Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / विदर्भ राज्य आंदोलन...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

विदर्भ राज्य आंदोलन समीतीच्या वतीने वणी येथे फसव्या नागपूर कराराची होळी.

विदर्भ राज्य आंदोलन समीतीच्या वतीने वणी येथे फसव्या नागपूर कराराची होळी.
ads images
ads images

वणी: विदर्भ राज्य आंदोलन समिती गेल्या बारा वर्षापासून विदर्भावर सतत अन्याय करणाऱ्या नागपूर काराची होळी येत्या 28 सप्टेंबर रोजी संपूर्ण विदर्भातील जिल्हा तसेच तालुका पातळीवर करणार आहे. महाराष्ट्र राज्याची निर्मिती होऊन 64 वर्ष लोटले आहेत तर सत्तेत येणाऱ्या सर्व राज्यकर्त्यांनी नागपूर करार न पाळण्याचे जणू सरकारचे धोरण अवलंबले आहे. विदर्भात बारा महिने  विद्युत खनिज संपत्ती असाधारण वनसंपदा तसेच अत्यंत कुशल मनुष्यबळ असूनही आज विदर्भाची एकंदरीत स्थिती अत्यंत दयनीय झाली आहे. येथील सर्व नैसर्गिक संपत्तीचा विदर्भाव्यतिरिक्त महाराष्ट्रातील इतर सर्व विभागांना पुरवठा केला जातो. 

Advertisement

परिणामी सिंचनाचा अनुशेष बेरोजगारी अत्यल्प वीजपुरवठा अशा अनेक अडचणींना विदर्भाची जनता समोर जात आहे. विदर्भ राज्य आंदोलन समितीद्वारे येथील जनतेची दिवसेंदिवस होत असलेली पिळवणूक केंद्र सरकारच्या लक्षात आणून देऊन सुद्धा त्यावर कुठलाच सकारात्मक तोडगा आजपर्यंत करण्यात आलेला नाही. विदर्भात सिंचनाची प्रस्तावित धरणे व काम सुरू होऊन सुद्धा अपूर्ण राहिलेले सिंचन प्रकल्प यामुळे पूर्व व पश्चिम विदर्भातील एकूण 14 लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली आणता आली नाही. ॲड. मधुकरराव किंमतकर यांच्या पुस्तिकेप्रमाणे विदर्भातील सिंचनाचा अनुशेष साठ हजार कोटींच्या वर गेला आहे. सोबत शिक्षण, सार्वजनिक आरोग्य, पिण्याचे पाणी, रस्ते, विद्युतीकरण, आदिवासी विकास कार्यक्रम आणि समाज कल्याण व ग्रामविकास या क्षेत्राचा अनुशेष सुद्धा 15000 कोटीच्या वर गेलेला आहे. या सर्व अनुषाचा एकंदरीत परिणाम म्हणजे वाढती बेरोजगारी हवालदिल झालेला शेतकरी आत्महत्येला प्रवृत्त झालेले त्यांचे कुटुंबीय आणि औद्योगिक विकास न झाल्याने निराश होत असलेला तरुण वर्ग यांचे चित्र अत्यंत भय्या व असून त्यांचा कल नक्षली चळवळीकडे वाढला आहे. दरडोई उत्पन्न अत्यल्प असल्यामुळे गरजेच्या वस्तू सुद्धा विकत घेण्याची क्षमता येथील जनतेमध्ये शिल्लक राहिलेली नाही. त्यामुळे कौटुंबिक व्यवस्था मोडकळीस येत असून परिणामी गर्भारमाता व बालके यांच्यामधील कुपोषणाचे प्रमाण सातत्याने वाढत आहे.

Advertisement

 विदर्भात पुढच्यावर आधारित वीज निर्मिती पैकी 87% वीज उर्वरित महाराष्ट्रातील उद्योगधंदे शेती व सार्वजनिक उद्योगासाठी वापरण्यात येते यातून महाराष्ट्रात घराघरातून उजेड पसरतो मात्र विदर्भात सध्या दैनंदिन गरजा सुद्धा भागत नसल्यामुळे तेथील नेहमीच काळोख पसरलेला असतो औष्णिक वीज निर्मितीच्या क्षेत्रात अद्यावत तंत्राचा वापर होत नसल्याने विदर्भात प्रदूषणाचा प्रश्न सुद्धा ऐरणीचा बनला आहे. त्यामुळे येथील जनतेचे आरोग्य धोक्यात आले आहे. विदर्भ राज्य आंदोलन समितीने गेल्या बारा वर्षापासून आंदोलनाची मालिका सतत सुरू ठेवून विदर्भ राज्य मागणीची धक कायम ठेवली आहे. फसव्या नागपूर करारामुळे 64 वर्ष लोटू नही राज्यकर्त्यांनी कराराची प्रकृती न केल्यामुळे  जनतेवरील अन्यायाची मालिका कायम राहिली आहे. मात्र निर्णायक तोडगा काढण्याच्या दृष्टीने तसेच नव्या सरकारला गंभीर इशारा देण्याच्या उद्देशाने नागपूर करार जाळून येथील जनसामान्यांच्या प्रश्नांच्या तीव्रतेची जाणीव करून देण्यासाठी व लोक जागर व्हावा म्हणून शनिवार दिनांक 28 सप्टेंबर 2024 ला विदर्भातील सर्व जिल्ह्यात व विदर्भातील वणी तालुक्यात नागपूर कराराची होळी करण्यात आली होती. यात वणी येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात ही होळी करण्यात आली. यावेळी  प्रा. पुरुषोत्तम पाटील जिल्हाध्यक्ष यवतमाळ देवराव पाटील धांडे, होमदेव कनाके, देवा बोबडे, बालाजी काकडे, रफिक रंगरेज, बाळकृष्ण राजुरकर, नामदेव जानेकर, प्रभाकर उईके, काशिनाथ देऊळकर, पुंडलिक पताडे, राजू पिंपळकर, धीरज भोयर, संजय चिंचोलकर, राहुल खारकर, श्रीवल्लभ सरमोकदम इत्यादी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

जैताई नवरात्रात भक्ती स्वराभिषेक 28 September, 2024

जैताई नवरात्रात भक्ती स्वराभिषेक

वणी:- या वर्षी दि.३ऑक्टोबर पासून सुरु होणाऱ्या जैताई नवरात्रात भक्तीरसपूर्ण कार्यक्रमांना प्राधान्य देण्यात आले...

*अनुभवी आणि विकासशील नेतृत्व आ. सुभाषभाऊ धोटेंना पून्हा संधी द्या : खा. प्रतिभा धानोरकर*    *कोरपणा काँग्रेसच्या वतीने खा. प्रतिभा धानोरकरांचा सत्कार : भाजप, शे. संघटनेच्या कार्यकर्तेंचा काँग्रेसमध्ये प्रवेश* 28 September, 2024

*अनुभवी आणि विकासशील नेतृत्व आ. सुभाषभाऊ धोटेंना पून्हा संधी द्या : खा. प्रतिभा धानोरकर* *कोरपणा काँग्रेसच्या वतीने खा. प्रतिभा धानोरकरांचा सत्कार : भाजप, शे. संघटनेच्या कार्यकर्तेंचा काँग्रेसमध्ये प्रवेश*

*अनुभवी आणि विकासशील नेतृत्व आ. सुभाषभाऊ धोटेंना पून्हा संधी द्या : खा. प्रतिभा धानोरकर* *कोरपणा काँग्रेसच्या वतीने...

*अखेर कोरपना तहसीलदार प्रकाश व्हटकर निलंबित*    *कढोली खुर्द अवैध सरपंच निवड प्रकरण भोवले* 28 September, 2024

*अखेर कोरपना तहसीलदार प्रकाश व्हटकर निलंबित* *कढोली खुर्द अवैध सरपंच निवड प्रकरण भोवले*

*अखेर कोरपना तहसीलदार प्रकाश व्हटकर निलंबित* *कढोली खुर्द अवैध सरपंच निवड प्रकरण भोवले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा...

विदर्भ राज्य आंदोलन समीतीच्या वतीने वणी येथे फसव्या नागपूर कराराची होळी. 28 September, 2024

विदर्भ राज्य आंदोलन समीतीच्या वतीने वणी येथे फसव्या नागपूर कराराची होळी.

वणी: विदर्भ राज्य आंदोलन समिती गेल्या बारा वर्षापासून विदर्भावर सतत अन्याय करणाऱ्या नागपूर काराची होळी येत्या 28 सप्टेंबर...

वंचीतचे विधानसभा अध्यक्ष दिलीप भोयर सहकाऱ्यांसह राष्ट्रवादीत, मुंबईत पक्षप्रमुख शरदचंद्र पवार यांच्या उपस्थित घेतला प्रवेश. 28 September, 2024

वंचीतचे विधानसभा अध्यक्ष दिलीप भोयर सहकाऱ्यांसह राष्ट्रवादीत, मुंबईत पक्षप्रमुख शरदचंद्र पवार यांच्या उपस्थित घेतला प्रवेश.

वणी : येथील वंचित बहुजन आघाडीचे विधानसभा अध्यक्ष तथा ओबीसी समाजाचे नेते दिलीप भोयर यांनी ता. २७ सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी...

विजेचा शॉक लागुन, युवकाचा मृत्यू. 28 September, 2024

विजेचा शॉक लागुन, युवकाचा मृत्यू.

वणी:- पोलीस स्टेशन शिरपूर हद्दीत येत असलेल्या पुनवट येथे वास्तव्यास असलेल्या तुषार शामराव मडावी वय २१ वर्ष रा.पुनवट...

वणीतील बातम्या

जैताई नवरात्रात भक्ती स्वराभिषेक

वणी:- या वर्षी दि.३ऑक्टोबर पासून सुरु होणाऱ्या जैताई नवरात्रात भक्तीरसपूर्ण कार्यक्रमांना प्राधान्य देण्यात आले...

वंचीतचे विधानसभा अध्यक्ष दिलीप भोयर सहकाऱ्यांसह राष्ट्रवादीत, मुंबईत पक्षप्रमुख शरदचंद्र पवार यांच्या उपस्थित घेतला प्रवेश.

वणी : येथील वंचित बहुजन आघाडीचे विधानसभा अध्यक्ष तथा ओबीसी समाजाचे नेते दिलीप भोयर यांनी ता. २७ सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी...

विजेचा शॉक लागुन, युवकाचा मृत्यू.

वणी:- पोलीस स्टेशन शिरपूर हद्दीत येत असलेल्या पुनवट येथे वास्तव्यास असलेल्या तुषार शामराव मडावी वय २१ वर्ष रा.पुनवट...