Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / वणी शहराच्या इतिहासात...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

वणी शहराच्या इतिहासात भव्य तान्हा पोळ्याचे आयोजन, शहराच्या एका भागात भरवून पूर्ण वणी शहर एकत्र करणारे विजय चोरडिया.

वणी शहराच्या इतिहासात भव्य तान्हा पोळ्याचे आयोजन, शहराच्या एका भागात भरवून पूर्ण वणी शहर एकत्र करणारे विजय चोरडिया.

वणी:- बैलपोळा हा सण अतिशय उत्साहात संपूर्ण देशात आनंदाने साजरा करण्यात आला. तसेच लहान मुलांचा ताना पोळा हा सर्वत्र वेगवेगळ्या पद्धतीने अतिशय आनंदात साजरा होतो. तान्या पोळ्या मध्ये लहान मुले आपला लाकडी नंदीबैल घेऊन मारुतीच्या मंदिरात येऊन नंदिबैलाची पुजा करून तेथे दर्शन करून आपल्या घरी येतात व घरोघरी जाऊन त्यांना आप्तेष्ट बोजारा देतात. 

मात्र आता तान्यापोळ्याच्या सणाला मोठ्या प्रमाणात उत्साह आला असून आई-वडील  नंदीबैलाची विविध प्रकारची सजावट करून देखावे करून त्या ठिकाणी येतात आणि जेथे तानापोळा भरविण्यात येतो तिथे वेगवेगळ्या प्रकारचे बक्षीसह त्यांना प्राप्त होतात.

वणी शहरातील नगरपरिषद शाळा क्रमांक पाच जवळ पोस्ट कॉलनी येथील हनुमान मंदिर येथे दरवर्षी ताना पोळा आयोजित करण्यात येतो व बक्षीस रोख स्वरूपात ठेवण्यात आलेली असतात. यावर्षी सामाजिक कार्यकर्ते गरिबांचे दाते व भाजपचे प्रदेश सदस्य व धडाडीचे नेते विजय चोरडिया यांच्या सौजन्याने दहा सायकलचे बक्षीस ठेवण्यात आले होते. यात दोन गट असून दोन्ही गटात बक्षीस देण्यात आली तसेच दहा लकी ड्रॉ काढण्यात आले होते.

भाजपचे विजयबाबू चोरडिया यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे ताना पोळा उत्सव समितीने विजय चोरडिया यांचा वाढदिवस केक कापून साजरा केला व त्यांना शुभेच्या दिल्या. यावेळी मंचावर विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीव रेड्डी बोदकुवार, प्रवचनकार मुन्ना महाराज, राजू जयस्वाल, प्रा. दिलीप अलोणे, पवन एकरे, संजय खाडे, दिनकर पावडे, स्वाती खरवडे, प्रीती बिडकर व मान्यवर उपस्थित होते.

वणी शहरात आजपर्यंत इतका मोठा  ताना पोळा कधीही भरला नाही व शहरातील इतर ठिकाणी तान्हा पोळा भरत होता मात्र यावेळेस तिथे शुकशुकाट होता आणि विजय चोरडिया यांनी पूर्ण वणीला एका ठिकाणी एकत्र आणले असे मनोगत  संजीव रेड्डी बोदकुरवार यांनी व्यक्त केले. यावेळी विजय चोरडिया यांच्या वाढदिवसा निमित्त उमेश पोद्दार व मित्र मंडळा तर्फे गरजू महिला मीना आनंदराव मोहितकर यांना शिलाई मशीन भेट देण्यात आली. तान्हा पोळा पोस्ट कॉलनी, जिल्हा परिषद कॉलनी, गुरुवर्य कॉलनी, डेपो कॉलनी मिळून आयोजित करण्यात आला होता. 

या स्पर्धेत एकापेक्षा एक असे नंदीबैल सजावट, पर्यावरण संदेशनात्मक व विविध देखावे केलेले होते.  अ गटात  रिधान आसुटकर, अक्षदा देवलकर, कार्तिक लिजबे, गौरवी खुंगर, श्रिवांश मोरे तसेच  ब गटात  अदिती पाटील, चैतन्य चौधरी, रियांशी पोहाने, रिया शर्मा, वनिका धोंडगे, तेजस्विनी उरकुडे यांनी प्राप्त केले. या स्पर्धेत 590 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.  

यावेळी कार्यक्रमाचे संचालन सागर मुने यांनी केले व  संपूर्ण जबाबदारीने तान्हा पोळा उत्सवाचे कार्य केले आणि उत्सव उत्तम होण्यासाठी सुमित पदलमवार, अनुप पोटे, सूरज नक्षिने, मयूर जूनगरी, निखिल बोथले, दिनेश झोडे, मयूर खुसपुरे,  मनोज राठोड, अनिकेत जूनगरी, आकाश तामगाडगे, पवन नागरकर, निखिल बोथले राजू रींगोले, प्रवीण सातपुते, प्रियंका कोटणाके, वैशाली काशीकर, अभय पारखी, आकाश बोथले, संध्या अवताडे, अमित उपाध्ये यांनी विशेष परिश्रम घेतले.

ताज्या बातम्या

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

वणीतील बातम्या

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...