*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
Reg No. MH-36-0010493
वणी:- वणी ते नांदेपेरा रस्त्यावरील स्वर्णलीला शाळेसमोरील धोकादायक विद्युत वाहिनी पोल तात्काळ सरळ करून लोंबकळलेल्या तारा ओढणे व रस्त्यावरील झाडांच्या फांद्यांची कटिंग करण्याबाबतचे निवेदन शिवसेना (उ.बा.ठा.) चे उपतालुकाप्रमुख मनोज ढेंगळे यांनी उपकार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्या. उपविभाग वणी यांना दिले.
या मार्गावरील स्वर्णलीला शाळेसमोरील विद्युत वहन करणारा विद्युत पोल धोकादायक स्थितीत झुकलेला असून अक्षरशः रस्त्यावर पडण्याच्या परिस्थिती मध्ये आहे. या रस्त्याने शालेय विद्यार्थ्यांची स्कूलबस आणि इतर वाहने यांची मोठ्या प्रमाणात वाहतूक चालते. विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या वाहनांवर हा धोकादायक विद्युत पोल पडला तर जीवित हानी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तात्काळ हा धोकादायक विद्युत पोल तसेच या मार्गावरील इतर झुकलेले पोल सरळ करून लोंबकळलेल्या विद्युत तारा ओढून रस्त्यावरील झाडांच्या फांद्यांची कटिंग करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. विद्युत पोल तात्काळ सरळ न केल्यास शिवसेना (उ.बा.ठा.) पक्षाचे जिल्हाप्रमुख विश्वास नांदेकर यांचे मार्गदर्शनात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
निवेदन देताना मनोज ढेंगळे यांचे सोबत लालगुडा सर्कलचे विभाग प्रमुख राजू खामनकर, उपविभाग प्रमुख राजू कुंभारे, आण्याजी काकडे, गुलाब ढेंगळे, विलास दुर्गे, गणेश उज्वलकर इत्यादी शिवसैनिक उपस्थित होते.
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
*नॅशनल हायवे लगाम ते आलापल्ली रस्त्याच्या कामाची संथ गती: नागरिक त्रस्त, काम गतीने पूर्ण करण्याचे मा. खा. अशोकजी नेते...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
वणी:- लायन्स क्लब वणी व लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूलची स्थापना इ.स.१९७५ साली झाली असून दोन्ही संस्था ५० व्या वर्षांत...