Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / ओबीसी विद्यार्थ्यांचे...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

ओबीसी विद्यार्थ्यांचे वसतिगृह खुले करून दिल्यामुळे सहायक संचालक निलंबित

ओबीसी विद्यार्थ्यांचे वसतिगृह खुले करून दिल्यामुळे सहायक संचालक निलंबित

निलंबन मागे न घेतल्यास राज्यभर ओबीसी संघटनांचा आंदोलनाचा इशारा

वणी : दोन वर्षांपासून प्रलंबित असलेले नागपुरातील ओबीसी विद्यार्थ्यांचे वसतिगृह गेल्या १६ ऑगस्ट रोजी विद्यार्थ्यांसाठी खुले करून देण्यात आले. विद्यार्थ्यांनी याचा आनंद साजरा करीत स्वतः रिबीन कापून त्याचे तात्पुरते उद्घाटन केले परंतु शासनाचा शिष्टाचार पाळला नाही म्हणून इतर मागास बहुजन कल्याण नागपूर विभागाचे सहायक संचालक राजेंद्र भुजाडे यांना निलंबित करण्यात आले आहे. या घटनेमुळे ओबीसी संघटना संतप्त झाल्या असून त्यांनी भुजाडे यांचे निलंबन तातडीने रद्द न झाल्यास राज्यभरात तीव्र आंदोलनाचा इशारा ओबीसी जातनिहाय जनगणना कृति समिती वणी मारेगाव झरी ने दिला आहे.

याबाबतचे निवेदनही शासनाला उपविभागीय अधिकारी वणी मार्फत सादर केले आहे.सविस्तर वृत्त असे कि,ओबीसी विद्यार्थ्यांचे वसतिगृह गेल्या दोन वर्षांपासून बंद आहेत.वसतिगृह सुरू करण्याबाबत शासनाच्यावतीने दरवेळी वेगवेगळ्या तारखा जाहीर करण्यात आल्या. मार्च २०२४ मध्ये वसतिगृह सुरू होतील म्हणून नागपूर येथे तीनशेच्या वर विद्यार्थ्यांनी अर्ज केलेत. परंतु ३१ जुलैपर्यंत वसतिगृह सुरू न झाल्याने विद्यार्थ्यांनी त्या इमारतीसमोर आंदोलन केले. तेव्हा १५ ऑगस्टपर्यंत वसतिगृह सुरू होतील, असे आश्वासन सहायक संचालक इतर मागास बहुजन कल्याण विभाग नागपूर यांनी विद्यार्थ्यांना दिले होते. त्यासंबंधीचे पत्रसुद्धा विद्यार्थी संघटना आणि शासनाला दिले होते.परंतु १५ ऑगस्टला सुद्धा वसतिगृह सुरू न झाल्याने १६ ऑगस्ट रोजी विद्यार्थ्यांनी स्वतःच उद्घाटन करून वसतिगृहात प्रवेश केला. तेव्हापासून भुजाडे यांना वरिष्ठ पातळीवरून वसतिगृहाचे उद्घाटन परस्पर कसे झाले? अशी विचारणा झाली आणि राजशिष्टाचार पाळला नाही असे कारण देऊन निलंबित करण्यात आले. यामुळे ओबीसीच्या संघटनांमध्ये असंतोष पसरला आहे. ओबीसी जातनिहाय जनगणना कृती समिती वणी मारेगाव झरी यांनी 26 ऑगस्ट रोजी उपविभागीय अधिकारी वणी यांच्या मार्फत मला मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना निवेदन पाठविण्यात आले. मागणी मान्य न झाल्यास राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा यावेळी इशारा देण्यात आला.यावेळी निवेदन देतांना मोहन हरडे, गजानन चंदावार, पांडुरंग पंडिले,सह इतर ओबीसी बांधव उपस्थित होते.

ताज्या बातम्या

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

*नॅशनल हायवे लगाम ते आलापल्ली रस्त्याच्या कामाची संथ गती: नागरिक त्रस्त, काम गतीने पूर्ण करण्याचे मा. खा. अशोकजी नेते यांचे निर्देश* 14 January, 2025

*नॅशनल हायवे लगाम ते आलापल्ली रस्त्याच्या कामाची संथ गती: नागरिक त्रस्त, काम गतीने पूर्ण करण्याचे मा. खा. अशोकजी नेते यांचे निर्देश*

*नॅशनल हायवे लगाम ते आलापल्ली रस्त्याच्या कामाची संथ गती: नागरिक त्रस्त, काम गतीने पूर्ण करण्याचे मा. खा. अशोकजी नेते...

वणीतील बातम्या

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

लायन्स क्लब व लायन्स इं मिडी.स्कूल वणी चे सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमाचे आयोजन, दोन्ही संस्थांचे ५० व्या वर्षीत पदार्पण.

वणी:- लायन्स क्लब वणी व लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूलची स्थापना इ.स.१९७५ साली झाली असून दोन्ही संस्था ५० व्या वर्षांत...