Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / *भाजपाचे नेते विजय चोरडिया...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

*भाजपाचे नेते विजय चोरडिया यांच्या वाढदिवशी अनेक युवकांचा भाजपात प्रवेश*

*भाजपाचे नेते विजय चोरडिया यांच्या वाढदिवशी अनेक  युवकांचा भाजपात प्रवेश*

*भाजपाचे नेते विजय चोरडिया यांच्या वाढदिवशी अनेक  युवकांचा भाजपात प्रवेश*                      

 

✍️रमेश तांबे

वणी तालुका प्रतिनिधी

 

वणी: -भारतीय जनता पार्टीचे राज्य कार्यकारणी सदस्य धर्मदाते सामाजिक कार्यकर्ते विजय बाबू चोरडिया यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. यानिमित्त सकाळ पासूनच ठिकठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सकाळी साडेसहा वाजता श्री रंगनाथ स्वामी  मंदिरात विजय चोरडिया  यांच्या हस्ते पूजा व अभिषेक त्यानंतर बस स्टॅन्ड मागील परिसरातील खाटू श्याम मंदिर कमिटीच्या वतीने विजय भाऊ चोरडिया यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. विजयबाबू चोरडिया यांनी खाटूशाम  मंदिरासाठी चार लाख 11 हजार रुपयाची देणगी दिली होती. त्यानिमित्य मंदिर समितीने विजय चोरडिया यांचे आभार मानले. या कार्यक्रमानंतर दानशूर व्यक्तिमत्व विजय चोरडिया यांचा जैताई  देवस्थान कमिटी व अन्नछत्र समितीच्या वतीने विजय चोरडिया यांचा सन्मान व स्वागत करून  दीर्घायुष्य लाभो असा आशीर्वाद मंदिर समितीच्या वतीने देण्यात आला. यावेळी माधव सरपटवार, मुन्नालाल तुगनयत,  मूलचंद जोशी, दिगंबर गोहोकर, यासह जैताई  माता देवस्थान कमिटी व अन्नछत्र समितीचे सदस्य उपस्थित होते. हा कार्यक्रम आटोपताच वणी  अर्बन निधी येथे संचालक व कर्मचाऱ्यांच्या वतीने विजय चोरडिया यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.  शहरा जवळ असलेल्या सद्गुरु बाजीराव महाराज वृद्धाश्रम येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने विजय चोरडिया यांच्या वाढदिवसानिमित्त सन्मान करण्यात आला. विजय पीदुरकर दिनकर पावडे व महिलांनी विजय चोरडिया यांच्या वाढदिवसानिमित्त  केक कापून वाढदिवस साजरा केला. नंतर कायर येथे सरपंच नागेश घणकसार व गावकऱ्यांच्या वतीने विजय चोरडिया यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. येथे विजय चोरडिया यांचा भव्य सत्कार घेऊन केक कापण्यात आला व लाडक्या बहिणींना महिलांना साडी चोळीची भेट देण्यात आली. सोबतच गावातील अनाथ व दिव्यांग व्यक्तींना धान्य किटचे मोफत वाटप करण्यात आले. यावेळी गावकऱ्यांनी व महिलांनी विजय चोरडिया यांना भरभरून आशीर्वाद दिले. सायंकाळी सहा वाजताचे  सुमारास वणी   शहरातील गोकुळ नगर येथे  विजयबाबू चोरडिया  यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यानंतर सायंकाळी सात वाजता गणेशपुर रोड छोरीया लेआउट येथील श्री विनायक मंगल कार्यालय येथेअभिष्टचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री ओबीसी आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष हंसराज अहिर, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, सत्कारमूर्ती विजय भाऊ चोरडिया यासह अनेक मान्यवर व शहरातील नागरिक मोठ्या प्रमाणात  उपस्थित होते. या कार्यक्रमात भाजपचे नेते विजय चोरडिया यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून वणी शहर व परिसरातील अनेक युवकांनी व नागरिकांनी सोबतच महिलांनी भारतीय जनता पार्टी जाहीर प्रवेश केला. यावेळी माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार  भाजपाचे पदाधिकारी व महिला पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी उपस्थित शेकडो चाहत्यांनी विजय चोरडिया यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

ताज्या बातम्या

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

वणीतील बातम्या

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...