दुचाकिच्या अपघातात इसमाचा मृत्यू, शहरातील धुम स्टाईल बाईक चालकांना आवर घाला नागरिकांची मागणी.
वणी:- मंदिरातून दर्शन घेऊन घराकडे परत जात असताना धुम स्टाईल बाईक स्वाराने जबर धडक दिल्याने ७० वर्षीय इसमाचा मृत्यू...
Reg No. MH-36-0010493
झरी :कृषीप्रधान संस्कृतीमधला महत्त्वाचा उत्सव म्हणजे बैलपोळा.शेतक-याच्या जोडीनं शेतात राबणा-या या सच्चा मित्राचं गोडकौतुक करण्यासाठीच हा सण साजरा करण्यात येतो.पोळ्याचे दोन दिवस बैलांसाठी विश्रांतीचे असतात.त्यांना न्हाऊ खाऊ घालून त्यांची रंगरंगोटी केली जाते.पुरणपोळी सारखा गोडधोड जेवणाचा नेवैद्य त्यांना दिला व त्यानंतर वाजत-गाजत बैलांची गावातून मिरवणूक काढण्यात आली.वर्षभर शेतातील विविध कामात शेतकऱ्यांना मदत करणाऱ्या बैलाची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा बैलपोळ्याचा सण साजरा करण्यात येतो.त्याच अनुषंगाने अडकोली येथील सरपंच अशोक पंधरे व उपसरपंच हरिदास झाडें यांच्या संकल्पनेतून उत्कृष्ट सजावट करणाऱ्या शेतकऱ्यांना बक्षीस चा कार्यक्रम आयोजित केला त्यामध्ये प्रथम बक्षीस ३०००रु, द्वितीय बक्षीस २०००रु व तृतीय बक्षीस १०००रु रोख जाहीर केले. निरीक्षण करून बक्षीस वितरण करण्यात आले व सरपंच यांच्या वतीने तोरण कापून पोळा फुटला असे जाहीर करण्यात आले.यावर्षी खरीप हंगामातील असलेले प्रमुख पिक कापुस सोयाबीनच्या परिस्थिती समाधान कारक असल्याने शेतकऱ्यांणि समाधान व्यक्त केले. बैलपोळ्या निमित्त या भागात शेतकरी दिवसभर उपाशी राहुन बैलाचा उपहास करतात बैलांना सायंकाळी पुरणपोळीचे जेवण दिल्यानतंरच शेतकरी जेवण करतात. बैल पोळ्यानिमित्त शेतकऱ्यांनी बैलाची सजावट करुन घरी पूरण पोळीचा स्वयंपाक करुन सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास बैलाची पुजा करुन बैलाना व इतर पशुधनाला पुरणपोळीचे जेवण दिल्यानतंर शेतकऱ्यांनी जेवण करुण उपवास सोडला.यावेळी गावांतील सर्व प्रतिष्ठित शेतकऱी उपस्थीत होते.
वणी:- मंदिरातून दर्शन घेऊन घराकडे परत जात असताना धुम स्टाईल बाईक स्वाराने जबर धडक दिल्याने ७० वर्षीय इसमाचा मृत्यू...
*सतरा वर्षीय अल्पवइन मुलीच्या आत्महत्ते प्रकरनाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करा* *पीडित कुटुंबीयांनी...
*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...
*अमित शाह चा एमआयएम पक्षा तर्फे निषेध* *इंदिरा गांधी चौकात निदर्शने राजीनाम्याची मागणी* मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-देशाचे...
वणी:- लोहार समाज संघटना वणीच्या वतीने भव्य राज्यस्तरीय परिचय मेळावा २१ व २२ डिसेंबर रोजी तिरुपती मंगल कार्यालय येथे...
*जाता जाता जिल्हाधिकारी दैने नी दिला अहेरी नगरसेवकांना जोरका झटका. ९ नगसेवक अपात्र* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
झरी :तालुक्यातील मुकुटबन येथील विठ्ठल दासरवार या शेतकऱ्याच्या सम्पूर्ण शेताची रान डुकराने नासाडी करून उभे कापसाचे...
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश, होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश, मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश, असा साजरा...