा अध्यक्ष तथा ओबीसी समाजाचे नेते दिलीप भोयर यांनी ता. २७ सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी...

विजेचा शॉक लागुन, युवकाचा मृत्यू.

वणी:- पोलीस स्टेशन शिरपूर हद्दीत येत असलेल्या पुनवट येथे वास्तव्यास असलेल्या तुषार शामराव मडावी वय २१ वर्ष रा.पुनवट...