Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / मुकुटबन येथे सोमवारी...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

मुकुटबन येथे सोमवारी 9 सप्टेंबरला भव्य महाआरोग्य शिबिर, मा. आमदार वामनराव कासावार यांच्या नेतृत्त्वात शिबिराचे आयोजन.

मुकुटबन येथे सोमवारी 9 सप्टेंबरला भव्य महाआरोग्य शिबिर, मा. आमदार वामनराव कासावार यांच्या नेतृत्त्वात शिबिराचे आयोजन.

वणी:- गणेशोत्सव, गौरीपूजन व ईद ए मिलाद निमित्त मुकुटबन येथे कृषी उत्पन्न बाजार समिती येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी दिनांक 9 सप्टेंबर रोजी दु. 1 ते 5 या वेळेत हे शिबिर होणार आहे. या महाआरोग्य शिबिरात मोफत आरोग्य तपासणी, रोग निदान, ईसीजी, रक्त तपासणी, बीएमडी तपासणी केली जाणार आहे. रुग्णांना मोफत प्राथमिक औषधी वितरण केले जाणार आहे. खा. प्रतिभा धानोरकर यांच्या मार्गदर्शनात व माजी आमदार वामनराव कासावार यांच्या नेतृत्त्वात हे शिबिर होत आहे. या शिबिराचा झरी तालुक्यातील अधिकाधिक रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेश कमिटी सदस्य व शिबिराचे संयोजक डॉ. महेंद्र लोढा यांनी केले आहे.

सदर आरोग्य शिबिरात स्त्रीरोग तज्ज्ञ, हृदयरोग व मधुमेह तज्ज्ञ, अस्थिरोग तज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ, जनरल फिजिशियन, नेत्ररोगतज्ज्ञ, सर्जरी तज्ज्ञ, दंतरोग तज्ज्ञ, कान, नाक व घसा तज्ज्ञ रुग्णांची मोफत तपासणी व उपचार करणार आहेत.

शिबिराच्या यशस्वीतेसाठी काँग्रेसचे झरी तालुक्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत. शिबिराला तालुक्यातील अधिकाधिक रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन वणी विधानसभा क्षेत्र काँग्रेसतर्फे करण्यात आले आहे.

शनिवारी दिनांक 14 सप्टेंबर रोजी लोढा हॉस्पिटल मारेगाव तर 15 सप्टेंबर रोजी वणी येथे   महाआरोग्य शिबिर होणार आहे. मुकुटबन व मारेगाव येथील शिबिरात ज्या रुग्णांना गंभीर आजाराचे निदान होणार आहेत. त्या रुग्णांवर वणी येथे दि. 15 सप्टेंबर रोजी होणा-या सुपरस्पेशालिटी शिबिरात उपचार केले जाणार आहे.

ताज्या बातम्या

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

वणीतील बातम्या