Home / यवतमाळ-जिल्हा / मारेगाव / *मारेगाव तालुक्यातील...

यवतमाळ-जिल्हा    |    मारेगाव

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे आयोजन*

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा  संपन्न*    *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे  यांचे आयोजन*
ads images
ads images

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा  संपन्न*

 

Advertisement

*भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे  यांचे आयोजन*

 

Advertisement

✍️रमेश तांबे

वणी तालुका प्रतिनिधी

 

वणी:-मारेगाव शहरासह तालुक्यातील कुंभा, बोटोनी, वेगाव, मार्डी या गावांमध्ये भारतीय जनता पार्टी यवतमाळ जिल्हाध्यक्ष तथा वणी  नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांच्या संकल्पनेतून भव्य बैलपोळा सजावट सोहळा आयोजित करण्यात आला, या स्पर्धेच्या बक्षीस वितरणासाठी मार्डी येथे स्वतः माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री तथा राष्ट्रीय अध्यक्ष ओबीसी आयोग हंसराज अहिर उपस्थित होते. तर मरेगाव येथे स्वतः तारेंद्र बोर्डे यांनी बक्षीस वितरण केले.  या सोहळ्यात सहभागी होणाऱ्या बैल जोडी ला  प्रथम, द्वितीय , तृतीय  , असे बक्षीस देण्यात आले. पोळा हा सण भारतीय संस्कृतीमध्ये अतिशय महत्त्वाचा सण आहे. शेतकऱ्यांसाठी हा सण म्हणजे एक पर्वणीच असतो  शेतकऱ्यांसाठी वर्षभर राब राब राबणाऱ्या बैलांच्या  सणाची वाट शेतकरी आतुरतेने पाहत असतो. या दिवशी बैलाला कोणत्याही कामाला लावले जात नाही.  त्याला सकाळपासूनच खाऊ घातले जाते. त्यानंतर आंघोळ केली जाते आणि त्याचा साज  शृंगार केला जातो. त्यानंतर पोळा भरतो त्या ठिकाणी गेल्यावर मारुती देवाला प्रदक्षिणा मारून बैलांची पूजा करून बैलाला पुरणपोळीचे जेवण दिले जाते. हा दिवस  शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा असतो शेतकऱ्यांची जास्तीत जास्त भिस्त बैलावर  असल्याने या सणाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी यवतमाळ जिल्हाध्यक्ष तथा वणी  नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांनी मारेगाव तालुक्यातील मारेगाव,कुंभा, मार्डी, वेगाव बोटोनी या गावांमध्ये भव्य बैलपोळा सजावट स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेला गावकऱ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. या स्पर्धेत प्रथम बक्षीस पाच हजार रुपये द्वितीय बक्षीस तीन हजार तृतीय बक्षीस दोन हजार रुपये आयोजकांच्या वतीने देण्यात  येणार होते. त्यामुळे  प्रत्येक शेतकऱ्यांनी आपापल्या बैलांना सजवण्याचा जोरदार प्रयत्न केला. यामध्ये प्रत्येक गावातील तीन बैलजोड्यांची निवड करण्यात आली.  त्यामध्ये मारेगाव येथून प्रथम क्रमांक पंकज बदकी , द्वितीय क्रमांक मनोज कापसे तृतीय क्रमांक सुरेश मस्की मार्डी गावातून  प्रथम क्रमांक रविराज चंदनखेडे द्वितीय क्रमांक चंद्रशेखर भाजीपाले  तृतीया क्रमांक अनिल आस्कर वेगाव येथून प्रथम क्रमांक सुजित काकडे द्वितीय क्रमांक विनोद देवाळकर तृतीय क्रमांक बंडू पानघाटे बोटोनी येथील बैल पोळ्यातून प्रथम क्रमांक रुपेश आगासकांडे द्वितीय क्रमांक वसंत टेकाम तृतीय क्रमांक चिंधुजी नागोसे कुंभा या गावातून प्रथम क्रमांक बाबाराव झाडे द्वितीय क्रमांक  गजानन अवताडे तृतीय क्रमांक मारुती ठाकरे यांच्या बैलजोडीला देण्यात आले. या बैलपोळ्या सणा निमित्त गुढी सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्येही प्रत्येकी तीन बक्षिसे देण्यात आली सर्वच ठिकाणी स्पर्धकांनी उस्फुर्त सहभाग घेऊन बैलपोळा साजरा केला संपूर्ण गावकऱ्यांनी भाजपाचे जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांचे आभार मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठीशंकर लालसरे , अविनाश लांबट , मंगेश देशपांडे, अनुप महकुलकर , प्रशांत नांदे, शंकर काळे, व शेतकरी बांधवानी पंच मानून काम सांभाळले.

ताज्या बातम्या

बैलजोडी चोरणाऱ्या आरोपीला शिरपूर पोलिसांनी अवघ्या २४ तासात केली अटक, भंडारा जिल्ह्यातून बैलजोडी जप्त केली. 16 September, 2024

बैलजोडी चोरणाऱ्या आरोपीला शिरपूर पोलिसांनी अवघ्या २४ तासात केली अटक, भंडारा जिल्ह्यातून बैलजोडी जप्त केली.

घुग्घुस : फिर्यादी नामदेव दादाजी लांडे वय ५० वर्षे व्यवसाय शेती राह. कृष्णपूर तालुका वणी जिल्हा यवतमाळ यांच्या शेतात...

बैल जोडी चोरट्यास २४ तासात केले शिरपूर पोलिसांनी अटक. 16 September, 2024

बैल जोडी चोरट्यास २४ तासात केले शिरपूर पोलिसांनी अटक.

वणी:- शिरपूर पोलिस स्टेशन हद्दीतील कृष्णापुर येथील शेतकऱ्यांच्या शेतात बांधुन ठेवलेली बैल जोडी अज्ञात चोरट्यांनी...

वणी शहरातील विश्वकर्मा गणेश मंडळ ठरत आहे रक्तदूत. 16 September, 2024

वणी शहरातील विश्वकर्मा गणेश मंडळ ठरत आहे रक्तदूत.

वणी :- शहरातील सुतार पुरा येथील श्री विश्वकर्मा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ मागील ४ वर्षा पासून विविध सामाजिक उपक्रम...

खैरगाव भेदी येथे कबड्डीचे एकदिवसीय सामने संपन्न. 15 September, 2024

खैरगाव भेदी येथे कबड्डीचे एकदिवसीय सामने संपन्न.

वणी:- वणी विधानसभा क्षेत्रातील खैरगाव भेदी येथे खैरगाव ग्राम वासी व नीड संस्थे द्वारे भारतीय जनता पार्टीचे राज्य कार्यकारणी...

वेकोलि क्षेत्रातील समस्यांवर त्वरित कार्यवाही करण्याची खा. प्रतिभा धानोरकर यांची सूचना. 15 September, 2024

वेकोलि क्षेत्रातील समस्यांवर त्वरित कार्यवाही करण्याची खा. प्रतिभा धानोरकर यांची सूचना.

वणी:- वणी तालुक्यातील वणी नॉर्थ आणि वणी क्षेत्रातील गावांमध्ये वेकोलिच्या कोळसा खाणींमुळे अनेक समस्या उद्भवलेल्या...

वेकोलि क्षेत्रातील समस्यांवर त्वरित कार्यवाही करण्याची खा. प्रतिभा धानोरकर यांची वेकोली प्रशासनाला सूचना  15 September, 2024

वेकोलि क्षेत्रातील समस्यांवर त्वरित कार्यवाही करण्याची खा. प्रतिभा धानोरकर यांची वेकोली प्रशासनाला सूचना

वणी: वणी तालुक्यातील वणी नॉर्थ आणि वणी क्षेत्रातील गावांमध्ये वेकोलिच्या कोळसा खाणींमुळे अनेक समस्या उद्भवलेल्या...

मारेगावतील बातम्या

वणी विधानसभेत ( उबाठा) नांदेकर आणि देरकर मधिल मतभेद चव्हाट्यावर

वणी :- माजी आमदार तथा शिवसेनेचे (उबाठा) गटाचे जिल्हा प्रमुख विश्वास नांदेकर यांनी आज दिनांक ७ ऑगष्ट रोजी दुपारी वणी येथील...

शेतकऱ्याला त्रास द्याल तर गाठ माझ्याशी आहे - राजु उंबरकर

मारेगाव:महावितरण विभागाने देखभाल दुरुस्तीची कामे येत्या २ दिवसात पूर्णत्वास न्यावी व वारंवार होत असलेला विद्युत...